Corona Live Update: पुणे – दिवसभरात २१२ रुग्णांची नोंद

corona live update
कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

पुण्यात दिवसभरात २१२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ६८६ वर गेली आहे. तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. तर पुण्यात आतापर्यंत ५१८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे.


मुंबईत मागील २४ तासांत १ हजार १२८ कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६७ हजार ६३५ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ३ हजार ७३५ झाली आहे. तसेच आज ६२८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत मुंबईत ३४ हजार ११९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.


पालिकेच्या भाभा रुग्णालयात शनिवारी संध्याकाळी एका ५४ वर्षीय पुरुषाने वाॅशरूममध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा रूग्ण १८ तारखेपासून कोरोनासाठी उपचार घेत आहे. मात्र, त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रूग्णालयात चिंतेचे वातावरण पसरले होते. हा रूग्ण मानसिक तणावाखाली होता. त्याच डिप्रेशनमधून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रूग्णालयाच्या वाॅशरूममध्ये जाऊन त्याने गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. वाॅशरूममधीलच एका हत्याराचा त्याने वापर केला असून आता त्या रूग्णाची प्रकृती स्थिर आहे.


राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याचमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या सर्व उपाययोजांचे डाँक्युमेंटेशन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भविष्यात कोरोनासारखी साथ उदभवली तर सर्व उपाययोजनांची इत्यंभूत माहिती एका क्षणात मिळण्यासाठी सर्वांचे डाँक्युमेंटेशन केले जाणार आहे.कोरोनाची साथ इतर आजारांपेक्षा वेगळी आहे. या विषाणूचा मुकाबला करताना राज्यातील यंत्रणांना इतर देशांच्या अनुभवावरून निर्णय घ्यावे लागले आहेत. या विषाणूचा मुकाबला कसा करायचा याची माहिती  किंवा डाँक्युमेंटेशन उपलब्ध असते तर अधिक चांगल्या प्रकारे कोविड १९चा मुकाबला करता आला असता. त्यामुळे भविष्यात कोरोनासारख्या विषाणुचा प्रादुर्भाव झाला तर अतिशय प्रभावी उपाययोजनांठी कोरोनाच्या उपचार पध्दतींचे डाँक्युमेंटेशन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपवण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज राज्याच्या महसूल व वन विभागाने जारी केला आहे.


मुंबईतील पश्चिम नगरात करोनाने पुन्हा आपले डोके वर काढले असताना दक्षिण मुंबईलाही कोरोनाचा विळखा पडत आहे. दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिल परिसरात नेपियन सी रोडवरील ताहनीहाईट्स ही ३४ मजल्यांची आलिशान इमारत सील करण्यात आली आहे. या इमारतीत आठवड्याभरात तब्बल २१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, यापैकी १९ घरगडी-ड्रायव्हर-वॉचमन आहेत.


राज्यात आज ३ हजार ७२१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३५ हजार ७९६ वर गेली आहे. तर आज राज्यात ६२ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ६ हजार २८३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोग शाळांची संख्या आता १०३वर पोहेाचली आहे. यात ६० शासकीय तर ४३ खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. २६ मे ते २० जून या कालावधीत प्रयोगशाळांच्या संख्येत ३० ने वाढ झाली असून प्रति दशलक्ष चाचण्यांची संख्याही दुप्पटीने वाढली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ९ मार्च रोजी राज्यात कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळून आला त्यावेळेस मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी चाचण्यांची सुविधा होती. त्यानंतर कोराना चाचण्यांच्या सुविधेत राज्यशासनाने वाढ केल्याने ही संख्या आता १०३ एवढी झाली आहे. राज्याचे प्रतिदशलक्ष प्रयोगशाळा नमुन्यांचे प्रमाण ५८४७ एवढे असून देशपातळीवरील हे प्रमाण ४६१० एवढे आहे. (सविस्तर वाचा)


चीनने औषधाच्या कच्चा मालाची किंमत वाढवली

भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. भारतीय सीमेवरील गलवान खोर्‍यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर चीनचे ४३ सैनिक मारले गेले आहेत. या धमुश्चक्रीनंतर चीन आता आर्थिक पातळीवरही भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. याकरता औषधनिर्मितीसाठी लागणार्‍या कच्चा मालाच्या किंमती चीनने वाढवली आहे. (सविस्तर वाचा)


धनजंय मुंडे यांना डिस्चार्ज; दुसरी चाचणी आली निगेटिव्ह

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयातून चार वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील अकरा दिवसांपासून ते या रुग्णालयात कोरोनाच्या आजारामुळे दाखल होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खासगी सचिव तसेच आणखी एक स्वीय सहाय्यक, दोन वाहनचालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्या सर्वांची दुसरीही चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता केवळ एक अंगरक्षक आणि एक कुक हे दोघेच जण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती ही सुधारत आहे. यावेळी आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि प्राथनेमुळे माझी ही दुसरी चाचणी निगेटिव्ह आली असून डिस्चार्ज मिळाल्यामुळे मी ही मुंबईवरून गावी जात असल्याचे धनजंय मुंडे यांनी सांगितले.


राज्यात मागील २४ तासांत ५५ नवे कोरोना पॉझिटिव्ह पोलीस कर्मचारी आढळले असून एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ४ हजार १०३वर पोहोचला आहे.


मलबार हिल येथील तन्ही हाईट्स, नेपियन सी रोड येथे महापालिकने सील केले आहे. गेल्या सात दिवसात २१ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, अशी डी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी ही माहिती दिली.


देशात २४ तासांत कोरोनामुळे सर्वाधिक ४४५ जणांचा मृत्यू झाला असून १४ हजार ८२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे देशांतील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख २५ हजार २८२वर पोहोचला असून १३ हजार ६९९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत २ लाख ३७ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या १ लाख ७४ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचा 


गोव्यात कोरोनाचा पहिला बळी गेला असल्याचे समोर आले आहे. गोव्यातील मोर्लेममधील कोरोनाबाधित ८५ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे.


आज औरंगाबाद जिल्ह्यात १०२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. या कोरोनाबाधितांमध्ये ४९ महिला, ५३ पुरुषांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ८३२वर पोहोचला असून आतापर्यंत १९१ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एक रात्री सातारा जिल्ह्यात २० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८३८वर पोहोचला असून यापैकी ३९ जणांचा मृत्यू झाला आहे.


जगातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात ९० लाख ४४ हजार ५६३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी ४ लाख ७० हजार ६६५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४६ लाख ३२ हजार १०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सविस्तर वाचा


ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत ब्राझीलमध्ये १० लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी ५० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.


राज्यात रविवारी ३८७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोबाधितांचा आकडा १ लाख ३२ हजार ७५ वर पोहोचला आहे. दरम्यान, रविवारी राज्यात दिवसभरात १०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूची संख्या ६ हजार १७० झाली आहे. सविस्तर वाचा