घरCORONA UPDATELive Corona Updates: मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये एकूण ७७ नवे रुग्ण, ५...

Live Corona Updates: मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये एकूण ७७ नवे रुग्ण, ५ मृत्यू!

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये एकूण ७७ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २१२० इतका वाढला आहे. याशिवाय २४ तासांत ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे एकूण ३७ रुग्ण २४ तासांत बरे होऊन घरी परतले आहेत.

mumbai letter


पवईतील 48 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा
पवई मिलिंद नगर येथील ४८ वर्षीय व्यक्तिला कोरोना बाधा झाल्याचे‌ निदान करण्यात आले. त्यांना बाळासाहेब ट्रॉमा रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या पवईतील मिलिंद नगर सील करण्यात आले आहे. रुग्णाच्या परिसरातील रहिवाशांच्या हालचालींवर निर्बंध आणले आहेत. जेव्हिएलआरच्या बाजूच्या या वसाहतीत‌ दीड ते दोन हजार लोकवस्ती असल्याचा अंदाज करण्यात‌ येत आहे. रुग्णाच्या पत्नीली व मुलीला संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत आहे. तर येथील ३० ते‌ १४ जणांना होम क्वारंटाईन सुचविण्यात आले आहे. एस वॉर्ड परिसरात हा भाग येत असून गुरुवारी एस वाॉर्ड मधील कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या ७५ वर होती. आता १०० रुग्णसंख्येकडे वाटचाल होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

- Advertisement -

देशभरात आत्तापर्यंत १३ हजार ३८७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासात १००७ रुग्ण सापडले असून २३ जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाच्या पत्रकार परिषदेमध्ये आज देशातील कोरोनाची परिस्थिती आणि सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे.


भिवंडीत कोरोनाचे आणखीन दोन रुग्ण सापडले ; रुग्णांची संख्या झाली चार 

- Advertisement -
या अगोदर शहरातील बंगालपुरा येथे एक पुरुष व ग्रामीण भागातील बोरिवली येथे एक महिला असे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून शुक्रवारी शहरातील वेताळपाडा व अवचितपाडा या भागात दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.त्यामुळे आता एकूण चार रुग्णांची भिवंडीत नोंद झाली आहे तर ११४ जणांना कोरोटाईन करण्यात आले आहे  प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकार वाढू लागल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात आलेल्या ३६ कार्यकर्त्यांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन दिली आहे. याबद्दल त्यांनी देवाचे आभार मानले आहेत.

 


भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १३,३८७ वर

मागच्या २४ तासात संपुर्ण देशात १००७ नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १३,३८७ वर पोहोचला आहे. तर २४ तासा २३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पत्रकार परिषद सुरु आहे.

 


एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी १० टक्के रुग्ण बरे झाले

महाराष्ट्रात काल २८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. आता राज्यातील रुग्णांची एकूण संख्या ३२०२ झाली आहे, तर यातील ३०० रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. या आकडेवारीवर नजर टाकली असता एकूण रुग्णांच्या संख्येपैकी १० टक्के रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेल्याचे कळते. निश्चितच पुढच्या काही काळात बरे होण्याचा आकडा वाढेल, अशी आशा करुयात.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ हजार ६७३ नमुन्यांपैकी ५२ हजार ७६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३२०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७१,०७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६१०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १९४ झाली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यूचा दर हा देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. या मृत्यूंची कारणमीमांसा आणि उपाययोजना करण्यासाठी तसेच जिल्हा पातळीवर रुग्णोपचार करणा-या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरावर तज्ञ डॉक्टरांचे विशेष दल ( टास्क फोर्स ) स्थापन करण्यात आले आहे. यामुळे राज्यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी एक हॉटलाईन उपलब्ध होणार आहे.
या टास्क फोर्स मधील तज्ञ डॉक्टरांना सोमवार ते रविवार असे दिवस वाटप करण्यात आले असून या टास्क फोर्समध्ये शासकीय तसेच खाजगी आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचा समावेश आहे. डॉ. झहीर उदवाडिया , डॉ. नितीन कर्णिक, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. केदार तोरस्कर, डॉ. ओम श्रीवास्तव , डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडीत या तज्ञांचा या टास्क फोर्समध्ये समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -