घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबई अग्निशमन दलाच्या ९१ जवानांना कोरोनाची लागण!

Corona Live Update: मुंबई अग्निशमन दलाच्या ९१ जवानांना कोरोनाची लागण!

Subscribe

शहरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालय हे जिल्हा दर्जाचे रुग्णालय आहे. सुमारे २०० बेडसच्या या रुग्णालयात कर्जत,  कसारा शहापूर ते मुरबाड पासून येणाऱ्या आर्थिक दुर्बल आदिवासी घटकांंसह आसपासच्या उपनगरातील रुग्णांवर उपचार होतात. हे कोविड रुग्णालय नसले तरी कोरोना संशयित रुग्ण येथे मोठ्या प्रमाणावर प्राथमिक तपासणी आणि उपचारासाठी धाव घेत आहेत. त्यामुळे कामाचा ताण आणि अपुऱ्या सुविधांच्या अभावी या रुग्णालयातील ३ डॉक्टर ८ नर्सेस ना कोरोनाची लागण झाली आहे.

परिणामी,  येथील डॉक्टर नर्स आणि कर्मचारी हे तणावाखाली काम करीत आहेत. तर इतर उपचारांंसाठी येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे पीपीई कीट , ग्लोज, मास्क सारख्या मूलभूत साधने आणि सुविधा उपलब्ध नसल्याने डॉक्टर, नर्सेस यांच्या मध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. याबाबत डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांकडून यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक हे एका कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी स्वतः ला क्वांटाईन करून घेतले आहे. त्यामुळे मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.

पंजाबमधील १७ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.


जम्मू काश्मीर मधील कुलगाम येथील ३१ सीआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. कुलमागामध्ये तैनात असलेल्या सीआरपीएफच्या ९० बटालियनमध्ये ३०० हून अधिक जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात ३१ जवानांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतचे वृत्त आज तक या वृत्तसंस्थेने दिले आहे.


आज राज्यात कोरोनामुळे चार पोलिसांचा मृत्यू झाला आहे. बोरिवली, वाकोला, दिंडोशी येथील चार पोलिसांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे ४० पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या चाचणीची (आरटी-पीआर) जास्तीत जास्त किंमत २ हजार २०० ठेवली आहे. यापूर्वी या चाचणी किंमत ४ हजार ४०० होती. घरातून नमुने गोळा करून चाचणी करण्यासाठी किंमत २ हजार ८०० रुपये आहे. सविस्तर वाचा 


४ महिन्यांच्या चिमुकल्याने कोरोनावर मात केली आहे. श्वास घेण्याचा त्रास होत असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावर यशस्वीरित्या उपचार केल्यामुळे आनंद झाला आहे. –  असे पी.व्ही.सुधाकर, आंध्र मेडिकल कॉलेज विशाखापट्टणम, ए.पी.


पाकिस्तानचा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सविस्तर वाचा


राजस्थानमधील करौली जिल्ह्यात काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.


पुण्यातील येरवडा कारागृहात उभारण्यात आलेल्या ताप्तुरत्या कारागृहातून आज दोन कैदी शौचालयाच्या खिडकीतून पळून गेले. सविस्तर वाचा


नवी मुंबईत १२९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा आता ३५४३ पर्यंत पोहोचला आहे. काल २ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत १०९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.


राज्यातील मुंबई, पुण्यासह आता मालेगाव आणि औरंगाबाद ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे.


जळगाव जिल्ह्यात दिवसभरात ५२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, ५ रुग्णांचा मृत्यू तर ४५ रुग्ण कोरोनामुक्त, एकूण रुग्णांची संख्या १५४१ वर, आतापर्यंत १३३ रुग्णांचा मृत्य, तर ६५६ रुग्ण कोरोनामुक्त, सद्यस्थितीत ७८९ रुग्ण अॅक्टीव्ह


महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या साथीनं थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या १ लाखांच्या पार गेली आहे. एकाच दिवशी रुग्णवाढीचा आकडा आता ३ हजारपर्यंत. राज्यात आतापर्यंत ४७,७९६ रुग्ण कोरोनामुक्त, सध्या ४९,६१६ रुग्णांवर उपचार सुरू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -