घरCORONA UPDATECorona Live Update: आतापर्यंत मुंबईमध्ये १०६ नवे रुग्ण, आकडा ६९६वर!

Corona Live Update: आतापर्यंत मुंबईमध्ये १०६ नवे रुग्ण, आकडा ६९६वर!

Subscribe

मुंबईमध्ये बुधवारी तब्बल १०६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतील आकडा ६९६ वर पोहचला आहे. तसेच पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४५ वर पोहचला आहे.

मुंबईमध्ये बुधवारी १०६ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ६९६ वर पोहचला आहे. मुंबईमध्ये बुधवारी ३१३ जणांना संशयित रुग्ण म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुंबईमधील २४ वार्डमध्ये ११ हजार लोकांना क्वारंटाईन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. झोपडपट्टी, चाळी आणि गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे अतिधोका असलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.

- Advertisement -

जिल्हा / मनपा                      बाधित रुग्ण       मृत्यू
मुंबई                                   ७१४              ४५
पुणे महानगरपालिका                  १६६              १०
पिंपरी चिंचवड मनपा                  १७                ०
पुणे ग्रामीण                             ६                 ०
ठाणे मनपा                             २४                ३
कल्याण डोंबिवली मनपा              २६                २
नवी मुंबई मनपा                        २९                २
मीरा भाईंदर                             ३                 १
वसई विरार मनपा                      १०                 २
पनवेल मनपा                            ६                 ०


राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृतांचा आकडा ७२वर पोहोचला आहे.

- Advertisement -

आतापर्यंत राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी

मुंबई महापालिका – ७२
नवी मुंबई महापालिका – १
बुलढाणा – १
पुणे महापालिका – ३६
अकोला – १
ठाणे – ३
कल्याण-डोंबिवली महापालिका – १
पुणे – २
एकूण – ११७


रेल्वे कर्मचाऱ्यांकडून केंद्र आणि राज्य सरकारला १ कोटीची मदत निधी  

देशात आणि राज्यात कोरोना विषाणूच्या विरोधात लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदत म्हणून नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून १ कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात राज्य सरकारला ५० लाख तर केंद्र सरकारला ५० लाख रुपये असे एक कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातील एक दिवसाचा पगार मदत निधीसाठी देण्याकरिता आव्हान सुद्धा नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून करण्यात आले आहे, अशी माहिती युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी दिली आहेत.

कोरोना या जागतिक संकटासाठी देशात २१ दिवसांचे लाॅकडाऊन ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार या माहामारीतून निघण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था पंतप्रधान यांना मदत निधी देऊन कोरोना विरूद्ध लढण्याचा लढा प्रबळ करत आहे. त्यासाठीच रेल्वेच्या नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने सुद्धा मदत करणार आहे. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे देशभरात रेल्वे कर्मचारी सदस्य आहेत. त्याच्या सदस्य नोंदणी फ्री मार्फत जमा केले पैसे आहेत. त्या ठेवीतून केंद्र आणि राज्य सरकारल १ कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात राज्य सरकारला ५० लाख रुपये तर केंद्र सरकारला ५० लाख असे एक कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११३५वर पोहोचली आहे. तसंच कोरोना रुग्णांचा गुणाकार होत नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. याशिवाय संपूर्ण धारावी बंद करण्याची गरज नसल्याचे देखील त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी सांगितलं.


टिटवाळयातही करोनाचा रूग्ण आढळला

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रोजच्या रोज नवीन रूग्ण आढळून येत असतानाच बुधवारी कल्याण डोंबिवलीपाठोपाठ टिटवाळ्यातही कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता ३८ वर जाऊन पोहोचली आहे.

‘तापाचे दवाखाने’सुरू

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नव्याने तीन रूग्ण आढळून आले त्यात टिटवाळयातील एका रूग्णाचा समावेश आहे. कल्याण पूर्वेतील एका महिला रूग्णाचा समावेश असून ही महिला कोरोनाबाधित रूग्णाची निकट सहवासित आहे. तर डोंबिवली पूर्वेत आढळलेला पुरुष रुग्ण हा लग्न सोहळ्याशी संबंधित आहे टिटवाळा येथे आढळलेली महिला रुग्ण ही शासकीय रुग्णालयात आया म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आज सापडलेल्या नवीन तीन रुग्णांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३८ वर जाऊन पोहोचला आहे. तर डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या आता ७ झाली आहे. कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्‍याकरिता आणि नागरिकांना त्‍यांच्याच परिसरात तातडीने उपचार मिळण्‍याच्‍या हेतूने महापालिकेमार्फत महापालिका क्षेत्रात एकूण ८ ठिकाणी ‘तापाचे दवाखाने’सुरू करण्यात आलेले आहेत. तापाच्‍या दवाखान्‍यात सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळणाऱ्‍या व्‍यक्‍तींना उपचार आणि सल्‍ला देण्‍यात येत आहे. सदर ठिकाणी नागरिकांना संपर्क साधणे सोयीस्‍कर व्‍हावे याकरिता महापालिकेमार्फत सदर ठिकाणी खालीलप्रमाणे संपर्क क्रमांक उपलब्‍ध करून देण्‍यात आलेले आहेत.


भिवंडीतून उत्तर प्रदेशात ६० कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकांवर गुन्हा दाखल

लॉकडाऊनमुळे भिवंडी परिसरातील असंख्य कामगारांचे काम बंद असल्याने कामगारांना आपल्या गावाकडे जाण्याची ओढ लागली असताना सर्व प्रवासी वाहतूक बंद असतानाच सोमवारी शहरातील ५५ ते ६० कामगारांना ट्रक मधून उत्तरप्रदेश येथे घेऊन जाण्यासाठी निघाले. त्यावेळी भोईवाडा पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत ट्रक मालक आणि चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

मुंबई शिवाजीनगर गोवंडी येथील ट्रक मालक मोहम्मद अल्ताफ अकबर अली सय्यद याने आपल्या आयशर ट्रक क्रमांक एमएच ०३ सी व्ही ०४२९ चा चालक इरफान अहमद नसीम अहमद फारुकी याच्या मदतीने करिवली ग्रामपंचायत हद्दीतील नालापार येथे ट्रक मध्ये ५५ ते ६० इसमांना दाटीवाटीने बसून घेऊन जाण्याच्या तयारीत होता. मात्र याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांना समजताच त्यांनी तात्काळ पोलीस पथक त्या ठिकाणी रवाना करून घटनास्थळा वरून ट्रक ताब्यात घेत. ट्रक मालक मोहम्मद अल्ताफ अकबर अली सय्यद आणि चालक इरफान अहमद नसीम अहमद फारुकी या दोघांन विरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाघ हे करीत आहेत.


प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि शाहरुख खानचा निकटवर्ती करीम मोरानी याला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. याअगोदर त्याच्या दोन्ही मुली शजा मोरानी आणि अभिनेत्री झोया मोरानी यांनी कोरोनाची लागण झाली होती.


देशात कोरोना धोका वाढला – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव

आतापर्यंत कोरोनाचे ४०२ रुग्ण रिकव्हर झाले असून त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात एकूण ५१९४ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या एका दिवसात कोरोनाचे ७७३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. काल सुमारे ३२ कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज दिली. तसंच ते म्हणाले की, देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हानिहाय अॅक्शन प्लॅन तयार आहे. पुणे, कोंढवात येथे घरी जाऊन तपासणी केली जात आहे.

 


देशभरात कोरोना व्हायसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. त्यातील निम्माहून अधिक कोरोनाचे रुग्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सापडलेत आहेत. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आता कठोर नियम लागू केला आहे. मुंबईत आता मास्क वापरणे सक्तीचे झाले आहे. घराबाहेर पडताना आणि सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क नसेल तर तुम्हाला अटक करून गुन्हा दाखल होणार आहे.


पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले असून काही परिसर आज मध्यरात्रीपासून सील करण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. कोरोना बाधितांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.


भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना अटक करण्यात आली आहे. खुद्द सोमय्या यांनी आपल्या ट्विटरवर याची माहिती दिली आहे. मला पोलिसांनी मुलुंड येथील माझ्या घरातून अटक केली असून आता मला नवघर पोलीस स्थानकात आणले असल्याचे त्यांनी सांगितले.

किरीट सोमय्या यांच्या या ट्विट नंतर भाजपनेही टीका केली आहे. ‘तबलीगींना शोधायला वेळ नाही, भाजप नेत्यांना अटक करायला वेळ आहे’, अशी टीका भाजपने केली आहे.

 



मुंबईतील धारावी आणि माहिममध्ये अनुक्रमे दोन रुग्ण आढळले

मुंबईतील धारावी आणि माहिममध्ये अनुक्रमे दोन रुग्ण आढळले आहेत. धारावीतील कोरोना बाधितांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. वरळीतील एका ४३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे. वरळीच्या जिजामाता नगर येथे त्यांचे मटण दुकान होते. तर माहिममधील नर्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या नर्सलाही कोरोनाची लागण झाली आहे.


पुण्यात कोरोनाचा ९ वा बळी

पुण्यात कोरोनाने ९ वा बळी घेतला आहे. आज सकाळी रविवार पेठ येथील ४४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनासह अन्य आजारांमुळे मृत्यू झाला. या रुग्णाला ४ एप्रिलरोजी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


काही राज्यांमध्ये लॉकडाऊन वाढण्याची शक्यता

केंद्र सरकारने जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपत आहे. मात्र त्यानंतरही काही आठवडे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. हा निर्णय राज्य घेणार आहेत. सध्या महाराष्ट्र, तेलंगणा, पंजाब आणि आता मध्य प्रदेशमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेला आहे. त्यामुळे या राज्यात लॉकडाऊन अधिक काळ चालेल, अशी शक्यता आहे. तरिही १४ तारीख जवळ आल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -