Corona Live Update: गोव्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७ हजारपार!

corona live update
कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

गेल्या २४ तासांत गोव्यात २५९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे गोव्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७ हजार ७५वर पोहोचला असून यापैकी ५ हजार ११४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या १ हजार ९०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


मुंबईत मागील २४ तासांत ७०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १८ हजार १३०वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ९० हजार ९६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत आणि ६ हजार ५४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत ७ हजार ७६० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३०० रुग्णांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ५७ हजार ९५६वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत १६ हजार १४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 


केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट आली आहे. त्यांनी उपचारकरिता हॉस्पिटल दाखल करण्यात आले आहे. याबाबत स्वतः त्यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.


अनेक राज्यात कोरोना चाचणी क्षमता वाढविली आहे. यामध्ये दोन प्रकारे चाचण्या केल्या जात आहे. एक आरटी-पीसीआर आणि दुसरी रॅपिड अँटीजन टेस्ट. गोव्या, दिल्ली, त्रिपुरा आणि तामिळनाडूमध्ये चाचणी क्षमता वाढविली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालय सचिवांनी यांनी दिली.


कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ७१ वर्षीय सिद्धरामय्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यापाठोपाठ विरोधीपक्ष नेत्यालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.


देशात २४ तासांत ५२ हजार ०५० नवे रुग्ण

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाल्याचे बघायला मिळाले आहे. गेल्या २४ तासांत पहिल्यांदाच ५२ हजाराहून अधिक नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह, ८०३ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात आज संक्रमित झालेल्यांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे, तर ३८ हजारांहून अधिकांचा मृत्यूही झाला आहे.


देशात ६ लाखांहून अधिक चाचण्या!

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या प्रमाणात पसरत आहे. त्या वेगाने आता रुग्णांच्या चाचण्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार; देशभरात २४ तासांत ६ लाख ६१ हजार ७१५ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. (सविस्तर वाचा)


राज्यात पुन्हा एकदा नवीन कोरोनाबाधित रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहेत. राज्यात २४ तासांत ८ हजार ९८४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २६६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ५० हजार १९६वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १५ हजार ८४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिलासा देणारी बाब म्हणजे २४ तासांत राज्यात सर्वाधित १० हजार २२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत २ लाख ८७ हजार ३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४७ हजार ०१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.