घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईत आज १,१०५ नवे रूग्ण; रुग्ण बरे होण्याचा दर...

Corona Live Update: मुंबईत आज १,१०५ नवे रूग्ण; रुग्ण बरे होण्याचा दर ७६ टक्के

Subscribe

मुंबईत आज १ हजार १०५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १६ हजार ४५१ वर पोहोचली असून आतापर्यंत यापैकी ६ हजार ४४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ७६ टक्के एवढा झाला आहे.

- Advertisement -

राज्यात आज ९ हजार ५०९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आज ९,९२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण २,७६,८०९ करोनाबाधित रुण बरे
होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ६२.७४ टक्के एवढं झालं आहे.

- Advertisement -

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोरोनाची लागण झाली आहे. बनवारीलाल पुरोहित यांच्यात कोरोनाची काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशी माहिती अभिनेता अभिषेक बच्चन याने दिली आहे.


गृहमंत्री अमित शाहा यांचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विटवरून माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे की, पहिल्या कोरोनाची लक्षणे दिसल्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली आणि त्यांचा अहवाला पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती ठीक असली तरी ते डॉक्टरांच्या सल्लानुसार रुग्णालयात दाखल झाले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांच्या संपर्कात जे कोणी आले आहे त्यांनी आयसोलेट होऊन आपली कोरोना चाचणी करावी अशी त्यांनी विनंती केली आहे.


उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी यांनी कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे त्यांनी पुरोहित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


देशात १ ऑगस्टपर्यंत १ कोटी ९८ लाख २१ हजार ८३१ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ४ लाख ६३ हजार १७२ नमुन्यांच्या चाचण्या शनिवारी झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


महाराष्ट्रात आतापर्यंत ९ हजार ५६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यापैकी ७ हजार ५३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या १ हजार ९२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


देशात २४ तासांत ५४ हजार ७३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १७ लाख पार झाला असून १७ लाख ५० हजार ७२४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ३७ हजार ३६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ११ लाख ४५ हजार ६३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ५ लाख ६७ हजार ७३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -