घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत गेल्या २४ तासात ७४२ जणांनी केली कोरोनावर मात

Live Update: मुंबईत गेल्या २४ तासात ७४२ जणांनी केली कोरोनावर मात

Subscribe

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने (एनसीएलटी) जेट एअरवेजसाठी कालरॉक-जालान कन्सोर्टियमचा प्रस्ताव म्हणजेच ठराव योजनेला २२ जून रोजी मान्यता


राज्यातील आज नव्या कोरोना रुग्णांसह, मृत रग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्य संख्येतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे ६ हजारांवर पोहचलेली रुग्णसंख्या आज ८ हजारांच्या वर पोहचली आहे. तर मृतांची संख्याही दुप्पट झाली आहे. त्यामुळे एकंदरीत राज्यातील कोरोना आकडेवारीचा ग्राफ पुन्हा वर गेला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार ४७० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९ हजार ०४३ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहे. तसेच १८८ कोरोनाबाधितांनी प्राण गमावले आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्क्यावर पोहचला आहे.

- Advertisement -

जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावातील इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करता येतील का? याची शक्यता विभागाने तपासून पहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले.

- Advertisement -

 

उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शालेय शिक्षण विभागाची बैठक पार पडली. बैठकीत जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावांमधील १० वी तसेच १२ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.


गेल्या २४ तासात ५७० नव्या रूग्णांचे निदान, १० जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली तर दिलासा म्हणजे ७४२ जणांनी केली कोरोनावर मात केली आहे.


भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचा तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलचा डाटा समोर आला आहे. वृतसंस्था एएनआयनं सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या ७७.८  टक्के प्रभावी


महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. दलित अत्याचार रोखण्याकडे महाविकास आघाडी सरकार ने अधिक लक्ष द्यावे यासह विविध मागण्यांसाठी आज केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली


कल्याण नजीक आंबिवली, अटाळी परिसरात अनेक दिवसांपासून पाणी टंचाई आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. यासाठी केडीएमसीच्या अ प्रभागात शिवसेनेच्या नगरसेविका आणि पदाधिकारी अ प्रभाग कार्यालयात ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या नगरसेविका हर्षाली थविल, लीलाबाई तरे, शाखा प्रमुख ऋषिकांत पाटील एवढेच नव्हे तर शिवसेनेचे माजी नगरसेवक दशरथ तरे आणि दुर्योधन पाटील हे देखील सहभागी झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून केडीएमसीत शिवसेनेची सत्ता असताना देखील शिवसेनेच्या चार चार माजी नगरसेवकांवर पाणी टंचाईसाठी आंदोलनाची वेळ आली आहे. यामुळे राजकीय चर्चा रंगली आहे. तर लवकरात लवकर ही समस्या सोडविण्याचे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले.


मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल, संभाजी छत्रपती यांची माहिती


खासदार नवनीत राणा यांना खोट्या जात प्रमाणपत्राप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी आता २७ जुलै रोजी होणार आहे.


राज्य विधिमंडळच पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै रोजी होणार आहे. यंदाचे अधिवेशवन केवळ दोन दिवसांचेचं असणार आहे. अधिवेशनात प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी होणार नाहीत.


कोरोनाचा बहाणा पुढे करुन अधिवेशन टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारकडून अधिवेशन टाळण्याचा प्रयत्न करत आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनात काय चर्चा होणार?  राज्यासमोर आज अनेक मोठे प्रश्न असताना सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकारकडून लोकशाही गुंडाळून ठेवण्याचा प्रकार आहे. सरकार आहे की तमाशा. सध्या सरकारची नौकंटी सुरु आहे – देवेंद्र फडणवीस


निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने परमबीर सिंग यांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.


शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना ह्रदयविकाराचा झटका झाला आहे. सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात ICUमध्ये आहेत. मुलांकडून होणारा मानसिक छळ असह्य झाल्याने विजय शिवतारे यांची दयनीय अवस्था झाल्याचा आरोप त्यांच्या मुलीने केला आहे.


१०० कोटींच्या वसुलीबाबत सचिन वाझे यांची न्या.चांदिवालसमोर यांच्या समोर जबाब नोंदणी सुरु आहे. शंभर कोटी रुपयांच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्यसरकारने चांदिवाल आयोगाची नेमणूक केली. या आयोगाने सचिन वाझे यांना समन्स बजावून न्यायलयात हजर राहण्याचे आदेश दिले. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाबाबत सचिन वाझे काय जबाब देणार याकडे सर्वांकडे लक्ष आहे.


देशात कोरोनाची लाट कमी होत असली तरी मध्यप्रदेश त्याचप्रमाणे महाराष्ट्राला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. राहुल गांधी कोरोनावर संपूर्ण परिस्थिती पाहता एक श्वेत पत्र तयार केले आहे. ज्यात त्यांनी मोदी सरकारला चार मुद्द्यांच्या आधारे कोरोना व्हायरससह लढण्यासाठी सल्ले दिले आहेत.


सरकारने तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सज्ज रहावे. दुसऱ्या लाटेत सरकार तयार नव्हते. सरकारने कोरोनाबाबत उपाययोजना केल्या नाहीत. आता दुसऱ्या लाटेतील चुका दुरुस्त करा. यावेळी शास्रज्ञांच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पहावे – राहुल गांधी


कोल्हापूरात मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. कोल्हापूरात मराठा आरक्षणासाठी ताराराणी चौकात चक्काजाम आंदोलन केले जात आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार ६४० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. १,१६७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ८१,८३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. (सविस्तर वाचा ) 


२४ जूनला नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरुन सिडको घेराव आंदोलन केले जाणार असून नवी मुंबईत जड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. ठाणे बेलापूर रस्त्यावरील वाहतूक वेगळ्या मार्गाने वळवली जाणार आहे. नवी मुंबईत उद्या सकाळी ८ ते गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.


शरद पवार यांनी प्रमुख विरोधी पक्षांचे नेते आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी बैठक होणार आहे. पुढच्या निवडणूकांसाठी विरोधकांची मोट बांधली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


राज्यात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे सरसकट लसीकरण न करता टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -