घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईत आज ९९५ नव्या रुग्णांची नोंद

Corona Live Update: मुंबईत आज ९९५ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

मुंबईतील कुपर रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात घातला गोंधळ

- Advertisement -

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. दरम्यान, ते घरीच उपचार घेत आहेत. मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारनंतर सत्तार हे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. (सविस्तर बातमी)

- Advertisement -

कूपर रुग्णालयातील ‘त्या’ रुग्णाच्या मृत्यूबाबत प्रशासनाकडून खुलासा


टिळक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शंकर राजाराम शिबे यांचा सोमवारी रात्री उशिरा सौमेय्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या मृत्यूने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुंबई पोलीस दलातील पोलिसांची ४९ झाली आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईत आज ९९५ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईतील सोमवारच्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत कमी नोंद करण्यात आली आहे. आज मंगळवारी मुंबईत आज दिवसभरात ९९५ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ३ हजार २६२ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ६२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत ८ हजार ३६९ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २४६ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख २७ हजार ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ७ हजार १८८ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ८२ हजार २१७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.७२ % एवढे झाले आहे. (सविस्तर वाचा)


मुंबई महापालिकेचे आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. घोले यांना दोन दिवसांपूर्वी लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी केली. याचा अहवाल प्राप्त झाला असून ते पुढील उपचारासाठी महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.


धारावीत २४ तासांत १० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या २ हजार ५०२ झाली असून १५१ Active केसेस आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.


पुण्याच्या सिरम इंस्टिट्युटमध्ये डिसेंबरपर्यंत बनणार ३० कोटी डोस

कोरोना विषाणूविरोधात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लस बनवण्यात आली आहे. या लसीची मानवी चाचणी घेतली जात आहे. शिवाय या चाचण्या यशस्वीदेखील होत आहेत. भारतातही या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या या लसीचे उत्पादन केले जात आहे. या लसी संदर्भात टीव्ही टुडे नेटवर्कने ऑक्सफर्ड वॅक्सिन ग्रुपचे संचालक अँड्र्यू जे पोलार्ड आणि पुण्याच्या  सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांच्याशी संवाद साधला असता. भारतात डिसेंबरपर्यंत या लसीचे ३० कोटी डोज बनवून तयार होतील असे त्यांनी म्हटले आहे. (सविस्तर वाचा)


कोरोना हवेतून पसरू शकतो

गेल्या काही दिवसांपासून कोरोना नक्की हवेतून पसरतो की नाही, यावर बरीच चर्चा सुरू होती. WHO अर्थात जागतिक आरोग्य परिषदेकडून हवेतून कोरोना पसरत असल्याची काही प्रकरणं समोर आल्याचं मान्य केलं होतं. तरी व्यापक प्रमाणात त्याला मान्यता मिळाली नव्हती. भारतात देखील या दाव्यावरून तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर भारतातील विज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या CSIR अर्थात Council of Scientific & Industrial Research ने ही बाब मान्य केली असून त्यासंदर्भात लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सीएसआयआरचे प्रमुख शेखर सी. मंडे यांनी याबाबत ब्लॉगपोस्ट करून अधिक सविस्तर माहिती दिली आहे. (सविस्तर वाचा)


राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे परभणीतील फौजिया खान यांच्या घरासह परिसर सील करण्यात आला आहे. संपर्कातील सर्वांच्या तपासण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


मुंबईतील वांद्र येथे लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या २५ वर्षीय व्यक्तील गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे.


जळगावात कोरोना संशयित रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पाचोरा येथील क्वारंटाईन सेंटरमधील ही खळबळजनक घटना घडली आहे.


सांगली पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मिरजमधील महिला पोलीस अधिकाऱ्याचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. सविस्तर वाचा 


पुण्यात एका रात्रीत ५५९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४ हजार ५७२वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत १ हजार ३८७ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


आज औरंगाबाद जिल्ह्यात १७९ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ४२०वर पोहोचली असून आतापर्यंत ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार १४८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ५८७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाख ५५ हजार १९१वर पोहोचला असून मृतांचा आकडा २८ हजार ८४ झाला आहे. सविस्तर वाचा 


नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल २७२ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये नाशिक शहरातील १६६ तर ग्रामीण भागातील १०६ नव्या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजार ८८८वर पोहोचला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ८ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा ३९८वर पोहोचला आहे.


जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जगात १ कोटी ४८ लाख ५१ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ६ लाख १३ हजारांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले असून ८९ लाख ६ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


सोमवारी २४ तासांत ८ हजार २४० नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात १७६ जणांना कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख १८ हजार ६९५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सोमवारी दिवसभरात ५ हजार ४६० कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ७५ हजार २९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.९२ % एवढे झाले आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -