घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईत आज दिवसभरात ९७६ जणांना डिस्चार्ज

Corona Live Update: मुंबईत आज दिवसभरात ९७६ जणांना डिस्चार्ज

Subscribe

पुण्यात ‘कोरोना’चे १६६९ नवे पॉझिटिव्ह 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा पुणे शहरात वाढताना दिसत आहे. सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाच्या नव्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या २४ तासामध्ये कोरोनामुळं पुणे शहरातील ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहराबाहेरील ९ जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळे १८८२ मृत्यू झाले आहेत. दिवसभरात कोरोनाचे १६६९ नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे दिवसभरात १३८६ रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


मुंबईत आज दिवसभरात ९७६ जणांना डिस्चार्ज

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार २७५ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ३२ हजार ८१७ इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात ९७६ जण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. यापैकी आतापर्यंत १ लाख ७ हजार ३३ जणांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या १८ हजार १७० इतके Active केसेस मुंबईत आहेत. तर ७ हजार ३११ जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत १४ हजार ४९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ३२६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३४ लाख १४ हजार ८०९ नमुन्यांपैकी ६ लाख ४३ हजार २८९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार २४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ४ लाख ५९ हजार १२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.३७ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.३२ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

बीडमध्ये अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये आढळले कोरोनाचे २३३ रुग्ण

बीड जिल्ह्यातील सामुहिक संक्रमण रोखण्यासाठी पाच शहरात व्यापार्‍यांच्या रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टची तपासणी करण्यात आली. आज तिसर्‍या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५१२२ व्यापार्‍यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यात २३३ जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. बीड जिल्ह्यामध्ये आष्टी, माजलगाव, अंबाजोगाई, केज, परळी या पाच शहरामध्ये व्यापार्‍यांच्या रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट सुरू आहेत. आज शेवटच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाचही शहरातील मिळून ५१२२ जणांच्या तपासण्या झाल्या. यामध्ये २३३ जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.


जलशक्ती मंत्री गजेन्द्रसिंग शेखावत यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली.


मुंबई पोलीस दलात कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली असून मागील २४ तासात दोन अधिकाऱ्यांसह ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकट्या मुलुंड पोलीस ठाण्यात २४ तासात एक अधिकारी आणि तीन अंमलदाराचा मृत्यू झाला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दोन पोलीस निरीक्षक यांच्यासह ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

मुंबई पोलीस दलात पोलीस अधिकारी यांच्यासह ६२ जणांचा मृत्यू झाला असून दोन हजार पेक्षा अधिक पोलीस कोरोना संक्रमित आहेत. राज्यात १३२ पोलीस कोरोना या आजारामुळे मृत्युमुखी पडले असून सुमारे १२ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

पूर्व उपनगरातील मुलुंड आणि देवनार पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी यांचा गुरुवारी कोरोना या आजाराने मृत्यू झाला असून मागील २४ तासात पोलीस अंमलदार यांच्यासह ४ जण कोरोनाचे बळी ठरले आहे. एकट्या मुलुंड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक ३ पोलीस निरीक्षक यांच्यासह ४६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी आठवड्याभरात एका पोलीस निरीक्षकासह ४ जणांचा मृत्यू झाला आहे.


देशात गेल्या २४ तासांत ६९ हजार ६५२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९७७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची आकडा २८ लाख ३६ हजार ९२६वर पोहोचला आहे. तसेच यापैकी आतापर्यंत ५३ हजार ८६६ रुग्णांचा मृत्यू झाला असून २० लाख ९६ हजार ६६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ६ लाख ८६ हजार ३९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिली आहे.


देशात कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सध्या कोरोनाचा चाचणीवर अधिक भर देण्यात आला आहे. देशात गेल्या २४ तासांत ९ लाखांहून अधिक कोरोनाचा चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार, आता जगभरात २ कोटी २५ लाख ६८ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७ लाख ९० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १ कोटी ५२ लाख ९७ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


बुधवारी राज्यात १३ हजार १६५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून आज ३४६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ टक्के एवढा आहे. तर बुधवारी ९ हजार ११ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ४ लाख ४६ हजार ८८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.०९ टक्के एवढे झाले आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -