Corona Live Update: एश्वर्या रॉय आणि जया बच्चन यांच्या रिपोर्टची प्रतिक्षा

aishwarya and jaya bachchan

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता जया बच्चन आणि  एश्वर्या राय यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र अद्याप या दोघींच्या अहवालाबाबत ठोस माहिती मिळू शकलेली नाही. तर दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अमिताभ आणि अभिषेक यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आलेली आहे. दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे ते लवकरच बरे होतील.


 

भिवंडी ग्रामीणमध्ये कोरोना रुग्ण संख्या झपाटयाने वाढत असताना त्यास आळा घालण्यासाठी तालुक्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील गोदमावर बंद करण्याची कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून दिले जात असतानाच जिल्हा कार्यक्षेत्रात ११ जुलैच्या मध्यरात्री पर्यंत लागू करण्यात आलेला लॉकडाऊनची मुदत वाढवून १९ जुलै पर्यंत करण्यात आली आहे.


देशात आज कोरोना रुग्ण बरे होण्याचा आकडा ५ लाख पार झाला आहे. आतापर्यंत ५ लाख १५ हजार ३८५ रुग्ण कोरोनामुक्त झाला आहेत. तसेच सध्या २ लाख ३१ हजार ९७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ६२.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना १५९ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ८ हजार पार झाला आहे. सविस्तर वाचा 


देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. मागील २४ तासांत सर्वाधिक २७ हजार ११४ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख २० हजार ९१६वर पोहोचला असून मृतांचा आकडा २२ हजार १२३ झाला आहे. सविस्तर वाचा 


देशात १० जुलै पर्यंत १ कोटी १३ लाख ७ हजार २ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल २ लाख ८२ हजार ५११ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


जगातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढता दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात १ कोटी, २६ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ५ लाख ६२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७६ लाख ६१ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात काल दिवसभरात २२६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. काल राज्यात ७ हजार ८६२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून २२६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ३८ हजार ४६१वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ९ हजार ८९३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल दिवसभरात ५ हजार ३६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १ लाख ३२ हजार ६२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५५.६२ एवढा झाला आहे. तसेच सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचा