घरCORONA UPDATECorona Live Update: नवी मुंबईत ३९८ तर पनवेलमध्ये १२१ कोरोना रुग्ण वाढले!

Corona Live Update: नवी मुंबईत ३९८ तर पनवेलमध्ये १२१ कोरोना रुग्ण वाढले!

Subscribe

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी २ हजार ३४७ नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. नवी मुंबईत शुक्रवारी ३९८ नवीन कोरोना रुग्ण वाढले असून रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ३८५ झाली आहे. शुक्रवारी नवी मुंबईतील २४९ कोरोना बाधित पूर्णपणे बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १० हजार ३६५ एवढी आहे. सद्यस्थितीत ४६०२ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ४१८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवारी १२१ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या ६ हजार ६२८ झाली आहे. दिवसभरात २१० रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ५ हजार १५७ एकूण रुग्ण बरे झाले आहेत. सद्यस्थितीत १३०६ विद्यमान रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत १६५ जणांचा मृत्यू झाला आहे .

- Advertisement -

ठाण्यातील कोरोना कहर कायम आहे. त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठाण्यातील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे.


गोव्या आज २०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गोव्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजार ९१३वर पोहोचला असून सध्या यापैकी १ हजार ६५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच ४ हजार २११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत आणि ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -


आज दिवसभरात ठाण्यात ३१३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत ठाण्यात ६१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ५२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १३ हजार ८३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या शहरामध्ये ४ हजार ५७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


मुंबईत आज १ हजार १०० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ५३ जणांचा मृत्यूची नोंद झाी आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १४ हजार २८७वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ८७ हजार ७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 


दादर मध्ये आज दिवसभरात ४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एकूण बाधितांचा आकडा २ हजार ५५६वर पोहोचला आहे. तसेच आज माहिममध्ये २३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून येथील एकूण बाधितांचा आकडा १ हजार ६९५वर पोहोचला आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ३२० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २६५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख २२ हजार ११८वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १४ हजार ९९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


आज धारावीत ५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ५५६वर पोहोचला आहे. तसेच सध्या ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.


पुणे महानगरपालिका संचालित सोनवणे रुग्णालयात २९ वर्षांच्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दोन मुलींना जन्म दिला आहे.


डोंबिवलीत सापडला कोरोना रुग्णाचा मृतदेह

डोंबिवली पूर्वेतील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथील कोविड सेंटर मधून गुरुवारी सकाळी बेपत्ता झालेल्या ५३ वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह पश्चिमेतील खाडीत सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अपमृत्यूची नोंद केली असून या रुग्णाने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. (सविस्तर वाचा)


पोलीस दलातील जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी खाकी वर्दीतील कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, कर्तव्य बजावत असताना अनेकांना आपेल प्राण गमवावे लागले आहे. दरम्यान, पोलीस दलातील दोन जुळे जण या महामारीत शहीद झाल्याची घटना समोर आली आहे. दिलीप रामचंद्र घोडके (५६) आणि जयसिंग रामचंद्र घोडके (५६ ) या दोन जुळ्या भावांचा आठ दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथमध्घये घडली आहे. (सविस्तर वाचा)


‘या’ देशात कुत्रे, मांजरी, वाघासह सिंहाला कोरोनाचा संसर्ग!

जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरू असून सर्वाधिक फटका अमेरिका या देशाला बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण ४६ लाखाहून अधिक लोकांना झाली आहे तर कोरोनामुळे १ लाख ५५ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही परिस्थिती गंभीर असताना आता अमेरिकेतील बर्‍याच प्राण्यांनाही संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. अलीकडेच कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या कुत्र्याला ठार मारून टाकण्यात आले होते. (सविस्तर वाचा)


आपण आता लॉकडाऊन किती काळ चालवणार आहोत

‘कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सुरुवातीच्या काळात कोणाला कोरोनाच्या संकटाचा अंदाज नव्हता. परंतु, आज जेव्हा आकडेवारी पाहतो तेव्हा परिस्थिती समजते. मात्र, आपल्याकडे लॉकडाऊन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही. आपण आता लॉकडाऊन किती काळ चालवणार आहोत. लोकांना आपली नोकरी आहे?, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’, या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लॉकडाऊ आणि अनलॉकवर टीका केली आहे. (सविस्तर वाचा)


देशात आतापर्यंत १ कोटी ८८ लाखाहून अधिक चाचण्या!

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या प्रमाणात पसरत आहे. त्या वेगाने आता रुग्णांच्या चाचण्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार; देशभरात २४ तासांत ६ लाख ४२ हजार ५८८ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. (सविस्तर वाचा)


पोलीस दलात कार्यरत असलेल्या दिलीप रामचंद्र घोडके (५६ ) आणि जयसिंग रामचंद्र घोडके (५६ ) या दोन जुळ्या भावांचा आठ दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथमध्घये घडली आहे.  दिलीप घोडके हे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हवालदार होते. तर जयसिंग घोडके अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार होते. हे दोघेही भाऊ एकाच दिवशी पोलीस दलात भरती झाले होते, एकत्र ट्रेनिंग पूर्ण केले होते.
दिलीप घोडके यांचा २० जुलै, तर जयसिंग यांचा २८ जुलै रोजी मृत्यू झाला. यामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. (सविस्तर वाचा)


देशात २४ तासांत सर्वाधिक ५५, ०७९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाल्याचे बघायला मिळाले आहे. गेल्या २४ तासांत पहिल्यांदाच ५५ हजाराहून अधिक नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह, ७७९ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात आज संक्रमित झालेल्यांची संख्या १६ लाखांच्या पुढे गेली आहे, तर ३५ हजारांहून अधिकांचा मृत्यूही झाला आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्याची संख्या १६ लाख ३८ हजार ८७१ झाली आहे तर सध्या ५ लाख ४५ हजार ३१८ Active रूग्ण आहेत. तसेच १० लाख ५७ हजार ८०६ कोरोना रूग्णांनी कोरोनावर मात केला असून रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येते दिवसागणिक वाढ होत आहे. यापूर्वी राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला होता. पण आता ११ हजारांचा टप्पा देखील ओलांडला आहे. राज्यात पहिल्यांदाच दिवसभरात ११ हजार १४७ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून २६६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ११ हजार ७९८वर पोहोचली असून आतापर्यंत यापैकी १४ हजार ७२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात राज्यात ८ हजार ७६० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण २ लाख ४८ हजार ६१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४८ हजार १५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -