घरCORONA UPDATEकाळजी घ्या! राज्यात आजही हजारपेक्षा जास्त नव्या कोरोनाबाधितांची नोंद, एकाचा मृत्यू

काळजी घ्या! राज्यात आजही हजारपेक्षा जास्त नव्या कोरोनाबाधितांची नोंद, एकाचा मृत्यू

Subscribe

राज्यात आज १०५४ नवे बाधित सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona) रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १०५४ नव्या बाधितांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू (Corona Death) झाला आहे. तर, दिवसभरात ५१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात रिकव्हरी रेट (Recovery Rate) ९८.०७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात एका मृत्यूची नोंद झाल्याने मृत्यूदर (Death Rate) १.८७ टक्के झाला आहे. ८ कोटी ९ लाख ७७ हजार ९०८ नमुन्यांपैकी ७८ लाख ८९ हजार २१२ नमुने आतापर्यंत पॉझिटीव्ह (Positive) आले आहेत. तर, सध्या राज्यात ४ हजार ५५९ रुग्ण सक्रीय आहेत.

- Advertisement -

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात हजाराच्या वर रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने (Mumbai Corporation) खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात केली असून लसीकरणावर (vaccination) भर देण्यात आला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनीही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगितले. मात्र, व्हेटिंलेटर आणि ऑक्सिजन बेडवर असलेले रुग्ण कमी असल्याचीही माहिती त्यांनी दिली. दरम्यान, गरज पडल्यास पुन्हा मास्कसक्ती करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

टास्क फोर्सच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही जनतेला आवाहन केलं आहे. सध्या मास्कसक्तीची गरज नाही. मात्र, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुढील आठ ते दहा दिवस महत्त्वाचे असणार असून आकडेवारी बघून मास्कसक्ती करायची की नाही यावर निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -