घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत आज ६९३ नवे कोरोनाबाधित, तर २० रुग्णांचा मृत्यू

Live Update: मुंबईत आज ६९३ नवे कोरोनाबाधित, तर २० रुग्णांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत आज ६९३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज एकूण ५७५ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


परमबीर सिंगांनी पदावर नसताना माझ्यावर खोटे आरोप केले, परमबीर सिंगांचे माझ्यावरील सर्व आरोप खोटे, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील परमबीर सिंगांची भूमिका संशयास्पद- अनिल देशमुख

- Advertisement -

संपूर्ण महाराष्ट्रात आता तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध, अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ४ वेळेत सुरु राहणार तर इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत सुरु राहणार, मॉल, थिएटर, नाट्यगृह बंदचं, सार्वजनिक वाहतुक १०० टक्के सुरु, मात्र सर्वसामान्यांसाठी रेल्वेप्रवास बंदच


अनिल देशमुखांच्या मुंबईसह नागपुरच्या घरात ईडीची छापेमारी

- Advertisement -

मोदींचा कश्मिरी नेत्यांशी संवाद ऐक्याच्या दृष्टीने योग्य- शरद पवार , मोहिते आणि त्यांच्या सहकार्यांचे राष्ट्रवादीत स्वागत, ईडीची चौकशी होणे आमच्यासाठी नवीन नाही, अनिल देशमुखांवर आधीपासूनचं केंद्राची वक्रदृष्टी- शरद पवार


अनिल देशमुखांवरील कारवाईत कोणताही राजकीय हेतू नाही – फडणवीस


बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आलाय. बोगस लसीकरण प्रकरणी आतापर्यंत ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  बोगस लसीकरणासंदर्भात चौकशीसाठी विशेष तपासणी पथकाची स्थापना करण्यात आली आहे – विश्वास नांगरे पाटील


अनिल देशमुख वरळीच्या सुखदा इमारतीतील निवासस्थानी दाखल. सकाळी अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे.


अनिल देशमुख यांच्या संबंधित पाच ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. सकाळी अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या घरावर ईडीने छापेमारी सुरु केली. त्यानंतर आता त्यांच्या वरळीतील घरावरही ई़डीची छापेमारी सुरु आहे. आणखी ३ ठिकाणी ईडीची झाडाझडती सुरु आहे.


 

नागपूरसोबतच आता अनिल देशमुख यांच्या वरळीतील घरीही ईडीची छापेमारी करण्यात आली आहे. ईडीची टीम, स्थानिक पोलीस वरळीच्या घरी पोहचले आहेत. सध्या डॉक्युमेंट रिकव्हरी,इलेक्ट्रॉनिक डिव्हाईजेस,गॅजेट्स सील करण्याचे काम सुरु आहे.


केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर सुरू आहे. राजकीय गोष्टींसाठी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. अनिल देशमुख नागपुरातील घरी राहत नाहीत – सुप्रिया सुळे


देशात गेल्या २४ तासात ५१,६६७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६४,५२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १,३२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या ६,१२,८६८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे.


मुंबई फोर्ट परिसरात आशापुरा इमारतीचा स्लॅब कोसळला. इमारतीतील ४० जणांना सुखरूप वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.


पुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधूना मुंबईच्या विलेपार्ले पोलिसांनी फसवणूकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपे यांच्या विरोधात एका ७० वर्षीय महिलेने फसवणूकीची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर दोन्ही बंधूना मध्यरात्री मुंबई पोलिसांनी पुण्यातून मुंबईतील विलेपार्ले येथे आणले. दोघांवर विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -