घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत गेल्या २४ तासात ५५८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Live Update: मुंबईत गेल्या २४ तासात ५५८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Subscribe

मुंबईत तीन दिवसांच्या ब्रेकनंतर उद्यापासून पुन्हा लसीकरण सुरू होणार आहे. मुंबईतील लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरु होणार आहे. सध्या मुंबईत १ लाख ३५ हजार लसीचे डोस उपलब्ध


मुंबईत गेल्या २४ तासात ५५८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज १५ जणांचा कोरोनाने जीव गेला. मुंबईत आतापर्यंत १५ हजार ६२७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. सध्या मुंबईत ११ हजार ४२३ सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.

- Advertisement -

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आज वाढल्याचे समोर आले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार ५३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १५६ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६१ लाख ५७ हजार ७९९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २५ हजार ८७८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख १६ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


महाराष्ट्रातील ज्येष्ठ गझलकार, पत्रकार, सिंधुदुर्गचे सुपुत्र मधुसूदन नानिवडेकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले

- Advertisement -

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक सुरु आहे. या बैठकीत पंकजा मुंडे, विनोद तावडेंसह मोठे नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी हजेरी लावली.


मुंबईच्या माहिम परिसरात काल रात्री NCBने कारवाई केली असून मोठ्या प्रमाणात चरस सारख्या अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांना NCB ने ताब्यात घेतले आहे.


केरळ राज्यात कोरोनाच्या नव्या झिका व्हायरसचा एका नवीन रुग्णाची नोंद झाली असून केरळ राज्यात झिका व्हायरसचे एकूण १५ रुग्ण आढळून आले असल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे.


आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौरा आहेत. मनसेच्या शहर कार्यालयाचे राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर १६ ते १८ जुलैला ते नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -