घरCORONA UPDATECoronavirus Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये २४ तासांत आढळले ९८५ नवे रुग्ण; १३...

Coronavirus Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये २४ तासांत आढळले ९८५ नवे रुग्ण; १३ जणांचा मृत्यू

Subscribe

पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाबाधितांनी ओलांडला ५० हजारांचा टप्पा

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होतोना दिसत आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला असून, एकूण बाधित रुग्णांची संख्या ५० हजार २९६ वर पोहचली आहे. तर यापैकी, पिंपरी-चिंचवड शहरातील ३५ हजार ४१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आत्तापर्यंत शहरातील ८६७ आणि महानगर पालिकेच्या हद्दीबाहेर मात्र पालिका प्रशासनाच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १९१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)

रुग्णवाहिके अभावी पुण्यातील पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू

- Advertisement -
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. या कोरोनाने अनेकांचे बळी घेतले आहेत. तर कोरोना काळात संयतपणे रोपोर्टिंग करणारे ‘टीव्ही ९ मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज पहाटे त्यांनी अखेचा श्वास घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. (सविस्तर वाचा)

 

Corona : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण

- Advertisement -
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. प्रमोद सावंत यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते घरीच आयसोलेटेड झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली असून त्यांनी म्हटले आहे की, मी माझी सर्व कामे घरातूनच करणार आहे. जे जे कोणी आपल्या संपर्कात आले असतील, त्या सर्वांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्लाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे. (सविस्तर वाचा)

कोरोनाची लस विकसित करण्यासाठी जगाला मदत करण्यास अमेरिकेचा नकार

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असताना तो रोखण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. मात्र, ही कोरोना लस विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटितपणे जे प्रयत्न सुरु आहेत, त्यात सहभागी होण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. जे प्रयत्न सुरू आहेत त्यात सहभागी होणार नाही, असे ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले. (सविस्तर वाचा)


पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येत्या ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच राहणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यवस्थापनानं खास पत्रक काढून ही माहिती दिली आहे. त्यामुळे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन करत विठ्ठल मंदिर खुले करण्याची मागणी केली होती. (सविस्तर वाचा)


दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात ७८ हजारहून अधिक जणांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले आहे. तर १ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता बाधितांची संख्या ३७ लाखांवर गेली आहे. तर ६६ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.


महाराष्ट्रात भारतातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या ८ लाख ८ हजार ३०६ वर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची तुलना जगभरातून सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांशी केल्यास राज्य पाचव्या स्थानावर येत आहे. आज राज्यभरात १५ हजार ७६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागच्या २४ तासांत ३२० रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. दिलासादायक बाब अशी की, आज दिवसभरात १० हजार ९७८ रुग्ण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -