Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Live Update: बोगस लसीकरणप्रकरणी खार पोलीस स्थानकात दोघांविरोधात गुन्हा दाखल 

Live Update: बोगस लसीकरणप्रकरणी खार पोलीस स्थानकात दोघांविरोधात गुन्हा दाखल 

Related Story

- Advertisement -

बोगस लसीकरणप्रकरणी खार पोलीस स्थानकात दोघांविरोधात गुन्हा दाखल


मंत्रालयात बॉम्ब ठेवण्याला धमकीचा मेल, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल


- Advertisement -

उद्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक


राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घटत होत असून मृतांची संख्याही कमी झाली आहे. आज राज्यात ६, २७० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १३,७५८ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.


- Advertisement -

ईडीने अविनाश भोसले यांची ४० कोटीहून अधिक संपत्ती जप्तची मोठी कारवाई केली आहे. ईडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून फेमा कायद्यातील १९९९ या कलमांतर्गत ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अंबरनाथ यात्रा रद्द


रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणाची फाईल बंद


आंदोलन थांबणार नसून मागण्यांच्या पुर्ततेसाठी १ महिन्यांचा अल्टिमेटम- संभाजीराजे


हात मिळवायचा की नाही हे वरिष्ठ ठरवणार- चंद्रकांत पाटील


खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये मूक मोर्चा, मराठ्यांच्या हक्कासाठी आमचा लढा, वाद घालण्यापेक्षा मार्ग काढणे महत्त्वाचे- संभाजीराजे


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव देणे योग्य होईल. नवी मुंबई विमानतळ मुंबईच्या आंतराराष्ट्रीय विमानतळाचे एक्स्टेंशन असेल. हे विमानतळ म्हणजेच मुंबईच्याच विमानतळाचा भाग आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले तर संघर्षाचा विषय येणार नाही. बाळासाहेब असते तर त्यांनी विमानतळाला महाराजांचेच नाव दिले असते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले तर संघर्षाचा विषय येणार नाही. विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव संयुक्तिक आहे.


मुंबई महापालिका क्षेत्रातील तिसऱ्या गटातील निर्बंध कायम राहतील असे मुंबई महापालिकेचे इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे. आजपासून २७ जूनपर्यंत मुंबईतील तिसऱ्या गटातील निर्बंध कायम असणार आहे.


दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला


मराठा, ओबीसी आरक्षणासाठी कोर्टात लढताना केंद्र सरकारची नितांत गरज – छगन भुजबळ


काही जण मराठा आणि ओबीासी समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत बरे नाही. मराठा आणि ओबीसी समाज अडचणीत आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारले आणि ओबीसीचे होते ते आरक्षण कोर्टाने रद्द केले. दोन्ही समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जोताय,असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.


मराठा समाजाच्या नाशिकच्या आंदोलनस्थळी छगन भुजबळ दाखल


संभाजीराजे छत्रपती नाशिकच्या आंदोलनस्थळी दाखल


शिवसेनेला अजून तरी गटबाजीने पोखरलेलं नाही – संजय राऊत


देशात २४ तासात ५३,२५६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तब्बल ८८ दिवसांनी देशात इतक्या कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १,४२२ जणांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात ७८,१९० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.


कोल्हापूरनंतर मराठा समाजाचे नाशिकमध्ये मूक आंदोलन. खासदार संभाजीराजेंच्या उपस्थितीत हे मूक आंदोलन केले जाणार आहे. सहभागी आंदोलकांनी काळे कपडे परिधान करुन कोरोनाचे सर्व नियम पाळून हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते आपली भूमिका मांडणार आहेत. आज दुपारी १ नंतर संभाजीराजे जनतेशी संवाद साधणार आहेत.


जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये LeTचा टॉप दहशतवादी मुदासिर पंडितसह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश


आजपासून लसीकरणाचे नवीन धोरण लागू करण्यात येणार आहे. आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना प्राधान्यांने लस देण्यात येणार आहे. लसींची उपलब्धता आणि गर्दी टाळण्यासाठी आज केंद्राच्या नव्या धोरणाटी अंबलबजावणी करण्यात येणार आहे.


केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्लीच्या महाराजा अग्रसेन पार्क येथे योगा करुन साजरा केला योग दिवस


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात योगा करुन साजरा केला योग दिवस


जम्मू काश्मिरमध्ये CRPFच्या जवानांनी केला योगभ्यास


आज सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. प्राणायामामुळे श्वसनक्रिया बळकट होते. योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवा. घरी राहून योगा करा असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

- Advertisement -