Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update:  मंत्री सुनिल केदार यांच्या बडतर्फीची मागणी, काँग्रेसच्या माजी आमदाराचे मुख्यमंत्र्यांना...

Live Update:  मंत्री सुनिल केदार यांच्या बडतर्फीची मागणी, काँग्रेसच्या माजी आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

नागपूर जिल्हा बँकेत गैरव्यवहाराचा मंत्री सुनिल केदार यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.


Maharashtra Corona Update राज्यात ४ हजार १४१ कोरोनाबाधितांची नोंद, १४५ रुग्णांचा मृत्यू

- Advertisement -

राज्यात मागील २४ तासात ४,१४१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आज ४,७८० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६२,३१,९९९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७ % एवढे झाले आहे. राज्यात आज १४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे. सध्या राज्यात ३,१२,१५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,५२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांचा मुरुडमधील बंगला तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.  सीआरझेड नियमांचे उल्लंघन करुन बंगल्याचे काम केल्याचा आरोप मिलिंद नार्वेकरांवर करण्यात आला होता.


- Advertisement -

 

जन आशीर्वाद यात्रेत गर्दी केल्याप्रकरणी औरंगाबादेत ५० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगाबदच्या वेगवेगळ्या ११ पोलीस ठाण्यात गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्याविरोधात एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.


पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लखनऊमध्ये दाखल झाले आहेत. लखनऊमध्ये मोदींचे राज्यपाल आनंदीबेन पटेल,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी स्वागत केले


 

C-17 ग्लोबमास्टर विमान अफगाणिस्तानहून भारतात दाखल झाले. २०० भारतीयांना घेऊन विमान भारतात दाखल झाले आहे. सरकारच्या वंदे भारत मोहिमेला वेग आला असून २०० भारतीयांची अफगाणिस्तानधून सुखरुप सुटका करण्यात आली आहे.


खासदार सुप्रिया सुळे यांनी बंधू रणजीत पवार यांना राखी बांधत रक्षाबंधन साजरी केली. त्यासंबंधीचे काही फोटो आणि व्हिडिओ त्यांनी शेअर केले आहेत.


स्वर्णिम विजय वर्षा म्हणजेच आज १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या ५०व्या वर्धापन दिनी मुंबईत ‘रन फॉर फन मिनी मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले. नरिमन पॉईंट ते मुंबईतील कुलाबा आरसी चर्च पर्यंत ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती.


 

देशात गेल्या २४ तासात ३०,९८४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर ४०३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे ३८,४८७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.


 

मध्य,हार्बर रल्वेवर आज मेगा ब्लॉक असणार आहे. सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ मिनिटांपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. मेगा ब्लॉक दरम्यान लोकल १५ मिनिटे उशिराने सुरू राहणार आहेत. तर पनवेल-वाशी मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.

- Advertisment -