घरCORONA UPDATECorona Live Update: बापरे! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १००० पार!

Corona Live Update: बापरे! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १००० पार!

Subscribe

कोरोना व्हायरससंबंधी जागतिक, देश आणि राज्यपातळीवर सर्व माहिती मिळवा आता कोरोना व्हायरस लाईव्ह ब्लॉगवर

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यात आतापर्यंत १५० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०१८ इतकी झाली आहे. त्यामुळे राज्यातील चिंतेत आणखीन भर पडली आहे.

- Advertisement -

आतापर्यंत राज्यातील नवे रुग्णांची संख्या

मुंबई महापालिका – ११६
पुणे महापालिका – १८
अहमदनगर – ३
बुलढाणा -२
ठाणे – २
नागपूर – ३
सातारा – १
औरंगाबाद – ३
रत्नागिरी – १
सांगली – १
एकूण – १५०

राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १०१८

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे पाच जणांचे बळी गेले असून मुंबईत मृतांचा आकडा ४०वर पोहोचला आहे.

सविस्तर वाचा – 

CoronaVirus: गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाचे ११६ नवे रुग्ण, आकडा ६०६वर!


खुशखबर ! आठवड्यानंतर सोमवारी प्रथमच घटली कोरोनाग्रस्तांची संख्या

भारत मागील २ आठवडे कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहे. मात्र तरीही दररोज कोरोनाग्रस्तांची नवीन संख्या दिवसागणिक वाढत असल्याने सर्वांसाठी ही चिंतेची बाब बनत चालली होती. मात्र सोमवारी आठवड्यानंतर प्रथमच नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार स्पष्ट झाल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सोमवारी एकूण ४८९ जणांची कोरोना पॉझिटिव्ह चाचणी अहवाल आला. २८ रोजी १४१ रुग्ण वाढले होते, २९ मार्च रोजी मात्र या संख्येत घाट झाली, त्यानंतर मात्र ५ एप्रिलपर्यंत दररोज ही आकडेवारी वाढत गेली आणि ४ दिवसांत दुप्पट झाली. २८ मार्च रोजी देशात कोरोनाचे एकूण १४१ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यानंतर, २९ मार्च रोजी ही संख्या ११५ होती जी २८ मार्चच्या तुलनेत १८ टक्क्यांनी कमी आहे. यानंतर ३० मार्च रोजी ही संख्या वाढून १९० झाली. ३१ मार्च रोजी ४२६, १ एप्रिलला ४२४, २ एप्रिलला ४८६, ३ एप्रिलला ५६०, ४ एप्रिलला ५७९, ५ एप्रिलला ६०५ नवीन प्रकरणे नोंदली गेली. ६ एप्रिलला नवीन प्रकरणांची संख्या ४८९ वर आली असून ती ५ एप्रिलच्या तुलनेत २० टक्क्यांनी कमी आहे.


डोंबिवलीतील लग्न सोहळ्याकडे कानाडोळा केल्यामुळे प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे निलंबित

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच संचारबंदी आणि जमावबंदी घोषित केली असतानाही डोंबिवलीत लग्न सोहळा पार पडला. त्या सोहळयात कोरोनाग्रस्त रुग्ण सहभागी झाल्याने त्याचा संसर्ग इतरांनाही झाला आहे. त्यामुळे सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांना निलंबित करण्यात आले आहे. केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही कार्यवाही केली आहे.

जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली होती तसेच जमावबंदी आदेश लागू केला होता. डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली परिसरात विवाह सोहळा पार पडला. १५ मार्चला तुर्कीस्थानहून परतलेल्या तरूणाच्या चुलत भावाचा विवाह होता. मात्र त्या तरूणाला १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहण्याची सूचना देण्यात आली होती. तरीसुध्दा तो तरूण हळदी आणि लग्न सोहळ्यात सहभागी झाला होता. त्यानंतर त्या तरूणाला कोरोनाची लागण झाल्याने त्याला मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र तो तरूण विवाह सोहळ्यात सहभागी झाल्याने प्रशासनाची झोपच उडाली होती. लग्न सोहळ्यात साधारण एक हजार नातेवाईक सहभागी झाले होते. महापौर विनिता राणे यांच्यासह अनेक नगरसेवक पदाधिकारीही लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यामुळे सर्वांनाच पोलिसांनी होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आवाहन केले होते. कोरोनाग्रस्त तरूणाच्या संसर्गामुळे अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे रूग्ण आढळून आले तसेच अजूनही येत आहेत. त्यामुळे लग्न सोहळा खूपच महागात पडत आहे. मात्र सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असतानाही आणि जमाव बंदीचा आदेश असतानाही स्थानिक प्रशासनाकडून अथवा पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती का? पोलीस आणि पालिका प्रशासनाने तो कार्यक्रम का रोखला नाही? असा सवाल उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी लग्न सोहळा आयोजकांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र १५ दिवसानंतर केडीएमसी आयुक्तांनी ह प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी उल्लंघन करून वरिष्ठांच्या सूचना पाळल्याबाबत निलंबनाची कारवाई केली आहे.


दादरमध्ये आणखीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. ६९ वर्षाच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीने कोणताही परदेशी प्रवास केला नसून सध्या त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


आतापर्यंत देशात ३२६ जण रिकव्हर झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४ हजार ४२१ कोरोनाचे रुग्ण आढळले असून गेल्या २४ तासात ३५४ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

रेल्वेत दररोज ३७५ आयसोलेशन बेड्स तयार केले जातात

भारतीय रेल्वेन २ हजार ५०० डब्यांमध्ये ४० हजार आयसोलेशन बेड्स तयार केले आहेत. दररोज ३७५ आयसोलेशन बेड्स तयार केले जात असून देशभरातील १३३ ठिकाणी सुरू आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हणाले.

 


पुण्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यात ससून हॉस्पिटमध्ये या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता पुण्यात मृतांचा आकडा ८वर पोहोचला आहे.


क्वॉरंटाइन सेंटरमध्ये उघड्यावर विष्ठा

दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलीगी जमात मरकजमध्ये सामील झालेल्यांचा देशभरात शोध घेण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर तबलीगी जमातच्या काही लोकांना दिल्लीतील क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या किळसवाण्या प्रकारामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तबलीगींना ठेवण्यात आलेल्या ठिकाणी उघड्यावर विष्ठा तर काहींनी शौच केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. त्यामुळे दिल्लीतील नरेला येथील क्वॉरंटाइन सेंटरकडून याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


महापालिकेचे बोधचिन्ह वापरुन जनतेची फसवणूक

‘करोना कोविड १९’ या आजाराच्या प्रतिबंधासाठी महापालिका सातत्याने सर्वस्तरीय कार्यवाही करत आहे. यासाठी महापालिकेचे डॉक्टर्स, नर्स आणि विविध खात्यांचे कर्मचारी अव्याहतपणे कार्यरत आहेत. मात्र, काही समाजविघातक प्रवृत्तीचे लोक याचा गैरफायदा घेत महापालिकेचे बोधचिन्ह आणि नाव अनधिकृतपणे वापरून देणग्या गोळा करत सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करत असल्याची बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या अनुषंगाने संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.


बारामतीकरांनो सावधान! 

बारामतीकरांनामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण बारामतीत आता रिक्षा चालका पाठोपाठ भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याच्या आजूबाजूचा ५ किमीपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे.


मातोश्री बाहेरील पोलीस कर्मचारी बदलले

मातोश्री बाहेरील चहावाला कोरोना बाधित सापडल्याने मातोश्री बाहेरील १८० पोलीस कर्मचारी बदलण्यात आले आहेत.


नगरकरांची चिंता वाढली; कोरोनाबाधितांचा आकडा २५ वर

कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता अहमदनगरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या संशयितांच्या स्त्राव चाचणीत तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर श्रीरामपुरमध्ये देखील एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आता अहमदनगरच्या कोरोनाबाधितांची संख्या २५ वर गेली आहे. सध्या या रुग्णावर पुण्यात उपचार सुरु आहेत.


देशातला लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आता हा कालावधी संपण्यासाठी आठवड्याचा काळ शिल्लक राहिला आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हा उपाय अंमलात आणण्यात आला होता. परंतु, कोरोनाची दहशत अद्यापही संपलेली नाही. त्यामुळे येत्या काळात देशातील कोरोना प्रभावित अशा किमान सात राज्यामध्ये तरी लॉकडाऊनचा काळ वाढविण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.


कोरोपासून बचाव करण्यासाठी बँकेच्या कॅशिअरने केला जुगाड

 


९ महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

कोरोनाची लागण झालेल्या एका नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. नालासोपारा येथील रहिवासी असणाऱ्या ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्या महिलेला मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र, तिचा ४ एप्रिल रोजी सायंकाळच्या वेळेस मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच मृत्यू असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.


बॉलिवूड निर्माता करीम मोरानीची दुसरी मुलगीही कोरोनाबाधित

प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि शाहरुख खानचा निकटवर्ती करीम मोरानीच्या दुसऱ्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे.


धारावीच्या डॉ. बालिगानगरमध्ये दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता धारावीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या सातवर पोहोचली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरील चहावाल्याच्या इमारतीमधील चार जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचा संशय व्यक्त करत क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर मातोश्रीवरील काही सुरक्षरक्षक या स्टॉलवर चहा पिण्यासाठी जात असत, त्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

 


देशभरात ४,७५७ कोरोनाग्रस्त रुग्ण, मृत्यू १३२

कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून आता देशभरात ४,७५७ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. तर १३२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. सोमवारी ४७९ नवीन रुग्ण आढळून आले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -