घरCORONA UPDATECorona Live Update: उल्हासनगरमध्ये आढळले ३० नवे कोरोनाबाधित रुग्ण

Corona Live Update: उल्हासनगरमध्ये आढळले ३० नवे कोरोनाबाधित रुग्ण

Subscribe

शनिवारी आलेल्या चाचणी अहवालानुसार उल्हासनगरच्या ३० रहिवाश्यांची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली आहे. यामुळे उल्हासनगर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ३३५ झाली आहे.


भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांनाच शनिवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात देखील सात नवे रुग्ण आढळले आहेत. या नऊ चौदा नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २०९ वर पोहचला आहे.

- Advertisement -

मॉस्कोला जाणारे एअर इंडियाचे विमान शनिवार दिल्लीला माघारी बोलावले आहे. कारण त्या विमानातील वैमानिका कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

- Advertisement -

यवतमाळ मध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला असल्याचे समोर आले. शनिवारी पहाटे कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकाही मृत्यू नोंद झाली नव्हती. यवतमाळमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकाडा १२५ पर्यंत पोहोचला आहे. तर त्यापैकी ९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला २ जूनपर्यंत स्थलांतरित मजुरांना मूळ ठिकाणी परत पाठवल्याचा अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.


मागील सहा महिन्यांचे वेतन न दिल्याने काशिबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आज रुग्णालयाबाहेर आंदोलन केले.


राज्यात एका दिवसात ११४ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर एका पोलीसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्या दोन हजार ३२५वर पोहोचली असून आतापर्यंत २६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.


देशात गेल्या २४ तासांत सात हजार ९६४ नवे रुग्ण आढळले असून २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख ७३ हजार ७६३वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा चार हजार ९७१ आहे. सध्या ८६ हजार ४२२ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच ८२ हजार ३७० जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा – 

Coronavirus: देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७,९६४ नवे रुग्ण!


जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ६० लाख ३० हजार ४३९वर पोहोचला आहे. त्यापैकी ३ लाख ६६ हजार ८०९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६ लाख ५९ हजार २६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


जगात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनामुळे अमेरिकेत सर्वाधित मृत्यू झाले आहेत. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, मागील २४ तासांत अमेरिकेत एक हजार २२५ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा एक लाख दोन हजार ७९८वर पोहोचला आहे. तसंच १७ लाख ४५ हजार ६०६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -