घरCORONA UPDATELive Update: मुंबईत आज दिवसभरात आढळले २,३५२ नवे रुग्ण, ४३ जणांचा मृत्यू!

Live Update: मुंबईत आज दिवसभरात आढळले २,३५२ नवे रुग्ण, ४३ जणांचा मृत्यू!

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ३५२ नवे रुग्ण आढळले असून ४३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ७ हजार ४९४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ८ हजार ९६९ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ लाख ७० हजार ६७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या २७ हजार ४३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हाथरस सामुहिक बलात्कार विरोधात पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मशाल रॅली काढली

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत १६ हजार ४७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १४ लाख ९२२वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ३७ हजार ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


राज्यात २४ तासांत १८८ नवे कोरोनाबाधित पोलीस आढळले असून एका पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २३ हजार ५४८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २४७ जणांचा मृत्यू झाला असून २० हजार ३४५ पोलीस कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या २ हजार ९५६ पोलिसांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने दिली आहे.


धारावीत आज दिवसभरात १६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. त्यामुळे धारावीत कोरोनाबाधितांच्या आकडा ३ हजार १९२वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत २ हजार ७३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या १७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.


काँग्रेसचे जेष्ठे नेते आणि राज्यसभा खासदार अहमद पटेल यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच त्यांना काही दिवसांपासून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना आसोलेटेड होण्याचे विनंती केली आहे.


उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सामूहिक बलात्काराचा बळी झालेल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी देशभर संताप व्यक्त होत आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्यावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले, यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान राजकीय पक्षांनी यूपी सरकारला लक्ष्य केले असून या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसकडे पायी रवाना झाले आहेत.


भाजप नेते नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांनी ही माहिती स्वतः ट्विट करून दिली आहे. ते असे म्हणाले की, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.


Hathras Gangrape: राहुल-प्रियंका गांधी पीडित कुटुंबीयांच्या भेटीला निघाले

यूपीमधील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात राजकारण तीव्र झाले आहे. या प्रकरणात विरोधी पक्ष योगी सरकारला लक्ष्य करत आहे. या संदर्भात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आज हाथरस येथे जाणार आहेत. राहुल आणि प्रियंका येथे पोहोचून पीडित मुलीच्या कुटुंबाला भेट देणार आहेत.


जोगेश्वरी येथील शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण शिंदे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला


दिलासादायक! देशात कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ५२ लाखांपार


देशात आतापर्यंत एकूण ७ कोटी ५६ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या


अनुराग कश्यप वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल 

मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. त्यामुळे आता गेल्या वर्षी गाजलेल्या तनुश्री दत्ता वि. नाना पाटेकर प्रकरणाप्रमाणेच आता पायल घोष वि. अनुराग कश्यप हे प्रकरण देखील तापण्याची शक्यता आहे. अनुराग कश्यपला गुरुवारी सकाळी ११ वाजता वर्सोवा पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. (सविस्तर वाचा)


पुण्यात आज पहाटे आगीची घटना घडली असून पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीला ही आग लागली आहे. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून येथे कुलिंगचे काम सुरू आहे.


मुंबईतील चेंबूर रेल्वे स्थानकाजवळली मार्केटमध्ये आज, गुरूवारी सकाळी आगीची घटना घडली असून या ठिकाणी दहा अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या ठिकाणी आग विझवण्याचे काम सुरू आहे.


 

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव सातत्याने वाढताना दिसत आहे. जरी राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी मृत्यूदर काही कमी होताना दिसत नाही आहे. जागतिक क्रमवारीत कोरोना बळींच्या संख्येत राज्य सहाव्या क्रमांकावर आहे. राज्यातील कोरोना बळींच्या संख्येने इटलीला मागे टाकले आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १८ हजार ३१७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४८१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६वर पोहोचला. यापैकी आतापर्यंत ३६ हजार ६६२ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. पाचव्या अनलॉकमध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या ५ ऑक्टोबरपासून ५०% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -