हुऽश्शऽऽ ब्रिटनहून आलेल्या २० जणांचा कोेरोना अहवाल निगेटिव्ह

Corona Test: new method of testing corona will diagnose in a second,researchers say

नगर । ब्रिटनहून नगरमध्ये २५ जण आल्याने प्रशासनाचे टेन्शन वाढले होते. या सर्व नागरीकांची कोरोना चाचणी करण्यात आली असता यातील २० जणांचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला असून प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. अजूनही पाच जणांचे अहवाल प्रलंबित असून नागरीकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्याने राज्य शासनाकडून अर्लट देण्यात आला आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागु करण्यात आली आहे. ब्रिटनहून राज्यात आलेल्या प्रवाश्यांची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. तयानूसार नगर जिल्हयात २५ व्यक्ती आल्याची यादी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात विशेष सर्वेक्षणाअंती 19 व्यक्ती हया अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील तर 6व्यक्ती या ग्रामीण आढळून आलेल्या आहेत. या 25 व्यक्तीपैकी 20 व्यक्तीची आर.टी.पी.सीआर तपासणी करण्यात आली असून त्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. उर्वरीत पाच व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. अद्याप त्यांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

नागरीकांनी खबरदारी घ्यावी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेकामी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करावा व सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करावे.
राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी