घरCORONA UPDATECorona Live Update: राज्यात मागील २४ तासांत २४८ जणांचा मृत्यू

Corona Live Update: राज्यात मागील २४ तासांत २४८ जणांचा मृत्यू

Subscribe

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुण्यात गेल्या २४ तासांत ८२० रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १६ हजार ८५१ वर गेली आहे. तर १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. तर पुण्यात आतापर्यंत ६१७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे.


२४ तासांत मुंबईत ८४६ कोरोनाचे नवे रुग्ण

- Advertisement -

मुंबईत मागील २४ तासांत ८४६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६८ हजार ४८१ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ३ हजार ८४२ झाली आहे. तसेच आज ४५७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत मुंबईत ३४ हजार ५७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.


राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यात कोरोनामुळे २४८ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार २१४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज १ हजार ९२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण ६९ हजार ६३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५०.०९ % एवढे झाले आहे.

- Advertisement -


नाशिक जिल्हा प्रशासनास मंगळवारी (दि.२३) दिवसभरात १२४ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात नाशिक शहरात ७८, नाशिक ग्रामीण १६, मालेगाव २८ आणि जिल्ह्याबाहेरील दोनजणांचा समावेश आहे. दिवसभरात १४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून नाशिक शहरात ८ आणि नाशिक ग्रामीणमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ९९८ रूग्ण करोनाबाधित असून एकट्या नाशिक शहरात १ हजार ३७२ रूग्णांचा समावेश आहे.


ठाणे महापालिका क्षेत्रात कोवीड १९ साठी काम करणा-या आशा वर्कर्सना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्यात आली असून यापुढे प्रत्येक दिवशी तीनशे रूपये याप्रमाणे महिन्याला अंदाजे नऊ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. यासंदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डाॅ. जितेंद्र आव्हाड, महापौर नरेश गणपत म्हस्के आणि इतर पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आशा वर्कर म्हणून काम करणाऱ्या  महिलांना  देण्यात येणारे मानधन वाढविण्यात यावे यासाठी काही दिवसांपूर्वी राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, महापौर नरेश म्हस्के आणि महापालिकेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत आशा वर्कर्सचे मानधन वाढविण्यात यावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार आज ठाणे  महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी त्यांच्या मानधनात वाढ करुन त्यांना प्रतिदिनी ३०० रूपये याप्रमाणे महिन्याला अंदाजे ९ हजार रुपये  मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या कामात आशा वर्कर्स या देखील  रुग्णांसाठी तत्परतेने कार्य करीत आहेत, त्यामानाने त्यांना मिळणारे मानधन हे तुटपुंजे असून त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी असा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता एक वर्षे पुढे ढकलण्यात आला आहे.


ज्या प्रवाशांनी रेल्वेचे बुकिंग १४ एप्रिलच्या अगोदर केले आहे, अशा प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत केले जाणार आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  लाॅकडाऊनमुळे शासनाच्या आदेशाने २३ मार्च पासून सलून व्यवसाय बंद आसल्याने आता नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने सलून व्यवसायाईकास तातडीने पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत देऊन आता सलून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाज वेल्फेअर असोसिएशन भिवंडी यांच्या वतीने एका निवेदनाद्वारे भिवंडी उपविभागीय (प्रांत) अधिकारी यांच्याकडे केली आहे.

कोरोना विषाणुचा जनसंसर्ग टाळता येऊन प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २३ मार्च पासून जाहीर केलेल्या संचार बंदीमुळे आणि जास्तीत जास्त जनसंसर्ग  होण्याचा धोका ओळखून नाभिक महामंडळाने सलून व्यवसायाईकास      केलेल्या आवाहनानुसार  २३ मार्च पासून सलून व्यवसाय बंद आसल्याने अर्थिक दुर्बल घट्कातील आणि हातावर पोट असलेला  नाभिक व्यवसाईक अर्थिक दृष्ट्या प्रचंड अडचणीत येऊन त्याच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. याविषयी वेळोवेळी निवेदनाद्रावारे ही परिस्थिती नाभिक मंडळाचे कार्यकर्ते शासनाचे निर्देशनास आणली होती. शासनाकडे अर्थिक मदतीची मागणी देखील केली होती. मात्र, शासनाने आद्याप कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने  सलून व्यवसायीकावर  नाराजी पसरली आसून नाभिक व्यवसाईकांनी आता  उपाशी मरण्यापेक्षा आंदोलन करु आसा इशारा दिला आहे.

दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वेगाने वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने महापालिकांना आर्थिक मदत करावी. तसेच कोरोना संदर्भातील समस्या सोडवण्याच्या हेतून दौरा काढला जाणार असून उद्या सोलापूर दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.


दिल्लीतील १०वीच्या एका विद्यार्थ्यांनी ३डी प्रिंटरचा वापर करून फेस शील्ड आणि मास्क तयार केले आहेत. आज त्यांने १०० फेस शील्ड दिल्ली पोलिसांना दिले आहेत.


देशात काल दिवसभरात १ लाख ८७ हजार २२३ नमुन्यांच्या चाचण्यात करण्यात आल्या. २२ तारखेपर्यंत ७१ लाख ३७ हजार ७१६ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने दिली आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहन चालकांनाही कोरोना विषाणू लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. माहितीनुसार दोन वाहतचालकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी राज ठाकरेंच्या काही शासकीय सुरक्षा रक्षकांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मात केली होती. सविस्तर वाचा 


शिवसेना भवनात नियमित येणाऱ्या एका ज्येष्ठ शिवसैनिकास कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सविस्तर वाचा


आज औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १६३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे औरंगाबाद मधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ८१९वर पोहोचला आहे. यापैकी २०३ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


देशात मागील २४ तासांत कोरोनामुळे ३१२ रुग्णांचा मृत्यू झाला असून १४ हजार ९३३ नवे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ४० हजार २१५वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत १४ हजार ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या १ लाख ७८ हजार १४ रुग्णांवर उपचार सुरू असून २ लाख ४८ हजार १९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 


नाशिक जिल्ह्यात कोरोना कहर कायम आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरात १०८ कोरोना पॉझिटिव्ह नवे रुग्ण आढळले असून १० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर नाशिक शहरात ८५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा २८७४वर पोहोचला असून १७५ जणांचा मृत्यू झाला आहे.


जगभरात जसा कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे तसाच रुग्ण रिकव्हर होण्याचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात ९१ लाख ८६ हजार १५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर त्यापैकी ४ लाख ७४ हजार २६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ४९ लाख ३६ हजार ७७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात सोमवारी तब्बल ३ हजार ७२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ३५ हजार ७९६ वर गेला आहे. यापैकी ६१ हजार ७९३ अॅक्टिव्ह रुग्ण असून ६७ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा जास्त आहे. मात्र असं असलं, तरी गुरुवारी दिवसभरात राज्यात ६२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ६ हजार २८३ च्या घरात पोहोचला आहे. तर राज्यातील मृत्यूदर ४.६३ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -