घरCORONA UPDATECorona Live Update: अभिषेक बच्चनचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह

Corona Live Update: अभिषेक बच्चनचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्याने कोरोनावर मात केली असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले आहेत.

- Advertisement -

 


बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांना स्वतः याबाबत फेसबुकच्या माध्यमातून माहिती दिली आहे. काल रात्री त्यांना ताप आल्याने कोरोना चाचणी केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

देशात ७ जुलैपर्यंत २ कोटींहून अधिक नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी काल दिवसभरात ५ लाख ९८ हजार ७७८ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली.


देशात २४ तासांत ६१ हजार ५३७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९३३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २० लाख ८८ हजार ६१२वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ४२ हजार ५१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १४ लाख २७ हजार ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ६ लाख १९ हजार ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचा 


पश्चिम बंगालमधील सिलीगुरी येथील आज सर्व दुकाने बंद आहे. २०, २१, २७, २८ आणि ३१ ऑगस्ट रोजी राज्यात संपूर्णपणे लॉकडाऊन असेल.

 


जगभरात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. जगात आतापर्यंत १ कोटी ९५ लाख ४३ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ७ लाख २४ हजारांहून अधिक रुग्ण मृत्युमुखी पडले असून १ कोटी २५ लाख ४५ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यातील कोरोना बळींची संख्या १७ हजार पार!
राज्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून बाधितांची संख्या ५ लाखांच्या उंबरठ्यावर आहे. तसेच राज्यातील कोरोना बळींच्या संख्येने १७ लाखांच्या टप्पा देखील पार केला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान राज्यात शुक्रवारी १० हजार ४८३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३०० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा संख्या ४ लाख ९० हजार २६२वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १७ हजार ९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -