Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Live Update: रिव्ह्यू पिटीशन सरकार येत्या गुरूवारी दाखल करणार - संभाजीराजे

Live Update: रिव्ह्यू पिटीशन सरकार येत्या गुरूवारी दाखल करणार – संभाजीराजे

Related Story

- Advertisement -

संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

  • गायकवाड अहवालातील त्रुटी दुरूस्त कराव्यात
  • येत्या शनिवारी पुण्यात सारथीबाबत बैठक
  • समाजात योगदान असलेल्यांना सारथीवर घेणार
  • रिव्ह्यू पिटीशन सरकार येत्या गुरूवारी दाखल करणार
  • वसतिगृहासाठी २३ जिल्ह्यांची निवड केली असून वसतिगृह बांधणीसाठी सरकार पैसे देणार
  • सुपरन्युमररीवर १४ दिवसांत निर्णय
  • कोपर्डीतील केसमध्ये स्पेशल बेंचची मागणी
  • मराठा आंदोलनाबाबत समन्वयकांशी चर्चा करणार
  • खासदार संभाजीराजे छत्रपती दोन आठवडे आंदोलन स्थगित करणार
  • सरकारने दिलेल्या आश्वासनांनातर आंदोलन स्थगित करणार

जागतिक कसोटी विजेतेपद फायनलसाठी भारताचा अंतिम संघ जाहीर


मुंबई पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स सेलने एका ड्रग पेडलरला अटक केले आहे. या पेडलरकडे अंदाजे ५० लाख रुपयांच्या २ किलो चरससह अटक केली आहे. आरोपीला २१ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -


शाळेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. विद्यार्थ्यांच्या जन्म प्रमाणपत्रवर शाळा प्रवेश देण्यात यावा, असा महत्वपूर्ण निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना एल.सी./टी.सी. अभावी प्रवेश नाकारु नये. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक आणि शाळाप्रमुख यांच्याविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही विभागाने दिला आहे.


- Advertisement -

राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, शिक्षकांना रेल्वे प्रवासी मुभा

इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाशी संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतचा शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला होता. सदर प्रस्तावास मा. मुख्यमंत्री, श्री. उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे


सर्वांचीच अर्थिक स्थिती नाजूक आहे.कोरोना काळात मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढ लादणार नाही, असे स्पष्टीकरण महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे. कोरोनामुळे लाखो, कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्यवसाय, रोजगार बंद पडले आहेत. मुंबईकर आर्थिक संकटात सापडले आहेत. अशातच मुंबई महापालिकेने पुढील वर्षीपासून मालमत्ता करात १४% ते २५% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे


पालघर, ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस


विरार पूर्व भागात ३ जनावरं पावसाच्या पाण्यात वाहून गेली. वसई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून २ जनावरांना वाचवण्यात यश आलं आहे. १ जनावराचा शोध अद्याप सुरू आहे.


पुढील दोन तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा आणि रत्नागिरीला आज हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र, पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मुलांसाठी नोव्हावॅक्स लसीची क्लिनिकल चाचणी सुरू करण्याचा विचार करीत आहे. जुलैपासून सीरम इन्स्टिट्यूट संस्था कोविड -१९ या लसीची चाचणी सुरू करणार


प्रदीप शर्माला २८ जून पर्यंत NIA कोठडी


आज संध्याकाळी ५ वाजता राज्याचे मुख्यमंत्री आणि संभाजीराजे छत्रपती यांची वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे.


रेवदंडामध्ये बुडालेल्या बार्जमधून १५ खलाशांना सुखरुपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. चेतक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने खलाशांना बाहेर काढण्यात आले.


आंदोलने करताना आमच्या श्रद्धास्थानाशी वाकड्या नजरेने पाहू नका. आंदोलन करण्यासाठी वेगळ्या जागा आहेत. शिवसेनेच्या हिंंमतीची परीक्षा करु नका – संजय राऊत


राज्यपालांनी १२ सदस्यांची नियुक्ती मार्गी लावावी ही अपेक्षा – संजय राऊत


राज्यपाल राज्याचे वडीलधारे नेते – संजय राऊत


राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनात.


नाशिक द्वारका चौकात ओबीसी आंदोलनकर्त्यांनी वाहतूक रोखली


नाशिकमध्ये ओबीसी आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात


नाशिक द्वारकामध्ये ओबीसींचा रास्तारोको


नागपूरात काल ईडीचे तीन ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. दोन CA आणि एक कोसळा व्यापाऱ्याच्या कार्यालय आणि घरावर ही छापेमारी करण्यात आली आहे. तिघेही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संपर्कात असल्यामुळे ED ने तिघांच्या घरी छापेमारी केली आहे.


बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला CBSEकडून सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यात आला आहे. CBSE बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण ग्राह्य धरणार


पालघरमध्ये डहाणू येथीस डेहणे येथील फाटाका कंपनीच्या बाजूला मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने पालघर परिसर हादरले आहे.


पुणे-इंदौर महामार्गावर ओबीसींचा रास्तारोको. संतप्त कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी


मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी


मुंबई शहर आणि उपनगरात पुढील ३-४ तास मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात उत्तर कोकणाजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मुंबई,ठाण्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


लोणावळ्यातील एका रिसॉर्ट मध्ये एनआयएच्या एका टीमने प्रदीप शर्माला ताब्यात घेण्यात आलेय. प्रदीप शर्मा याला घेऊन टीम मुंबईकडे रवाना झाली आहे.


देशात गेल्या २४ तासात ६७,२०८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १ लाख ३ हजार ५७० रुग्ण बरे होऊन घरी असून २ हजार ३३० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.


एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी सकाळी ६ वाजल्यापासून NIAची छापेमारी


अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि मनसूख हिरेमन मृत्यूप्रकरणी प्रदीप शर्मा रडारवर. मनसुख हिरेन प्रकरणी NIAकडून तपास सुरु. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील राहत्या घरावर NIA ने छापेमारी केली.


आज नाशिकमध्ये ओबीसींचा रास्तारोको असणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी काल अशी घोषणा केली. मराठा समाजानंतर ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरणार आहे.


रत्नागिरीच्या निवळी घाटात वाहतूक सुरळीत


पंचगंगेची पातळी १२ तासांत १० फुटांनी वाढली आहे. सलग तीन दिवसांपासून कोल्हापूरात  पावसाचा जोर कायम आहे. राजाराम बंधाऱ्यासह १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.


रत्नागिरीच्या निवळी घाटात वाहतूक ठप्प झाली आहे. या घाटात दरड कोसळ्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मध्यरात्री २ वाजल्यापासून वाहतुकीच्या खोळंबा झाला आहे. मुरळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. अजूनही वाहतूक पूर्ववत झालेली आहे.

- Advertisement -