घरCORONA UPDATECorona Live Update: राज्यात १ लाख ६४ हजार ५६२ Active रुग्ण

Corona Live Update: राज्यात १ लाख ६४ हजार ५६२ Active रुग्ण

Subscribe

नाशिकमध्ये ८२ टक्के रूग्ण कोरोनामुक्त

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी 746 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नाशिक ग्रामीण 2१3, नाशिक महानगर 493, मालेगाव 37 आणि जिल्ह्याबाहेरील ३ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात 1० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण ३, नाशिक महानगर ५ आणि मालेगावमधील २ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात 2८ हजार ४२३ वर पोहोचला आहे. एकट्या नाशिक शहरात १९ हजार 83 रूग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात ८२ टक्के रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

- Advertisement -

Pune Corona: आज १,५५६ नव्या कोरोनारुग्णांची वाढ

आज दिवसभरात पुणे शहरात १ हजार ५५६ कोरोनाबाधित नवे रूग्ण आढळले आहेत. तर शहरातील उपचार घेत असलेल्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १४ हजार ७५७ इतकी झाली आहे. यापैकी ७९३ जण हे कोरोनाचे गंभीर रूग्ण असून सध्या ४८३ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

Corona: औरंगाबादमध्ये मृत रुग्णांची संख्या ६१५ वर

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आज, शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यात नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ६१५ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यतील ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची स्थिती गंभीर असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. लवकर निदान झाल्यास उपचार करणे शक्य होत असल्याने ग्रामीण भागात आजारपण अंगावर काढू नका, असा सल्ला दिला जात आहे.


मुंबईत २४ तासांत १,४०६ नव्या रुग्णांची वाढ

मुंबई गेल्या २४ तासांत १ हजार ४०६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनोबाधितांची संख्या १ लाख ३४ हजार २२३ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ७ हजार ३५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत मुंबईत १२३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत १ लाख ८ हजार २६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात १ लाख ६४ हजार ५६२ Active रुग्ण

 

राज्यात गेल्या २४ तासांत ११ हजार ७४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ३३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३४ लाख ९२ हजार ९६६ नमुन्यांपैकी ६ लाख ५७ हजार ४५० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यातील मृत्यूदर ३.३० टक्के एवढा असून राज्यात ११ लाख ९२ हजार ६८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३५ हजार १३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यात १ लाख ६४ हजार ५६२ रुग्ण Active आहेत. (सविस्तर वाचा)


शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकनंतर गोविंद बाग या निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. चार कर्मचाऱ्यांचा कोरान अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या नऊ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे.


देशात २० ऑगस्टपर्यंत ३ कोटी ३४ लाख ६७ हजार २३७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात ८ लाख ५ हजार ९८५ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील एका बड्या राजकीय घराण्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काँग्रेसचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल रात्री उशीरा त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. त्यामुळे ऋतुराज यांना उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींना योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.


देशात गेल्या २४ तासांत ६८ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९८३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या २९ लाख ५ हजार ८२४वर पोहोचली आहे. त्यापैकी आतापर्यंत ५४ हजार ८४९ रुग्णांचा मृत्यू झाला असून २१ लाख ५८ हजार ९४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ६ लाख ९२ हजार २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


बीड जिल्ह्यात कोरोना संस्रग वाढत आहे. बीडमध्ये ३०८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून तिघांच्या जणांच्या मृत्यूची नोंद झाली आह. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ५४९वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत १ हजार ७१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


संपूर्ण जगभरात कोरोना विषाणू थैमान घातलं आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत नसून वाढतानाच दिसत आहे. त्याचप्रमाणे मृत्यूची संख्या देखील वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार, आतापर्यंत जगभरात २ कोटी २८ लाख ५६ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ७ लाख ९६ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून १ कोटी ५५ लाख ११ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात गुरुवारी दिवसभरात १४ हजार ४९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३२६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील गुरुवारी तपासण्यात आलेल्या ३४ लाख १४ हजार ८०९ नमुन्यांपैकी ६ लाख ४३ हजार २८९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी दिवसभरात राज्यात १२ हजार २४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ४ लाख ५९ हजार १२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -