Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: मुंबईत १० वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत. 

Live Update: मुंबईत १० वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत. 

Related Story

- Advertisement -

मुंबईत १० वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत.


संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधींची भेट


- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासांत २५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ३९१ कोरोनामुक्त नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


- Advertisement -

राज्यातील २२ जिल्ह्यांना निर्बंधांतून सूट, ८ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी, ११ जिल्ह्यांत निर्बंध कायम, 1 जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 चे निर्बंध असणार आहेत. या ११ जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघरचा समावेश आहे.


१२ वीचा निकाल उद्या जाहीर होणार, ऑनलाईन पद्धतीने उद्या ४ वाजता निकाल होईल जाहीर


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते e-RUPI चा शुभारंभ, तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात भारतीय मागे नाहीत हे जगाला दाखवून दिलं, आर्थिक व्यवहारांसाठी पैशांऐवजी ई-रुपीचा वापर करता येणार- नरेंद्र मोदी


अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीवरुन राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव, हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव


मुंबई विमानतळावर लावण्यात आलेल्या अदानी एअरपोर्ट बोर्डाची तोडफोड केली आहे. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत या बोर्डाची तोडफोड केली आहे.


मुख्यमंत्र्यांचा व्यापाऱ्यांना दिलासा, दुकानांच्या वेळेबाबत आदेश काढणार, पुन्हा निर्बंधांची वेळ आली तरी उद्योग सुरु राहणार, लोकलमध्ये सर्वांना परवानगी देणे तुर्तास शक्य नाही


रुग्णसंख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरु ठेवणार
आज संध्याकाळी आदेश काढणार, मुखअयमंत्र्यांची माहिती


पूररेषांची अंमलबजावणी झाली पाहिजे – मुख्यमंत्री

तळीयेतील दुर्घटना भीषण -मुख्यमंत्री

सांगलीतील पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

कायमस्वरुपी इलाज करणं अत्यंत महत्त्वाचे – मुख्यमंत्री

वस्त्यांचे पुनर्वसन करावे लागणार, दरडग्रस्त, शहरातील या भागातील नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा – मुख्यमंत्री

नदी पात्रातील पूररेषांचे गांभीर्याणे विचार करणं आवश्यक


सांगलीत भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यादरम्यान भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. भाजप पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आले होते. तर भाजपचं हे षडयंत्र असल्याचे शिवसेनेकडून आरोप करण्यात येत आहे.


सांगलीतील आयर्विन पुलाहून मुख्यमंत्र्यांनी घेतला पुरपरिस्थितीचा आढावा


इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अभ्यासानुसार, कोवॅक्सिन COVID19 च्या डेल्टा प्लसवर प्रभावी आहे


पोर्नोग्राफी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारा राज कुंद्रा याच्या विरुद्ध महाराष्ट्र सायबर सेल मध्ये अश्लील चित्रपट प्रकरणी गुन्हा दाखल


दोन लस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, हायकोर्टाच्या राज्य सरकारला सूचना


कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, ४ लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. स्थलांतर करण्यात आलेल्या नागिरकांच्या घरांचे आणि आर्थिक नुकसान झाले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांचा भिलवडीतील नागरिकांना आश्वासन (मी पॅकेज मानत नाही, असली थोतांड करणार नाही)


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या भिलवडीत दाखल, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधणार


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ईडीला पत्र, पुन्हा चौकशीस हजर न राहणार असल्याचे सांगितले, देशमुख यांचे वकिल पत्र घेऊन ईडी कार्यालयाकडे रवाना


भारतीय महिला हॉकी टीमने टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीमध्ये धडक दिली आहे. उपांत्य पुर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा १-० ने पराभव


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले आहेत. सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले स्वागत, मुख्यमंत्री सांगलीच्या दिशेने रवाना


माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला ईडीने समन्स बजावले असून आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. १०० कोटी वसुली प्रकरणी चौकशी सुरू आहे.


MPSC रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, एमपीएससीकडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना (सिवस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले, मुंबई विमानतळावर दाखल


दुती चंद २०० मीटर रेसच्या स्पर्धेतून बाहेर, चौथ्या हीटमध्ये राहिली शेवटच्या स्थानावर


राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळेही शरद पवार यांच्यासोबत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी शरद पवार दिल्लीला निघाले आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. सांगलीतील अंकलखोपा येथे पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत.

- Advertisement -