Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: राज्यात २४ तासांत ६,००५ नव्या रुग्णांची नोंद, १७७ जणांचा मृत्यू

Live Update: राज्यात २४ तासांत ६,००५ नव्या रुग्णांची नोंद, १७७ जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १७७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ हजार ७९९ जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६३ लाख २१ हजार ६८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३३ हजार २१५ जणांचा मृत्यू झाला असून ६१ लाख १० हजार १२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


दरम्यान आज मुंबईत गेल्या २४ तासांत २८८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ३५ हजार ६५९वर पोहोचले आहेत. यापैकी आतापर्यंत १५ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख १२ हजार ७२३ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या मुंबईत ४ हजार ६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -


मुंबईतील धारावीत आज एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही आहे. सध्या धारावीत ३८ कोरोना सक्रीय रुग्ण आहेत.

- Advertisement -


एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल अगोदरच राजभवन येथे पाठविली आहे अश्या आशयाच्या बातम्या काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात शिफारस असलेली नस्ती सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी दुपारनंतर राजभवन येथे प्राप्त झाली असून ती राज्यपालांच्या विचाराधीन आहे.


लोकप्रिय रॅपर यो यो हनी सिंग विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवार हिने घरगुती हिंसाचार प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.


देशात मे महिन्यातील लसीकरणांच्या तुलनेत जुलैमध्ये दुप्पट लसीकरण झाले. देशात आतापर्यंत ४७ कोटी ८५ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण झाले आहेत.


१२ वीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल आज दुपारी ४ वाजता जाहीर. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल खालील लिंकच्या माध्यमातून पाहता येईल. (अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा)

१) https://hscresult.11thadmission.org.in,

२) https://msbshse.co.in,

३) hscresult.mkcl.org,

४) mahresult.nic.in

HSC Result 2021: यंदाच्या बारावीच्या परीक्षेत ४,७८९ विद्यार्थी नापास (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.


राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यामध्ये सव्वादोन तास चर्चा, अमित शाह -शरद पवार बैठक संपली


आपण मुख्यमंत्री नाही, राज्यपालांनी समजून घ्यावे – नवाब मलिक

राज्यपाल सत्तेची २ केंद्र करण्याच्या प्रयत्नात, राज्यपालांच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीचा अक्षेप

सरकारी कामांचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन, मुख्य सचिव राज्यपालांची भेट घेणार

राज्यपालांचा राज्य सरकारच्या अधिकारात हस्तक्षेप -नवाब मलिक


राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यातील बैठकीला सुरुवात झाली आहे. अमित शाह यांच्या कार्यालयात ही बैठक होत आहे.


Maharashtra HSC Result date 2021 : राज्यातील बारावी बोर्डाचा निकाल ९९.६३ टक्केल लागला आहे. कला शाखेला ९९.८३, वाणिज्य शाखेचा ९९.११ टक्के लागला तर विज्ञान शाखेचा ९९.४५ टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी ४ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे.


Live Update: राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु, आपत्तीग्रस्त नागरिकांबाबत काय निर्णय होणार याकडे राज्याचं लक्ष


राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार घेणार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट, सहकार क्षेत्राबाबत चर्चा होण्याची शक्यता


सीबीएसई १० वी चा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार. या वेबसाईटवर पाहा निकाल


जम्मू काश्मीरमधील रणजीत सागर तलावाजवळ भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरचा अपघात,


विरोधी पक्षाच्या खासदारांच्या एकजटीनंतर लोकसभेत निदर्शनांसह गदारोळ, सभागृहाचे कामकाज १२ वाजेपर्यत स्थगित


इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची दिल्लीत सायकल रॅली, या रॅलीमध्ये खासदार राहुल गांधीही सहभागी आहेत.


श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ, घरीच उपचार सुरु असून कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मल्टीऑर्गन फेल्युरमुळे प्रकृती चिंताजनक


खासदार राहुल गांधीनी बोलावलेल्या बैठकीस १७ विरोधी पक्षाच्या खासदारांनी हजेरी लावली होती. सरकारविरोधी नेत्यांची या बैठकीत एकजूट पाहायला मिळाली तसेच पेगॅससवरुन केंद्र सरकारला घेरण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता


CBSE 10th Result 2021 : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी १२ वाजता जाहीर होणार, cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या दोन संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल


आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, दरडग्रस्त, पूरग्रस्त नागरिकांना मदत पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता, राज्यातील आणि पूरग्रस्त भागातील सर्व पंचनामे पूर्ण झाले असून या बैठकीत काय निर्णय होतोय याकडे साऱ्यांचे लक्ष


भारत ऑलिम्पिकच्या हॉकी उपांत्य फेरीत पराभूत. बेल्जियम ने भारताला 5- 2 असे पराभूत केले. आता भारताला ब्रॉंझ पदकाच्या लढतीत खेळावे लागणार


Maharashtra HSC Result date 2021 : बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, आज दुपारी ४ वाजता जाहीर होणार, विद्यार्थ्यांना दुपारी ४ वाजल्यापासून आपला निकाल पाहता येणार आहे.


भारतानं बेल्जियमला टाकलं पिछाडीवर, टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला संघाने उपांत्यफेरीत धडक दिली आहे. तर आज भारतीय हॉकी संघानं वर्ल्ड चॅम्पियन बेल्जियमला पिछाडीवर टाकलं आहे. भारतीय संघ २-१ अशा फरकानं आघाडीवर आहे.

- Advertisement -