Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Live Update : मलिकांविरोधातील ईडीची कारवाई नियमानुसार- देवेंद्र फडणवीस

Live Update : मलिकांविरोधातील ईडीची कारवाई नियमानुसार- देवेंद्र फडणवीस

Subscribe

ईडीच्या कारवाईत सत्यता आहे- देवेंद्र फडणवीस (सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

मलिकांविरोधातील ईडीची कारवाई नियमानुसार- देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

नवाब मलिकांच्या व्यवहारानंतर मुंबईत तीन वेळा बॉम्बस्फोट झाले- फडणवीस

अंडरवर्ल्डच्या माध्यमातून नवाब मलिकांनी जमीन खरेदी केली आहे- फडणवीस


- Advertisement -

मंत्री नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी (सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

नवाब मलिक यांना घरचे जेवण आणि औषध घेण्याची परवानगी


3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावल्यानंतर नवाब मलिकांचे नवे ट्विट


एकेका मंत्र्याला कोंडीत पकडून खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरु – भुजबळ (सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

मलिकांच्या राजीनाम्याचा आसुरी आनंद भाजपला घेऊ देणार नाही- छगन भुजबळ

उद्या 10 वाजता महात्मा गांधी पुतळ्याजवळ  महाविकास आघाडीचे सर्व नेते धरणं आंदोलन करणार – भुजबळ

महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे सर्व मंत्री, आमदार निषेध करतील- भुजबळ

मलिकांवरील कारवाईतून मंत्र्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न – छगन भुजबळ

मलिकांच तोंड बंद करण्यासाठी हा सर्व प्रकार – छगन भुजबळ

मलिकांना अटक ही दुर्दैवाची गोष्ट आहे- छगन भुजबळ


महाविकास आघाडीशी समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू; मलिकांच्या अटकेवर राऊतांचे ट्विट

महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊ द्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू. कंस आणि रावण सुध्दा मारले गेले…हेच हिंदुत्व आहे..
जय महाराष्ट्र!


मलिकांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी आणि शरद पवारांमध्ये थोड्याच वेळात होणार बैठक


राज्यात आज कोरोनाचे 1151 नवे रुग्ण, 23 रुग्णांचा मृत्यू; मात्र ओमिक्रानबाधितांची संख्या शून्यावर (सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा)


मुंबईत आज १६८ नवे कोरोनाबाधित रुग्ण तर मृतांची संख्या शून्य


ईडीचे अधिकारी दोषी ठरवत असतील तर न्यायालयाची गरज काय? अमित देसाईंचा युक्तीवाद


जल्लोष करताना तलवार दाखवल्या प्रकरणी मोहित कंबोजविरोधात गुन्हा दाखल


ईडीकडून मलिकांची 14 दिवसांची कोठडीची मागणी


मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सिल्व्हर ओकच्या दिशेने रवाना


3 फेब्रुवारी रोजी दाऊदविरोधात गुन्हा दाखल केला, ईडीची कोर्टात माहिती


नवाब मलिक सेशन कोर्टात हजर

ईडी नवाब मलिक यांची कस्टडी मागण्याची शक्यता

नवाब मलिक यांची बहीण सहिदा खान ईडी कार्यालयात दाखल

मेडिकल चाचणी झाल्यानंतर ईडी अधिकारी नवाब मलिकांना घेऊन कोर्टाकडे रवाना


गंगूबाई काठियावाडी सिनेमाविरोधातील २ याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली


शरद पवार आणि गृहमंत्र्यांची आज संध्याकाळी बैठक


नवाब मलिकांना घेऊन ईडी अधिकाऱ्यांसोबत जे. जे. रुग्णालयात पोहोचले


नवाब मलिक यांना ईडीकडून अटक


नवाब मलिकांना मेडिकल तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेले


नवाब मलिकांच्या अटकेनंतर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी


मेडिकल तपासणी करण्यासाठी नवाब मलिक ईडी अधिकाऱ्यांसोबत रवाना


ईडीकडून नवाब मलिकांच्या अटकेची कारवाई


८ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक ईडी कार्यालयाबाहेर


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो झोप लागत नसेल तर डॉक्टरकडे जा, गैरपद्धतीने सरकार पाडण्याचे प्रयत्न थांबवा – माजिद मेमन


17 वर्षांचं प्रकरण आता का काढलं? ईडीला कोर्ट पण विचारेल – माजिद मेमन


Pmla मध्ये अधिकाऱ्यांना अधिक अधिकार आहेत. जिथे अधिकार जास्त अधिकारी त्याचा दुरुपयोग करतात. हे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. शरद पवारांना देखील असेच केले होते. अशा गुन्ह्यांमध्ये तपास यंत्रणेला जे काही पुरावे मिळाले आहेत, त्याचे पुरावे, तपास गुप्त असायला हवा.  पण जे काही अधिकारी करत आहेत ते जाहीर पणे करतायत,
कायद्याचं उल्लंघन करत आहेत – माजिद मेमन


PMLA कायद्यानुसार ईडी काम करतंय, त्याचा दुरुपयोग ईडी करत नाही असं सीतारामन सांगतात. सीतारामन जी तुम्ही अर्थमंत्री आहात, गृहमंत्री नाही – माजिद मेमन


आश्चर्य वाटलं की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ईडी चुकीचं करत नाही हे सांगावं का लागलं ? फडणवीस आणि भाजपच्या लोकांनी बरेच प्रयत्न करून सरकार त्यांचे बनले नाही. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करते आहे.


मविआ सरकार पाडण्याचा फडणवीसांचा डाव – माजिद मेमन


नवाब मलिकांची जागा अनिल देशमुखांच्या कोठडीत – अनिल बोंडे


मलिकांच्या ईडी कारवाईवर सध्या बोलण्यास चंद्रकांत पाटील यांचा नकार


नवाब मलिकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे ईडी कार्यालयासमोर आंदोलन


राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या तक्रारीवरुन मुंबई NCBचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.


ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुंबईकडे रवाना


नवाब मलिकांच्या घराबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा झाले आहेत.


नवाब मलिक सतत विरोधात बोलत असल्याचे त्यांची ईडी कारवाई केली जात आहे. त्यांची ईडी कारवाई होणार हे आम्हाला माहिती होते. सत्य भूमिका मांडणाऱ्यांना त्रास देण्याचा हा प्रयत्न सुरू आहे – शरद पवार


नवाब मलिकांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली असून पोलिसांनी मलिकांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.


EDच्या प्रत्येक अधिकाऱ्याचं पितळ उघडे पाडणार – संजय राऊत


२०२४ नंतर जे होईल ते पाहण्यासाठी तपास यंत्रणांनी तयार रहा – संजय राऊत


नवाब मलिक यांची २ तासापासून ED चौकशी सुरू आहे.


नवाब मलिकांच्या घरी सकाळी ४:३० वाजल्या पासून छापेमारी सुरू


देशात मागील २४ तासात १५,१०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३१,३७७ कोरोना रुग्णा बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचप्रमाणे २७८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या १,६४,५२२ अँक्टिव्ह रुग्णा आहेत.


नवाब मलिक यांची ED कडून चौकशी सुरू


नावाब मलिक ED कार्यालयात दाखल


सुशोभिकरणावरुन मनसे आणि शिवसेने शिवाजी पार्कात आमने सामने


नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावर आज सुप्रीम कोर्टात निर्णय


किरीट सोमय्या आज दुपारी १२ वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. ठाकरे कुटुंबियांच्या कथित १९ बंगले घोटाळ्यासंदर्भात राज्यपालांची भेट घेणार आहेत.

- Advertisment -