घरताज्या घडामोडीLive Update: २५ जूनला ओबीसी समाजाचा राज्यात चक्काजाम -...

Live Update: २५ जूनला ओबीसी समाजाचा राज्यात चक्काजाम – पंकजा मुंडे

Subscribe

२५ जूनला ओबीसी समाजाचा राज्यात चक्काजाम – पंकजा मुंडे


ओबीसी आरक्षणासाठी मुंबईतील फडणवीसांच्या घरी भाजप नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत पंकजा मुंडे, चित्रा वाघ, चंद्रशेखर बावनकुळे,मनीषा चौधरी हजर आहेत.

- Advertisement -

१९ जुनला राहूल गांधी यांच्या वाढदिवशी मुंबईतील टिळक भवनात डॉ सुनिल देशमुख यांचा कॉग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.  महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अविनाश पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ सुनिल देशमुख प्रवेश करणार आहेत.


कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा अजित पवार यांच्या गाडीसमोर राडा. बीडमध्ये आरोग्य सेविका संतप्त. बीडमध्ये आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांची गाडी अडवली.

- Advertisement -

ठाणे कोपरी पुलाला तडे गेल्याचे मनसेच्या निदर्शनास आले होते. त्यासाठी ठाणे कोपरी पुलाजवळ मनसेने आंदोलन केले. मनसे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कंत्राटदार आणि MMRDAच्या विरोधात मनसेने हे आंदोलन केले. ढोलकी, झांजेच्या तालावर उपरोधित गाणी गात मनसेने हे आंदोलन केले.कोपरी पुलचे बांधकाम नीट होत नाही व बांधकाम कंत्राटदारावर कारवाई होत नाही तोवर आम्ही पुलाचे उदघाटन होऊ देणार असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.


तरुणांमध्ये कौशल्य विकास वारंवार होत राहणे महत्त्वाचे – मोदी


क्रॅश कोर्सच्या माध्यमातून १लाख कोरोना योद्धांना प्रशिक्षण – मोदी


तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल – मोदी


कोरोना योद्धांसाठी क्रॅश कोर्सचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन


पंतप्रधान मोदींचा जनतेशी संवाद


अमरावतीचे माजी आमदार सुनील देशमुख १९ जून रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार करणार आहेत. सुनील देशमुख यांच्या निर्णयानंतर अमरावतीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.


CBSE परीक्षेचा निकाल ३१ जुलै रोजी लागणार – शिक्षणतज्ज्ञ


देशात गेल्या २४ तासात ६२ हजार ४८० नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. १ हजार ५८६ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. तर देशात गेल्या २४ तासात ८८ हजार ९७७ रुग्णांनी कोरोनावर मात केलीय.


केंद्र सरकारकडून फ्रंटलाईन वर्कर्ससाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन


साताऱ्यातील कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून सुमारे २१०० क्युसेक पाणाच्या विसर्ग केला जाणार आहे. कोयना धरणात सध्या २५ हजारांपेक्षा जास्त क्युसेस पाण्याची आवक होत आहे.


सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी २३ फुटांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.


कोल्हापूरात पंचगंगा नदीची पाण्याची पातळी १२ तासात ३ फुटांनी वाढली. पंचगंगा नदीने धोक्याती पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कोल्हापूरातील ५९ बंधारे पाण्याखाली गेले आहे. कोल्हापूरात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे.


पुढील ३-४ तासात मुंबई शहर उपनगरात त्याचप्रमाणे रायगड,ठाणे,पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर ठाण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर मुंबईल ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -