घरCORONA UPDATECorona Live Update: जळगावात कोरोनाची भीती वाढली; २४ तासांत ५२० नवे रुग्ण

Corona Live Update: जळगावात कोरोनाची भीती वाढली; २४ तासांत ५२० नवे रुग्ण

Subscribe

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग पूर्वीच्या तुलनेत आता अधिकच वाढला आहे. आज जिल्ह्यात ५२० नवे करोना बाधित रुग्ण आढळले तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.


औरंगाबादमध्ये बळींची संख्या ५५४ वर

- Advertisement -

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आज, बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ५५४ झाली आहे. तर आज सकाळी आणखी ७४ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६ हजार ८२७ झाली आहे. त्यापैकी १२ हजार ३४६ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ३ हजार ९२७ बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत. (सविस्तर वाचा)


यवतमाळात करोनाचा उद्रेक

- Advertisement -

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून आज सोमवारी दिवसभरात रूग्णांची या महिन्यातील उच्चांकी संख्या वाढली. नव्याने तब्बल १५९ रूग्ण आढळल्याने प्रशासनासमोरील आव्हानही वाढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंतची रूग्णांची संख्या एक हजार आठशेच्या घरात पोहचली आहे. तर दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४६ वर पोहचला आहे.


पिंपरी-चिंचवडमध्ये ७२१ नवे कोरोना रुग्ण

पुणे शहरातील कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. पुण्यात आज दिवसभरात नव्याने ७६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ६६ हजार ६२७ इतकी झाली आहे. तर आजवर एकूण १ हजार ५७१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (सविस्तर वाचा)


किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज २९३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २७ लाख ७३ हजार ५२० नमुन्यांपैकी ५ लाख २४ हजार ५१३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ५८ हजार ४२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.३३ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यदर ३.४४ टक्के एवढा आहे.


मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजपा नगरसेविकेला कोरोनाची लागण झाली आहे. व्यवसायाने त्या डॉक्टर असून सध्या त्या स्वतःच्याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्या प्रभाग क्रमांक १२ मधून निवडून आल्या आहेत. नगरसेविका स्वतः डॉक्टर असून भाईंदर पूर्व परिसरात त्यांचे खाजगी हॉस्पिटल आहे. त्याठिकाणी अतिशय कमी दरात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करीत केले जात आहेत. दररोज कोरोनाची लागण किंवा लक्षणे असणारे रुग्ण उपचाराकरता येत असतात. कोरोनाचे रुग्ण हताळताना त्यांच्याशी संपर्क आल्याने त्यांना देखील काही दिवसांपूर्वी सर्दी, खोकला सारखी लक्षणे दिसू लागली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी केली होती.


नांदेड शहारात व्यापाऱ्यांना आणि तिथे काम करत असलेल्या व्यक्तींची कोरोना अँटीजन चाचणी करण्याचे बंधनकारक केले आहे. तसेच कोरोना चाचणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने सील करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबातच आदेश नांदेड महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत.


माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. याबाबत त्यांनी स्वतः ट्विटद्वारे माहिती दिली आहे. तसेच मागील आठवड्यात त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना आयसोलेटेड आणि कोरोना टेस्ट करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. सविस्तर वाचा 


भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांना कोरोनाची लागणी झाली असून त्यांच्यासह कुटूंबातील सहाजण देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. काही दिवसांपूर्वी सुजितसिंह यांची आई आजारी असल्याने मंगळवारी कुटुंबातील सर्वांची रॅपीड अँटीजन टेस्ट करण्यात आली. दरम्यान कुटुंबातील सहा जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे.


देशात ९ ऑगस्टपर्यंत २ कोटी ४५ लाख ८३ हजार ५५८ नमुन्यांंच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ४ लाख ७७ हजार २३ नमुन्यांच्या चाचण्या रविवारी झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने दिली आहे.


देशात गेल्या २४ तासांत ६२ हजार ६४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २२ लाख १५ हजार ७५वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ४४ हजार ३८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


तामिळनाडू: अनलॉक ३ च्या भागात चेन्नईत पुन्हा जिम उघडल्या आहेत. एशियन पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेती अर्थी अरुण म्हणाली की, याचा फायदा क्रिडा समुदायाला होईल. डिसेंबरमध्ये आमची इंडोनेशियात आशियाई स्पर्धा आहे. लॉकडाऊनच्या दृष्टीने ते माझ्यासाठी मोठे आव्हान असेल, पण ते मी स्वीकारले आहे.


देशात आतापर्यंत १५ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन प्रकरणांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक योगदान देणा-या १० राज्यांत अद्याप संसर्ग केंद्रित आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय


संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. जगातील कोरोनाबाधितांच्या संख्येने २ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात २ कोटी २२ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ७ लाख ३३ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून १ कोटी २८ लाख ९७ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात रविवारी १२ हजार २४८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ लाख १५ हजार ३३२वर पोहोचला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे रविवारी राज्यात १३ हजार ३४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -