घरCORONA UPDATELive Update: कोरोनाचा हाहाकार! जगात १० लाखांहून अधिक कोरोना बळी!

Live Update: कोरोनाचा हाहाकार! जगात १० लाखांहून अधिक कोरोना बळी!

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ५५ नवे रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ७७५वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ८ हजार ८३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

संपूर्ण जगातील कोरोना विषाणूने थैमान घातले आहेत. जगात कोरोनामुळे १० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारी, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ कोटी ३३ लाख ६१ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत १० लाख ३ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २ कोटी ४६ लाख ६८ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात गेल्या २४ तासांत ११ हजार ९२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १८० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३ लाख ५१ हजार १५३वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ३५ हजार ७५१ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 

- Advertisement -

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली असून आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. जनतेचे प्रेम व सर्वांच्या शुभेच्छांबरोबरच या काळात योग्य आहार, योग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि वाचन यामुळे लवकर बरे होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमा निमित्ताने दि. १५,१६, १७ सप्टेंबर या कालावधीत त्या नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांच्या दौ-यावर होत्या. या दरम्यान त्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्या होत्या. दिनांक २१ सप्टेंबर रोजी त्यांना ताप आल्यामुळे कोविड-१९ ची टेस्ट करुन घेतली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी ब्रीच कॅण्डी इस्पितळात दाखल होऊन औषधोपचार घेतले. आज दि. २८ सप्टेंबर रोजी त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

कोविड -१९ चे निदान झाल्यानंतर योग्य ते उपचार घ्यावेत, सकारात्मक भावना ठेऊन ध्यान धारणा करावी. तसेच आपल्यामुळे इतरांना प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन प्रा. गायकवाड यांनी केले आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या बाबी आणि मुख्य विषयांवर चर्चा झाली.


मुंबईतील सुप्रसिध्द मुर्तीकार राजन खातू यांचे आज सकाळी वयाच्या ५८ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. वयाच्या सोळाव्या वर्षापासून मूर्तिकार राजन खातू हे गणपती क्षेत्रात आपल्या वडिलांसोबत आणि दोन्ही वडील बंधूंसोबत कार्यरत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा निखिल आहे.

आज दुपारी २ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी विविध मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते, अनेक राजकीय पक्षांचे मान्यवर, मित्र परिवार आणि कुटुंबीय हजर होते.


सुप्रसिद्ध गीतकार अभिलाष यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. अखेर सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘अंकुश’ या हिंदी चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमें देना दाता…’ ही अभिलाष यांच्या लेखणीतून साकारलेली प्रार्थना प्रचंड लोकप्रिय आहे. तसेच त्यांनी पटकथा आणि संवाद लेखक म्हणूनही योगदान दिले आहे. यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.


 राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण

राज्याचे प्रधान सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही महिन्यात मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या दालनातील अधिकारी आणि मंत्र्यांनाही कोरानाची लागण झालेली आहे. त्यानंतर आता संजयकुमार यांनाही कोरोना झाला आहे. काल रात्री मुख्य सचिवांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मुख्य सचिवांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची खबरदारी म्हणून नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात एक जण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने मुख्य सचिवांनी आपली ही चाचणी करून घेतली. त्यात त्यांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे.


राज्यात आत्तापर्यंत २२,८१८ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

दिवसेंदिवस कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कोरोना योद्धांमध्ये होताना दिसत आहे. सामान्य नागरिकांसाठी या संकटात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. मागील २४ तासांत राज्यातील तब्बल १८९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४ पोलिसांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईमधील अंधेरी परिसरात असलेल्या इमारतीला आग असल्याची माहिती समोर येत आहे. या भागात अग्निशमन दलाची कारवाई सुरू असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. यासह कोणतीही जीवितहानी झाली नाही.


Kangana Ranaut property demolition matter: मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू


काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला कोरोनाची लागण

काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील हे मागील आठवड्यात गुरुवारी एक दिवस मुंबईत होते. पाटील यांनी राज्यातील काँग्रेस वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकही घेतली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, सत्यजित तांबे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान कृषी कायद्याचा विरोध करत आज काँग्रेसचे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटणार होते.

एच.के.पाटील यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे पाटील यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.


देशात २४ तासांत ८२ हजारांहून अधिक कोरोनाचे नवे रूग्ण

भारतात कोरोनाचा वाढता कहर अद्याप सुरूच असून दररोज कोरोनाचे नवे रुग्ण वाढत आहे. सोमवारी कोविड -१९ च्या रूग्णांची संख्या ६० लाखांच्या पुढे गेली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात कोरोनाचे ८२ हजार १७० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर या काळात व्हायरसमुळे १ हजार ३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


देशात दिवसभरात ७ लाख ९ हजारांहून अधिक कोरोना चाचण्या


कोल्हापुरात असलेल्या सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला भीषण आग लागल्याचे समजतेय. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना ही मोठी दुर्घटना घडली. पहाटेच्या सुमारास अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये आग लागल्याने आगीचा धूर होता. (सविस्तर वाचा)


देशात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या कोरोना चाचणीवर अधिक भर दिला जात आहे. म्हणूनच देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढता दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ८८ हजार ६०० नवे रुग्ण आढळले असून १ हजार १२४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ५९ लाख ९२ हजार ५३३वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ९४ हजार ५०३ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -