Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Live Update: धारावीत आज एकही नवा रुग्ण नाही

Live Update: धारावीत आज एकही नवा रुग्ण नाही

Related Story

- Advertisement -

धारावीत आज एकाही नव्या बाधित रुग्णाची नोंद करण्यात आलेली नाही. धारावीत सध्या केवळ २१ अँक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती मुंबई पालिकेने दिली आहे.


- Advertisement -

शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. मोदी आणि पवारांमध्ये जवळपास एक तासाहून अधिक वेळ चर्चा झाल्यचे समोर येत आहे.  सहकार आणि बँकिंगची संबंधित राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यावर ही भेट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.काल पियुष गोयल यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली होती.


भाजप आमदार अतुल भातखळकरांना वनराई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कुरार मेट्रो स्टेशनला अडचण ठरणाऱ्या घरांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईला विरोध केल्याने भाजप आमदार अतुळ भातखळकर यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाई विरोधात पोलिसांकडून अमानुष मारहाण झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे.


- Advertisement -

देशात गेल्या २४ तासात ३८.०७९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून ५६० जणांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९७.३१ टक्के इतका असून देशात सध्या ४ लाख २४ हजार ०२५ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


देशातील पेट्रोलच्या किंमतीत आज पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या किंमती १०७.८३ रुपये तर डिझेल ९७.४५ रुपये प्रतिलिटर आहे.


अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांची ऑनलाईन नोंदणी १९ जुलैपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -