घरCORONA UPDATECorona Live Update: ठाण्यात ६ वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण!

Corona Live Update: ठाण्यात ६ वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण!

Subscribe
ठाण्यातील खारेगाव परिसरात एका ६ वर्षांच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे. कोल्हापूरमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात ही मुलगी आली होती. त्यावेळी तिची कोरोनाची टेस्ट झाली. ती निगेटिव्ह आली. ती मुलगी इथेच होम क्वारंटाईन होती. मात्र इथे केलेल्या टेस्टमध्ये ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली. मुलीला होरायझन मध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर तिचे आई-वडील, काका आणि आजी यांना भायंदरपाडा क्वारंटाईनमध्ये नेण्यात आलं आहे.

राज्यात कोरोना बाधितांचा एकूण आकडा १३६४…२२९ नवे रुग्ण आणि आज २५ जणांचा मृत्यू…एकूण १२५ जणांना डिस्चार्ज…एकूण मृत्यू ९७…मुंबईतील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ८७६…आज पुण्यात १४ तर मुंबईत ९ मृत्यू!


नायर हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने एका निवासी डॉक्टराला कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या त्या डॉक्टरला कोविड १९ वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. नायरमध्ये तपासणीसाठी आलेल्या एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरांची स्वाब तपासणी करण्यात आली. त्यात एक निवासी डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

मुंबईमध्ये गुरुवारी तब्बल ७९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे मुंबईतील आकडा ७७५ वर पोहोचला आहे. तसेच नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५४ वर पोहचला आहे. तसेच गुरुवारी ६ रुग्णांना घरी पाठवण्यात आल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६५ झाली आहे.


दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा येथील स्नेहल चाळीत राहणाऱ्या ३६ वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कांदरपाडामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.

- Advertisement -

मुंबई शहर आणि उपनगरांना भाजीपाला आणि अन्नधान्याचा पुरवठा करणारे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट शनिवारपासून बंद ठेवण्यात येणार आहे. मसाला मार्केट मधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी उघड झाले. त्यानंतर कांदा-बटाटा, भाजीपाला आणि  फळ मार्केटमधील व्यापाऱ्यांनी गुरुवारी एका बैठकीत तिन्ही बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला.


औरंगाबादमध्ये लॉकडाऊनमध्येही ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवणाऱ्या पोलिसांना त्यांच्याच लाठीने या दुचाकीस्वारांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशीच एक घटना मुंबईत देखील घडली असून मुंबईच्या गोवंडी परिसरामध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना रोखणाऱ्या वाहतूक पोलिसालाच आपल्या दुचाकीसोबत एकाने फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आपल्यासाठी रस्त्यावर जिवावर उदार होऊन ड्युटी करणाऱ्या पोलिसांवरच हात उचलण्याच्या या प्रकारांवर संताप व्यक्त होत आहे.


धारावीमध्ये कोरोनाचे अजून ३ रुग्ण, त्यातील एक जण दिल्लीच्या निजामुद्दीनला झालेल्या मरकजशी संबंधित असल्याची माहिती.


नगरमधील अत्यावश्यक किराणा दुकाने, दुध, दुग्धोत्पादन, व भाजीपाला, औषधालय यांची दुकाने दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते उद्या दि. १० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहतील. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. मुस्लिम धर्मियांच्या शब्ब-ए-बारातच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व नागरिकांनी घरात राहून सण साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


मुंबईतील कंटेनमेंट झोनमधील औषधांची दुकानं वगळता भाजी, किराणा, फळांची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनदरम्यान कर्मचाऱ्यांचे पगार कापू नयेत, असे आदेश सरकारने दिले आहेत. यानंतरही घणसोली येथील श्रीमती इंदिरा गांधी अभियांत्रिकी कॉलेजने सरकारचे आदेश धाब्यावर बसवत प्राध्यापकांना केवळ १० हजार रुपये पगार दिला आहे. सरकार आणि विद्यापीठाच्या आदेशाला न जुमानणाऱ्या कॉलेजवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्राध्यापकांच्या मुक्ता संघटनेने उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.


यवतमाळमध्ये विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना २ हजार रुपयांच्या दंडाचा निर्णय. जर दंड भरला नाही, तर १० दिवस खावी लागेल तुरुंगाची हवा!


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय. पुढच्या वर्षभरासाठी राज्यातल्या सर्व आमदारांच्या पगारात ३० टक्क्यांची कपात.


मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यातच आता केईएममधील एका ४७ वर्षाच्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. हा डॉक्टर वरळीतील रहिवासी असून या डॉक्टराला केईएम हॉस्पिटलमध्येच क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.


हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन योग्य पद्धतीनेच उपयोगात आणायला हवी. हे औषध ह्रदयविकारासाठी हानीकारक आहे. त्यामुळे ज्यांच्यासाठी ते दिले जातात, त्यांनीच त्याचा वापर करणं आवश्यक आहे – केंद्रीय आरोग्य सचिव


जे गोष्ट जिथे आवश्यक असेल, तिथेच तिचा वापर केला जावा. त्यामुळे पीपीईंची कमतरता आहे असं नसून आवश्यकतेनुसार त्यांचा वापर केला जातो. जिथे कोरोनाची खूप जास्त जोखीम असते, तिथेच पीपीई किटची आवश्यकता आहे. उदा. रुग्णालय, लॅब किंवा मॉर्चुरी – केंद्रीय आरोग्य सचिव


या वेळी कोणत्याही फेक न्यूजवर विश्वास ठेऊ नका. माहिती हवी असेल तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कॉल सेंटरशी संपर्क साधा. त्याशिवाय सरकारच्या वेबसाईटवर देखील जाऊन माहिती घेऊ शकता – केंद्रीय आरोग्य सचिव


देशभरात आत्तापर्यंत कोरोनामुळे १६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे – केंद्रीय आरोग्य सचिव


होम क्वॉरंटाईनला ट्रेस करण्यासाठी कर्नाल ट्रेसरसारख्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे – केंद्रीय आरोग्य सचिव


रेल्वेकडून २ हजार ५०० पेक्षा जास्त डॉक्टर आणि ३३ हजार पॅरामेडिक्सची मदत केली आहे. रेल्वेने विविध प्रकारची रुग्णालये देखील कोरोनाबाबतच्या उपचारांसाठी उपलब्ध करून दिले आहेत – केंद्रीय आरोग्य सचिव


१ मे रोजी महाराष्ट्रदिनाचा ध्वजारोहण होणार. मात्र, कोणताही समारोह नाही!


इतर देशापेक्षा भारतात कोरोनाचा मृत्यूदर अधिक असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला देशात कोरोना विषाणूची संख्या १०० वरुन १ हजारपर्यंत पोहोचण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागला. त्यामुळे कमी वेगाने कोरोनाची संख्या वाढणारा भारत देश हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पण दुर्दैवाने पुढील दिवस भारत अशीच कामगिरी करु शकला नाही. इंडिया टुडे डेटा इंटेलिजेंस युनिटने जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेच्या दैनिक स्थिती अहवालाची छाननी केली असता १ हजारांचा आकडा पार केल्यानंतर भारताने ९ दिवसांच्या कालावधीत ५ हजार कोरोना रुग्णांचा आकडा पार केला आहे.


लोकांची गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केट बंद करण्याची शक्यता बाळासाहेब थोरात यांनी वर्तवली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य होणे गरजेचे होते. तसे न झाल्यास घटनात्मक पेच निर्माण झाला असता. विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त दोन जागा रिक्त होत्या. त्या जागेवर आता उद्धव ठाकरे यांची वर्णी लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.


कोरोनाबधित रुग्ण परदेशातून आलेला माहीत असताना तसेच त्याला कोरोना संसर्गजन्य लक्षणे असताना प्रशासनाला जाणीवपूर्वक न कळवता कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा संभव असलेली कृती केल्या प्रकरणी तसेच लोकसेवकांच्या आदेशाची अवज्ञा केल्या प्रकरणी डॉ. जावेद महाडिक यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



राज्यात काल कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ११३५ झाली आहे.
  कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ९४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेतअशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. सध्या राज्यात ३४ हजार ९०४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४४४४  जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.  

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -