Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Live Update: राज्यात आज ९,३७१ रुग्णांनी केली कोरोनावर मात; ९,८४४ नवे रूग्णांची...

Live Update: राज्यात आज ९,३७१ रुग्णांनी केली कोरोनावर मात; ९,८४४ नवे रूग्णांची नोंद

Related Story

- Advertisement -

गेल्या २४ तासांत राज्यात ९ हजार ८४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज १९७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यासह दिलासादायक म्हणजे आज ९,३७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


मुंबईत गेल्या गेल्या २४ तासांत ७८९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर कालप्रमाणे आजही १० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ७८९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत आत्तापर्यंतची एकुण रुग्णसंख्या ७ लाख २४ हजार ११३ वर पोहचली आहे. तर आज ५२४ रुग्ण कोरोनातून मुक्त होत घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ६ लाख ९१ हजार ६७० वर पोहचली आहे.


- Advertisement -

दिल्लीत गेल्या २४ तासात १०९ नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.


- Advertisement -

नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचं द्यायचं? यावरुन सध्या वाद पेटला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांची आहे, शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी नवी मुंबईतील भूमिपूत्रांकडून आज नवी मुंबईतील सिडकोवर आंदोलन करण्यात आलं. आंदोलनास सुरुवात करण्याआधी आंदोलक नेत्यांकडून दि बा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आंदोलनास सुरुवात करण्यात आली.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या स्वयंचलित वाहनतळाचे लोकार्पण करण्यात आले आहे. रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित २१ मजली व २४० वाहन क्षमतेचे ‘पार्किंग’ असणार आहे. पालकमंत्री व महापौर यांच्या उपस्थितीत लोकार्पण कार्यक्रम पार पडला आहे.


पुणे आंबील ओढा घरांच्या प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात बैठकीला सुरुवात झाली आहे. बैठकीला एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, नीलम गोर्हे , पुणे महापालिका अधिकारी उपस्थित आहे.


दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. त्यामुळे घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका. डेल्टा प्लेस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे. संसर्गाचे अधिक प्रमाण असलेल्या ७ जिल्ह्यांनी अधिक काळजी घ्यावी. हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.


सप्टेंबरमध्ये Jiophone next या नावाने जिओजा नवीन फोन लाँच करण्यात येणार आहे. हा फोन अँड्रॉईड बेस असणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे. देश २जी मुक्त होऊन ५जी युक्त होणार असे अंबानी यांनी म्हटले आहे.


सत्तेत असताना ५० टक्क्यांवरील ओबीसी आरक्षणाला कोणीही हात लावू शकले नाही. ओबीसींचे आरक्षण राज्यातील सरकारमुळे गेले. ओबीसी आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले – देवेंद्र फडणवीस


भ्रष्टाचार आणि गोंधळ बाहेर येईल म्हणून अधिवेशनातून पळ – फडणवीस


सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने माझ्यासोबत डिबेट करावं. सत्ताधऱ्यांना माझे आवाहन – फडणवीस


पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा भुकंपाचे धक्के बसले आहेत. आज सकाळी डहाणू आणि तलासरी परिसरात दोनवेळा भुकंपाचे धक्के बसले.


येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये उत्तर प्रदेश; उत्तराखंड; पंजाब ; गोवा; मणिपूर; या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत असून या पार्श्वभूमीवर आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली.


निवृत्तीनाथ महाराज पालखीचा प्रातिनिधिक प्रस्थान सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या आवारात हा सोहळा पार पाडण्यात आला. १९ जुलैला पालखी बसमधून पंढरपूरला रवाना होणार आहे.


सायन पनवेल महामार्ग बंद करण्यात आला आहे.  दोन्ही बाजूनी वाहतूक बंद आहे, फक्त अत्यावश्यक वाहनांना परवानगी आहे, त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी व्हायला सुरुवात झालीय. पोलीस प्रशासन वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करीत अहेत.


संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या कारवार कोची दौऱ्यावर


पुणे आंबिलओड्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा प्रशासनाचा घाट असल्याचे म्हणत पुणे आंबिलओढ्याजवळचे नागरिक आक्रमक झाले आहेत. रॉकेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय. पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापटी झाली. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.


आज रिलायन्स समुहाची ४४वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत मुकेश अंबानी कोणती मोठी घोषणा करणार याकडे आता समभागधारकांचे आणि गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. ५जी फोन,जिओ मार्ट,अरामकोसोबत डील होण्याच्या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आज सिडकोवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी नवी मुंबईमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या मोर्चाला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. नवी मुंबई परिसरातील वाहतूक देखील पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईत आज जड वाहनांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -