घरCORONA UPDATECorona Live Update: 'लॉकडाऊन ३० एप्रिलच्याही पुढे वाढू शकतो'

Corona Live Update: ‘लॉकडाऊन ३० एप्रिलच्याही पुढे वाढू शकतो’

Subscribe

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ हजार ५७४ झाली आहे. तर, १३ जणांचा बळी गेला आहे. तर आजपर्यंत १८८ लोक पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकवर लाईव्ह येत १४ एप्रिलचा लॉकडाऊन राज्यापुरता किमान ३० एप्रिल पर्यंत वाढवत असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील फेसबुकवर लाईव्ह येत, राज्याचा आरोग्यविषयक आढावा दिला. यावेळी त्यांनी सांगितले की, लोकांनी आतातरी शिस्त पाळली पाहीजे. अन्यथा हा लॉकडाऊन आणखी पुढे जाण्याची शक्यता आहे.

कोरोनाला संपविण्यासाठी महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यं वाढविण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह संवाद साधत असताना याची घोषणा केली. मात्र या लाईव्हमध्ये त्यांनी भाजप नेत्यांना कानपिचक्याही दिल्या. आव्हाड यांचे मारहाण प्रकरण आणि वाधवान यांना दिलेली सूट या प्रकरणा भाजपने आरोपांची राळ उडवली आहे. त्यावर ठाकरे म्हणाले की, “आपल्याला आता राजकारण करण्याची गरज नाही. पक्षिय राजकारण इथल्या इथे थांबली पाहिजे. कोरोना विरोधात सर्वांची एकजूट कायम रहायला हवी.”

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ३० एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊन घोषणेनंतर आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे सायंकाळी ६ वाजता फेसबुक लाईव्हमधून जनतेला संबोधित करणार आहेत. यामध्ये ते राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या स्थितीबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतल्याच्या माहितीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुजोरा दिला आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पंतप्रधानांनी लॉकडाऊन वाढवण्याचा अगदी योग्य निर्णय घेतला आहे. आज भारताची परिस्थिती अनेक विकसित देशांच्या तुलनेत चांगली आहे. कारण आपण फार लवकर लॉकडाऊचा निर्णय घेतला. जर आपण आता तो हटवला तर नुकसान होईल. त्यामुळे लॉकडाउन वाढवण्याची गरज आहे’.


आपण लॉकडाऊनच्या निर्णयात तडजोड करू शकत नाही. लॉकडाऊनबाबत येत्या एक – दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत निर्णय घेणार आहे, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिली आहे.

- Advertisement -


धारावीत कोरोनाचा चौथा बळी

धारावीतील एका ८० वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

मुंब्रा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली असून ते अधिकारी किती जणांच्या संपर्कात आले आहेत. सध्या त्याचा शोध सुरू आहे.


२२ वर्षीय तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू

मालेगावात कोरोनाचा विळखा वाढत आहे. शनिवारी सकाळी मालेगावातील रहिवासी असलेल्या कोरोनाबाधित तरुणीचा धुळे येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंत मालेगावातील दोन जणांचे मृत्यू झाले असून कोरोनाबाधितांची संख्या नऊ झाली आहे. (सविस्तर वाचा)


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राज्यात वाढवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


वर्षा निवासस्थानाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले असून त्यांच्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपास्थित आहेत.


राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढता दिसत आहे. राज्यात आज नव्या ९२ कोरोनाबाधित रुग्णांची भर झाली आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ६६६ वर गेली आहे. (सविस्तर वाचा)

  • मुंबई – ७२
  • औरंगाबाद – २
  • मालेगाव – ५
  • पनवेल – २
  • कल्याण – डोंबिवली – १
  • ठाणे – ४
  • पालघर – १
  • नाशिक ग्रामीण – १
  • नाशिक शहरी – १
  • अहमदनगर – १
  • पुणे – १
  • वसई – विरार – १

एकूण – ९२


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे फैसला काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (सविस्तर वाचा)


‘लॉकडाऊनचे निर्बंध हटवण्यात घाई केली तर त्याचे घातक परिणाम भोगावे लागतील’, असे टेड्रोस एडहानोम याचे म्हणणे आहे. (सविस्तर वाचा)


औरंगाबाद शहरात पुन्हा दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.


साताऱ्यात कोरोना रुग्णांचा आकडा २० वर

सातारा परिसरातील ४० वर्षीय महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २० वर पोहोचला आहे.


कोल्हापूरमध्ये आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आता कोल्हापुरची संख्या ६ वर गेली आहे. शाहूवाडी तालुक्यातील उचत इथल्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला दिल्लीतील कार्यक्रमाला जाऊन आलेल्या तरुणाच्या संपर्कात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेत उचत मधल्या कोरोनाग्रस्त तरुणाची ही नातेवाईक आहे.


राज्यात कोरोनाचा विळखा वाढला

राज्यात कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात २१० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. परिणामी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ हजार ५७४ झाली आहे. तर, १३ जणांचा बळी गेला आहे. तर आजपर्यंत १८८ लोक पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. राज्यात मुंबई आणि पुणे जिल्हा हे संवेदनशील झाली आहेत. मुंबईत सर्वाधिक म्हणजे १००८ रुग्णांची नोंद आहे. तर, त्याआखोखाल पुणे जिल्हात २५४ रुग्णसंख्या आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -