घरCORONA UPDATECorona Live Update : मुख्यमंत्री आज सायंकाळी जनतेला संबोधित करणार

Corona Live Update : मुख्यमंत्री आज सायंकाळी जनतेला संबोधित करणार

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ०८ मे २०२० रोजी रात्री ८:०० वा. जनतेला संबोधित करणार आहेत. देशात लॉकडाऊन ३.० सुरू आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय संदेश देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येत्या १७ मे रोजी लॉकडाऊनचा काळ संपणार आहे. मात्र राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता मुख्यमंत्री काय निर्यण घेणार, त्याबाबत काही संकेत देणार का हे आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये समजेल.


भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात असून त्याचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या ट्वीटनुसार गुरुवारी रात्रीपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या १७ हजार ९७४ झाली होती. गुरुवारच्या एकाच दिवसात तब्बल १२१६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. एकूण ३ हजार ३०१ रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत.

- Advertisement -

गेल्या २४ तासांमध्ये देशभरात तब्बल १०३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. त्यामुळे देशातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ५६ हजार ३४२वर जाऊन पोहोचला आहे. यामध्ये ३७ हजार ९१६ अॅक्टिव्ह पेशंट असू १६ हजार ५३९ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत १ हजार ८८६ रुग्णांचा कोरोनामुळे देशभरात मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

जगभरात सध्या अमेरिकेला कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. आत्तापर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे ७५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १२ लाख ९२ हजार ६२३ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. गेल्या २४ तासांत अमेरिकेत २ हजार ४४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -