घरCORONA UPDATECorona Live Update: राज्यात सर्वाधिक १०५ रुग्णांचा मृत्यू

Corona Live Update: राज्यात सर्वाधिक १०५ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

धारावीत दिवसभरात केवळ १८ बाधित रुग्ण!

मागील महिन्यापासून कोरोनाने कहर माजवलेल्या धारावीत आता या साथीचा आजार काढता पाय घेण्याच्या तयारीत असण्याची चिन्हे दिसत आहेत. आतापर्यंत दिवसाला ९० पर्यंत रुग्णसंख्या गेलेल्या धारावीत आता सरासरी रुग्णांचा निर्देशांक कमी होताना दिसत आहे. दिवसभरात धारावीत केवळ १८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत १८ आणि १९ एप्रिल रोजी रुग्णांची संख्या एवढी आढळून आली होती. सव्वा महिन्यात धारावी पूर्वपदावर येण्याची चिन्हे या कमी झालेल्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहेत. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

राज्यात सर्वाधिक १०५ रुग्णांचा मृत्यू

कोरोनामुळे महाराष्ट्रातली परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक चिंतेची होऊ लागली आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात तब्बल १०५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रभरातल्या मृतांचा आकडा १८९७ वर गेला आहे. याशिवाय, राज्यात तब्बल २१९० नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या ५६ हजार ९४८ झाली आहे. यापैकी आज दिवसभरात ९६४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या बाधितांची संख्या आता १७ हजार ९१८ इतकी झाली आहे. यानुसार राज्यात आजघडीला कोरोनाचे ३७१२५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

ठाणे महापालिका क्षेत्रात बुधवारी नवीन १५६ करोनाबाधित रूग्णांची नोंद झाली त्यामुळे करोनाबाधित रूग्णांची संख्या २४५० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे बुधवारी १८७ रूग्ण हे बरे होऊन घरी परतले त्यामुळे आतापर्यंत १०७७ रूग्ण बरे झाले असून हि दिलासादायक बातमी आहे. ठाण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ठाणे येथील बाळकुम भागात युध्दपातळीवर उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटर ला आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. या सेंटरमध्ये १००० बेड्सची व्यवस्था असून ५०० ऑक्सिजन, ५०० नॉन ऑक्सिजन तसेच ८० आयसीयू बेड्सची सुविधा उपलब्ध असणार आहे. आठवडाभरात हे कोविड सेंटर हे ठाणेकर जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे.

चार दिवस कळवा संपूर्ण लॉकडाऊन

कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात करोनाग्रस्त रूग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून संपूर्ण कळवा प्रभाग समिती २८ मे ते ३१ मे २०२० या चार दिवसांच्या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने पूर्णत: बंद राहणार आहेत. लॉकडाऊनचे पालन न करणा-या दुकानादांरावर तसेन नागरिकांवर व वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पालिकेने जाहिर केले आहे.


कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत तब्बल ५७  नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या या ५७  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या ८८२ झाली आहे. यापैकी आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून २८६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ५७० रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.


नाशकात ५३ नवे रुग्ण पॉझिटिव्ह

नाशिक जिल्हा प्रशासनास बुधवारी (दि.२७) दिवसभरात ५३ रुग्ण करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये ३ रेल्वे पोलीस, ६ पोलीस कर्मचारी आहेत. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पंचवटी परिसरातील क्रांतीनगर,रामनगर व सरस्वतीनगर या भागातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. या परिसरात औषध फवारणीसह सार्वजनिक शौचालयांमध्ये स्वच्छता ठेवावी, अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना केली आहे. आता नाशिक जिल्ह्यात एकूण १ हजार ५४ रुग्ण बाधित आहेत. यामध्ये नाशिक शहरात १३५ व मालेगावत ७१५ रुग्ण आहेत. (सविस्तर वाचा)


पीपीई किट्स, जीएसटीबद्दलचे सरकारचे दावे खोटे

एकीकडे राज्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधक मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच व्यस्त असल्याचं दिसत आहे. मंगळवारी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सत्ताधारी महाविकास आघाडीवर कोरोनाविरोधात लढा देण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत अनेक प्रकारची आकडेवारी देऊन आरोप केले. त्यावर आज संध्याकाळी सत्ताधाऱ्यांकडून सविस्तर आकडेवारी देत उत्तर देण्यात आलं. अनिल परब, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात या तिघा मंत्र्यांनी त्यासाठी जाहीर पत्रकार परिषद घेतली. मात्र, ही पत्रकार परिषद झाल्यानंतर पुन्हा अवघ्या २ तासांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह येत यातल्या काही मुद्द्यांना खोडून काढलं आहे. (सविस्तर वाचा)


हेल्थ सेंटर आणि केअर सेंटरमध्ये ८२ टक्के खाटा भरलेल्या

मुंबईत कोरोना कोविड – १९च्या उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना खाटाच उपलब्ध होत नसल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या असतानाच प्रशासनाने व्यापलेल्या खाटा केवळ ८२ टक्केच भरलेल्या असल्याचा दावा केला आहे. कोविड रुग्णालय, कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड केअर सेंटर दोन आदी ठिकाणी १३ हजार २३ खाटांची क्षमता असून त्यातील ८२ टक्के भरलेल्या आहेत. त्यामुळे १२ टक्के खाटा रिकामी असूनही बाधित रुग्णांना दाखल करून घेण्यात का अडचणी येतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान मुंबईत सीलबंद इमारतींची संख्या १७००ने वाढली आहे. (सविस्तर वाचा)


बीग बींचा मजुरांना मदतीचा हात

देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वच जण लढत आहेत. मात्र, तरीही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश काही आलेले नाही. त्यामुळे राज्या राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे मजुरांचे मोठे हाल झाले आहेत. दरम्यान, मजुरांनी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी विशेष ट्रेन देखील सोडण्यात आली आहे. मात्र, मजुरांचे होत असलेले स्थलांतर राज्यांसमोर एक मोठे संकट उभे राहू लागले असताना आता त्यांच्या मदतीकरता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. बीग बी यांनी मजुरांना घरी सोडण्यासाठी व्यवस्था केली असून ते दररोज ४ हजार ५०० जेवणाच्या पाकिटाचे वाटप करतात. (सविस्तर वाचा)


संगमनेरमधील तरुण कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

संगमनेर तालुक्यातील कोरोना संशयित एका व्यक्तीचा स्त्राव दोन ठिकाणच्या प्रयोगशाळेत तपासल्यानंतर दोन्ही अहवाल वेगळे आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रयोगशाळेने निगेटिव्ह तर दुसऱ्या प्रयोगशाळेने त्याला आठवडाभराने पॉझिटिव्ह ठरविल्याने या रुग्णाच्या अहवालाच्याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या अहवालाच्या आधारे नाशिकच्या आरोग्य विभागाने या रुग्णाला आता पॉझिटिव्ह जाहिर केल्याने आरोग्य विभागाचा कारभार भोंगळ कारभार समोर आला आहे. (सविस्तर वाचा)


देवेंद्र फडणवीसांनी फक्त आकड्यांचा खेळ केला

राज्य सरकारकडून केंद्र सरकार आवश्यक हक्काचा निधी पुरवत नसल्याच्या केल्या जात असलेल्या दाव्यांना प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून दिल्या जात असलेल्या निधीची सविस्तर आकडेवारी मंगळवारी जाहीर केली. या आकडेवारीला आता सत्ताधाऱ्यांकडून अनिल परब, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांच्याकडून पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं गेलं. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी मांडलेल्या मुद्द्यांना खोडून काढण्यासाठी सरकारची बाजू मांडणारे मुद्दे मांडले. (सविस्तर वाचा)


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांची बैठक नुकतीस संपली आहे. यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब पाटील आणि परिवहन मंत्री अनिल परब पत्रकार परिषद घेणार आहेत. विरोधकांचे आरोप आणि राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर ते भाष्य करतील, असे समजते आहे.


काल दिवसभरात रायगड जिल्ह्यात ३९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता ८४५ वर पोहोचली आहे. तसेच रायगडमध्ये आतापर्यंत १७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


आसामच्या गुवाहटीमध्ये १५ हजार डुकारांचा मृत्यू झाला असल्याचे आसामचे पशुसंवर्धन मंत्री अतुल बोरा यांनी सांगितले. संपुर्ण जग कोरोना विषाणू विरोधात लढत असताना आसाममध्ये मात्र आफ्रिकन स्वाईन फ्लू तापाने हाहाकार उडवला आहे.


 

दरवर्षी जून महिन्यात शाळा सुरु होत असतात. मात्र यावेळेस कोरोनाची अभुतपुर्व परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शाळांच्या बाबतीत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची अवस्था होती. मात्र १५ जून पासून ऑनलाईन वर्ग भरणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. मात्र हे वर्ग कसे भरणार? डिजिटल शाळा म्हणजे कशा? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.


राज्यात शाळा-कॉलेज सुरु करण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले आहे. काही माध्यमांनी राज्यांना शाळा सुरु करण्याचे वृत्त दिले होते.


काही दिवसांपूर्वी तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामुळे देशात कोरोनाचे संक्रमण वाढत गेले होते. त्यानंतर आता स्थलांतरीत मजुरांमुळे कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. आता भारतात एकूण रुग्णसंख्या १ लाख ४५ हजार झाली आहे. मजुरांच्या स्थलांतरानंतर आता बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशामध्ये रुग्णसंख्या वाढत चालली आहे. रेल्वेने आतापर्यंत ४४ लाख मजुरांना ३,२७६ ट्रेनमधून आपापल्या राज्यात सोडले आहे. तसेच हवाई वाहतूक सुरु केल्यानंतर ४१,६७३ लोकांनी देशातंर्गत प्रवास केला असल्याची माहिती हवाई वाहतूक मंत्री हरदिप पूरी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -