घरCORONA UPDATECorona Live Update: देशात कोरोना बाधित रुग्णसंख्या ४३ हजार, २४ तासांत ८३...

Corona Live Update: देशात कोरोना बाधित रुग्णसंख्या ४३ हजार, २४ तासांत ८३ मृत्यू

Subscribe

देशभरात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. आज दुपारपर्यंत ही संख्या ४२ हजार ८३६ पर्यंत येऊन पोहोचली आहे. तर मागच्या २४ तासांत तब्बल ८३ रुग्णांचा बळी गेला असून २ हजार ५७३ नवीन रुग्ण आढळले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण १ हजार ३८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जरी ११ हजार ७६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी वाढत जाणारी रुग्णसंख्या भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.


 

- Advertisement -

महाराष्ट्र आणि मुंबईत असलेल्या उत्तरप्रदेशच्या कामगारांना परत घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ टाळाटाळ करत असल्याचा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाराष्ट्रात उत्तरप्रदेशमधील २५ – ३० लाख लोक आहेत. अन्य राज्याप्रमाणे युपी सरकारला आपले लोक परत नेण्यासाठी विनंती राज्यसरकारने केली. मात्र योगी सरकार अटी व शर्ती ठेवून कोरोना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टेस्ट करुन पाठवा असे सांगत असल्याचे नवाब मलिक म्हणालेत. ३० लाख लोकांच्या टेस्ट करायला वर्ष दीड वर्ष लागू शकते. योगीजी इथल्या लोकांना घ्यायला तयार नसल्याने ते अडचण निर्माण करत आहे. अन्य राज्ये आपल्या लोकांना घ्यायला तयार झाले त्यापध्दतीने युपी सरकारनेही परवानगी द्यावी, अशी विनंती पुन्हा एकदा सरकारच्यावतीने करण्यात आल्याचे देखील नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.


 

- Advertisement -

पुण्यामध्ये एका ५८ वर्षीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यातल्या भारती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या १२ दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते.


मुंबईत अनेक भागांमध्ये सकाळपासूनच तळीरामांनी दारू खरेदीसाठी दुकानांच्या बाहेर रांग लावली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी केल्याचं चित्र दिसून येत होतं. माटुंगा पश्चिममध्ये तर स्टेशनपासून थेट रुपारेल कॉलेजपर्यंत ही रांग केल्याचं चित्र दिसून आलं.

matunga west Que for liquor in lockdown

 

राजधानी दिल्लीमध्ये दारूच्या खरेदीसाठी तळीरामांनी सकाळपासूनच रांगा लावायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर ही रांग एक किलोमीटरपर्यंत लांब होती!


जगभरात आत्तापर्यंत २ लाख ४८ हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ४८० रुग्णांचा बळी गेला आहे. तर एकूण रुग्णसंख्या ३५ लाखाच्याही वर गेली आहे. यातले सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. दरम्यान, भारतात देखील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४२ हजारांच्या वर गेला आहे.


मुंबईचा धारावी हा झोपडपट्टीचा भाग जणूकाही कोरोनाच्या भक्ष्यस्थानी पडलाय, अशा पद्धतीने तिथे कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. कालच्या दिवसभरात धारावीत ९७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता धारावीत कोरोनाबाधितांची संख्या ५९० झाली आहे.


परराज्यातील मजुरांचं स्थलांतर सुरू झाल्यानंतर या मजुरांच्या प्रवासाचा खर्च उचलण्यासाठी काँग्रेस पक्षानं पुढाकार घेतला आहे. त्या त्या राज्यातील काँग्रेस पक्षाने या मजुरांचा प्रवासाचा खर्च उचलावा, असे निर्देश काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आहेत.


दारूची दुकानं पुन्हा सुरू होणार अशी खबर लागल्यानंतर तळीरामांनी पुन्हा एकदा दुकानांच्या बाहेर रांगा लावायला सुरुवात केली आहे. कर्नाटकच्या हुबळीमध्ये आज भल्या सकाळीच अशा शिस्तीत रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -