घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात आज १०, ०६६ नवे रुग्ण, तर १६३ रुग्णांचा मृत्यू

Live Update: राज्यात आज १०, ०६६ नवे रुग्ण, तर १६३ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

राज्यातील कोरोना आकडेवारीत आज पुन्हा वाढ झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ०६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर १६३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याचबरोबर ११ हजार ०३२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ५ वर्षे पुर्ण करतील- संजय राऊत

- Advertisement -

७ जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस विषाणुचे रुग्ण सापडले- राजेश टोपे


प्रदीप शर्मा यांच्या पी.एस फाउंडेशनवर NIA कडून पुन्हा छापेमारी

- Advertisement -

आधी आरक्षण मार्गी लावा, त्यानंतरचं निवडणुका घ्या- देवेंद्र फडणवीस, आज भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आरोप केले. ZP, पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप OBC उमेदवारच देणार अशी घोषणाही यावेळी फडणवीसांनी केली आहे.


राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता असे १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केला.


कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना बॉम्बे डाईंगमध्ये घरं मिळणार – जितेंद्र आव्हाड


दहावी,बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी एसओपी तयार करणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. कोरोनामुक्त आणि नियम पाळणाऱ्या गावांत दहावी बारावीचे वर्ग सुरु होणार – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड


पाकिस्तानातील लाहोरमध्ये दहशतवादी हाफीज सईदच्या घराबाहेर मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात १० जण जखमी झाले असून त्यांना लाहोरमधील जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (सविस्तर वाचा )


राज्यात काल, मंगळवारपर्यंत २ कोटी ८६ लाख ४५ हजार ७५३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर २२ रोजी रोजी ५ लाख ५८ हजार ३६९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.


प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात आज तिसऱ्यांदा बैठक पार पडली


देशात कोरोना व्हायरसच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ४० रुग्ण आढळले आहेत. त्यातील सर्वात अधिक रुग्ण हे महाराष्ट्र,मध्य प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू येथून असल्याची माहिती समोर येत आहे.


म्हाडाने कॅन्सरग्रस्तांना दिलेल्या १०० खोल्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या हस्ते म्हाडाच्या खोल्यांच्या चाव्या देखील टाटा रुग्णालयाकडे सोपवण्यात आल्या होत्या. या विरोधात शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी इमारतीतील इतर रहिवाशांच्या अपेक्षांचे कारण देत तक्रार केली  त्यामुळे ही स्थगिती देण्यात आली आहे. मात्र राष्ट्रवादी पक्षासोबत कोणतीही चर्चा न करता स्थगिती दिल्याने नवे वाद होण्याची शक्यता आहे.


देशात गेल्या २४ तासात ५०,८४८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून १,३५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात ६८,८१७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. देशात सध्या ६,४३,१९४ अँक्टिव्ह रुग्ण आहेत


पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या पालखीला  ४० वारकऱ्यांना जाण्यास परवानगी देण्यात आलीय. वारी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची संख्या वाढणार नाही असे सांगण्यात आले आहे. तर देहू व आळंदीतील प्रस्थान सोहळ्याला १०० वारकऱ्यांनाच परवानगी देण्यात आलीय. वारीच्या दोन दिवस आधी सर्व वारकऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -