घरताज्या घडामोडीLive Update: चार तासांपासून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

Live Update: चार तासांपासून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

Subscribe

लांजा तालुक्यातील वेरळ घाटात मशीन घेऊन जाणारा ट्रेल पलटल्यामुळे गेल्या चार तासांपासून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.


सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत आज मराठा समाजाच्या बांधवांची बाईक रॅली काढली आहे. सायन ते सीएसएमची बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये मराठा आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सीएसएमटी स्थानकावर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रवीण दरेकर, आशिष शेलार या नेत्यांनी देखील या रॅलीमध्ये हजेरी लावली.

- Advertisement -

देशाच्या लसीकरण मोहिमेत योगदान द्या. लसीबाबत गैरसमज पसरवू नका. सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्या. अनेक गावांमध्ये १०० टक्के लसीकरण करण्यात आले आहे. २१ जूनला देशात विक्रमी लसीकरण करण्यात आले – पंतप्रधान मोदी


कोरोना काळात डॉक्टरांच्या कामाचे मोदींकडून कौतुक करण्यात आले. १ जुलै रोजी डॉक्टर्स डे आहे. यंदाचा डॉक्टर्स डे खास असल्याचे मोदींनी सांगितले.

- Advertisement -

मन की बात या कार्यक्रमातून मोदींकडून मिल्खा सिंग यांच्या आठवणी उजाळा दिला. त्याचप्रमाणे आर्चरी खेळाडू प्रवीण जाधव यांचे कौतुक करण्यात आले. ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंना मोदींनी शुभेच्छा दिल्या.


पुढील २-३ तासात मुंबई,ठाण्यासह पालघरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे आणि रायगडमध्ये देखील हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.


देशात गेल्या २४ तासात ५०,०४० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून, देशाचा रिकव्हरी रेट आता ९६.७५ टक्के इतका झाला आहे. तर देशात सध्या ५,८६,४०३ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


जम्मू विमानतळावर स्फोट घडवण्यासाठी दोन ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. तर भारताचे दोन जवान या स्फोटात किरकोळ जखमी झालेत.


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर असणार आहेत. सैन्यासी संवाद साधण्यासाठी आणि बीआरओद्वारे बांधलेल्या अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.


मन की बातमधून आज पंतप्रधान मोदी साधणार जनतेशी संवाद


सिरम इन्स्टिट्यूट आणि अमेरिकन औषध कपंनीच्या नोव्होन्हॅक्स लसीच्या चाचणीला लवकरच सुरुवात होणार आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ आणि केईएम रुग्णालयात लहान मुलांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. २ ते ११ आणि १२ ते १७ या वयोगटातील ९२० लहान मुलांवर लसीची चाचणी करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -