घरCORONA UPDATECorona Live Update: आज ठाण्यात आढळले १९१ कोरोनाबाधित रुग्ण, ९ जणांचा मृत्यू!

Corona Live Update: आज ठाण्यात आढळले १९१ कोरोनाबाधित रुग्ण, ९ जणांचा मृत्यू!

Subscribe

ठाण्यात आज १९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९ जणांच्या मृत्यूंची नोद झाली आहे. तसेच आज ४२८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


मुंबई गेल्या २४ तासांत ७१७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ५५ रुग्णांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १० हजार ८४६वर पोहोचली असून मृतांची संख्या ६ हजार १८४ झाली आहे.

- Advertisement -

नवी मुंबईत ३२० तर पनवेलमध्ये ९१ नवे रुग्ण वाढले!

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी आणखी ३२० नवीन रुग्णांची वाढ झाली असून रुग्णांची एकूण संख्या १४ हजार २५२वर गेली आहे. मंगळवारी आणखी ३०२ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९ हजार ४४३ इतकी आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत ४ हजार ४०७ Active रुग्ण आहेत. त्यांच्यावर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, मंगळवारी नवी मुंबईत आणखी ८ जणांचा कोरोनाने बळी घेतला. मृतांचा एकूण आकडा ४०२ वर गेला आहे. नवी मुंबईतील कोरोनाची चैन ब्रेक करण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्टवर भर देण्यात आली आहे. मंगळवारी एकाच दिवशी नवी मुंबईत १ हजार ५९६ अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

पनवेल महापालिका क्षेत्रात मंगळवारी ९१ नवीन रुग्ण वाढले. मात्र, काही दिवसात मंगळवारचा रुग्ण आकडा कमी झाल्याचे चित्र आहे. एरव्ही शंभरी ओलांडणाऱ्या रुग्णांचा आकडा कमी झाल्याने पनवेलकरांना दिलासा मिळाला आहे. पनवेल मधील एकूण रुग्णांचा आकडा ६ हजार २२४ वर गेला आहे. आतापर्यंत ४ हजार ६१८ रुग्ण पूर्ण बरे झाले असून १ हजार ४५४ Active रुग्ण आहेत. त्यांच्यावर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.आतापर्यंत पनवेलमध्ये १५२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत ७ हजार ७१७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २८२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ९१ हजार ४४०वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत १४ हजार १६५ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


मुंबईतील ३ हजार दिव्यांग जीवनावश्यक वस्तूंच्या प्रतीक्षेत

मुंबईतील दिव्यांगांना महापालिकेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरीही तब्बल ३ हजार दिव्यांग व्यक्ती यापासून वंचित आहेत. आतापर्यंत केवळ २ हजार दिव्यांग व्यक्तींनाच या जीवनावश्यक किटचे वितरण करण्यात आले आहे.

मुंबईतील अपंग सेवा संघ, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ तसेच भारतीय अंध अपंग पुनर्वसन संस्था यांच्या प्रातिनिधिक प्रतिनिधिंनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची मंगळवारी भायखळा येथील महापौर निवासस्थानी भेट घेऊन विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे सुरेंद्र लाड, मंगेश मालवणकर यांच्या नेतृत्वात दिव्यांग बांधवांनी महापौरांसमवेत झालेले बैठकीत मुंबई महानगरपालिकेत ५ हजार दिव्यांग बांधवांनी नोंदणी केली असून यापैकी २ हजार बांधवांना धान्य किट मिळाले असल्याचे सांगितले. तर उर्वरित बांधवांना सुद्धा धान्य कीट मिळण्याची मागणी त्यांनी यावेळी महापौरांकडे केली. तसेच इतर आस्थापनांप्रमाणे दिव्यांगांनाही आपले स्टॉल सुरू करण्याची परवानगी द्यावी, या मागणीकरिता तसेच स्टॉल बंद असल्याने आर्थिक मदत करण्याची मागणीसुद्धा त्यांनी यावेळी केली.

धारावीत आज ३ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांचा आकडा २ हजार ५४३वर पोहोचला आहे. तसेच आज दादरमध्ये १७ आणि माहिमध्ये ११ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १ हजार ६६४वर तर माहिममधील १ हजार ६३२वर पोहोचला आहे.


खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने कोन, काल्हेर येथे कोविड केअर सेंटर

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, खासदार कपिल पाटील यांच्याकडून विशेष कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठीच्या प्रयत्नांना यश आले आहे. भिवंडी तालुक्यातील कोन येथे २१९ आणि काल्हेर येथे १०० बेडच्या सेंटरसाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मान्यता दिली असून, लवकरच या केंद्रामध्ये रुग्णांना दाखल करता येणार आहे. या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

गेल्या चार महिन्यांमध्ये भिवंडी परिसरातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ठाणे शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये भिवंडीतील रुग्णांना प्रवेश नाकारला जात होता. तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे कोरोना रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. या परिस्थितीत भिवंडीत कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार कोन येथील आटगाव विद्यामंदिर आणि काल्हेर येथील रिद्धी सिद्धी बिल्डींगमध्ये केंद्र सुरू करण्यास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य जयवंत पाटील यांनी काल्हेर येथील केंद्रासाठी आपली इमारत प्रदान केली आहे. तर आटगाव शिक्षण मंडळाने कोन येथील तीन इमारतींचे संकूल दिले आहे. सध्या या दोन्ही ठिकाणी कोरोना केंद्र सुरू करण्यासाठी अत्यावश्यक कामे वेगाने सुरू आहेत.

भिवंडी तालुक्यात सुरू होणाऱ्या या केंद्रांमुळे एकाच वेळी ३१९ रुग्णांची सोय होणार आहे. या रुग्णांना मोफत उपचाराबरोबरच नास्ता, चहा आणि भोजन आदी सुविधाही पुरविण्यात येणार आहेत. सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लाखो रुपये बिले घेतली जात असताना, खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने सुरू होणाऱ्या कोविड केअर सेंटरमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

देशातील सध्या मृत्यूदर २.२५ टक्के इतका आहे. आजपर्यंत देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरीचे प्रमाण ६४ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार १७६ कोरोनाबाधित रुग्ण रिकव्हर झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे देशातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ९ लाख ५२ हजार ७४३वर पोहोचली आहे, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे.


नागपूरच्या गिल्लूरकर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सिनची मानवी चाचणी सुरु झाली आहे. काल तिघांना लस देण्यात आली असून आज आणखी चार जणांना कोवॅक्सिन दिली जाणार आहे.


कोरोना लसीवरच सर्वात मोठं ट्रायल, ३० हजार लोकांवर चाचणी

जगभर पसरणाऱ्या कोरोना विषाणूवर लस कधी येणार याची सर्वच जण प्रतिक्षा करत आहेत. त्यातच आतापर्यंत जगभरात शंभरपेक्षा अधिक लस तयार करण्यात आल्या आहेत. त्यातच आता एक लस ह्यमुन ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून ही लस तब्बल ३० हजार जणांना दिली जाणार आहे. (सविस्तर वाचा)


आराध्या कोरोनामुक्त; बिग बी झाले भावूक

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या नानावटी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेकदेखील कोरोनाबाधित असून तोदेखील नानावटीमध्ये दाखल आहे. दरम्यान, त्यांची सून ऐश्वर्या आणि नात आराध्या या दोघी काही दिवसांपूर्वी उपचाराखातर नानावटीमध्ये दाखल झाले होते. काल त्या दोघींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानतंर अमिताभ बच्चन यांनी एक भावूक ट्विट केले असून मला अश्रू अनावर झाल्याचे म्हटले आहे. (सविस्तर वाचा)


देशात २४ तासांत ४७,७०४ रूग्णांची नोंद

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि दररोज नवीन रूग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज, मंगळवारी देशभरात ४७ हजार ७०४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६५४ जणांचा बळी गेला आहे. तर आतापर्यंत ३३ हजार ४२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


पुण्याच्या ‘या’ प्रसिद्ध परिसरात एकही रुग्ण नाही

पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात तर कोरोनाबाधितांच्या आकडेवाडीत सर्वाधिक वाढ ही पुणे शहरात झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता देखील वाढली आहे. तर, एकीकडे चिंता वाढलेली असताना देखील अतिशय गजबजलेल्या पुण्याच्या बुधवार पेठेतल्या रेड लाईट एरियात मात्र, कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप तरी सापडलेला नाही. (सविस्तर वाचा)


२४ तासात ५ लाखांहून अधिक चाचण्या!

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या प्रमाणात पसरत आहे. त्या वेगाने आता रुग्णांच्या चाचण्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार; देशभरात ५ लाखाहून अधिक जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. २६ जुलै रोजी भारतात ५ लाख १५ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर २७ जुलै रोजी ५ लाख ३८ हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.


२ आठवड्यांत कोरोना संसर्गाच्या उपचारांबद्दल चांगली बातमी देणार 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की त्यांचे प्रशासन येत्या दोन आठवड्यांत कोरोना संसर्गाच्या उपचारांबद्दल चांगली बातमी देणार आहे. “कोविड -१९ च्या उपचारांबद्दल मला वाटते की, येत्या दोन आठवड्यांत आमच्याकडे काही चांगली बातमी असेल. पुढील दोन आठवड्यांत याबाबत घोषणा देखील करण्यात येईल,” असे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (सविस्तर वाचा)


देशात पाच जागांवर होणार लसीच्या शेवटच्या मानवी चाचणीचे परिक्षण

जगभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असतानाच गेल्या सहा आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. अशात ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका द्वारा विकसित कोविड -१९ लसीच्या (Oxford-AstraZeneca COVID-19 vaccine) मानवी चाचणी करण्यात येत असून ती अंतिम टप्प्यात देशभरात पाच ठिकाणी पूर्ण तयारी करण्यात आली असल्याची माहिती जैव तंत्रज्ञान विभाग (DBT) च्या सचिव रेणू स्वरूप यांनी काल दिली. (सविस्तर वाचा)


राज्यात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ७ हजार ९२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २२७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या लाख ८३ हजार ७२३वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १३ हजार ८८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ८ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत राज्यात २ लाख २१ हजार ९४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण रिकव्हर होण्याचे प्रमाण ५७. ८४ टक्के एवढे असून मृत्यूदर ३. ८२ टक्के एवढा आहे. तसेच सध्या राज्यात १ लाख ४७ हजार ५९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -