घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईत २४ तासांच आढळले १,०३५ नवे कोरोनाबाधित, २० जणांचा...

Corona Live Update: मुंबईत २४ तासांच आढळले १,०३५ नवे कोरोनाबाधित, २० जणांचा मृत्यू!

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार २५ नवे रुग्ण आढळले असून २० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडा १ लाख ३७ हजार ९१वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ७ हजार ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ लाख ११ हजार ८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ७ हजार ४३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वतः मनोहरलाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन होण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी कोरोना टेस्ट करण्यास देखील सांगितले आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ११ हजार १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २१२ रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६ लाख ९३ हजार ३९८वर पोहोचला असून आतापर्यंत २२ हजार ४६५ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच आज १४ हजार २१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ५ लाख २ हजार ४९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.४७% एवढे झाले आहे.


गेल्या २४ तासांत राज्यात १२० नवे कोरोनाबाधित पोलीस आढळले असून एका पोलीसाच मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १३ हजार ७१६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १३९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ११ हजार ४९ पोलीस कोरोनामुक्त झाले आहे. तर २ हजार ५२८ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने दिली आहे.


रशियाकडून कोरोनावरील यशस्वी लस जाहीर झाल्यानंतर आता इतर देशांकडूनही लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता चीन देशांनी देखील रशिया पाठोपाठ नंबर लावला आहे. काही निवडक कंपन्यांनी मिळून तयार केलेल्या दोन लसींना आपत्कालीन परिस्थितीत लस वापरण्यास चीनने मंजुरी दिली आहे. ज्या व्यक्तीला लस दिली आहे. त्या व्यक्तीला कोरोनाच्या संक्रमणाचा धोका अनिश्चित काळासाठी सर्वाधिक असू शकतो, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. (सविस्तर वाचा)


भारतात गेल्या २४ तासांत ६१ हजार ४०८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, कोरोनामुळे ८३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३१ लाख ६ हजार ३४९ वर पोहचला आहे. दरम्यान, एका दिवसात ५७ हजार ४६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत २३ लाख ३८ हजार ३६ हजार जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ४४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज २५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३६ लाख १६ हजार ७०४ नमुन्यांपैकी ६ लाख ८२ हजार ३८३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यातील मृत्यूदर ३.२६ टक्के एवढा असून राज्यात १२ लाख ३० हजार ९८२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३४ हजार ८२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -