घरCORONA UPDATELive Corona Update: 'ग्रीन झोनमधील निर्बंध अधिक शिथिल केले जाणार'

Live Corona Update: ‘ग्रीन झोनमधील निर्बंध अधिक शिथिल केले जाणार’

Subscribe

कोरोनामुक्त गोव्यात पुन्हा कोरोनाची एन्ट्री

कोरानामुक्त गोव्यात पुन्हा कोरोनाने एन्ट्री घेतली आहे. गोव्यात १८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गोव्यात आढळेल्या नव्या रुग्णांमध्ये ट्रेनमधून प्रवास करणारे काही प्रवासी असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. त्यामुळे मजुरांना घेऊन जाणारी दिल्ली-थिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस राज्यात न थांबवण्याचा निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला. 

- Advertisement -

आतापर्यंत ५० हजार उद्योग सुरु झाले असून ७० लाख लोक कामावर रुजू झाले आहेत – मुख्यमंत्री


रेड झोनमध्ये निर्बंध शिथिल होणार नाहीत – मुख्यमंत्री

- Advertisement -

ग्रीन झोनमधील निर्बंध अधिक शिथिल केले जाणार आहेत – मुख्यमंत्री


कोरोनाच्या काळाता निवडणूक बिनविरोध झाल्या हे उत्तम – मुख्यमंत्री


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


दिल्लीत खासगी कार्यालयं आणि बाजारपेठा उघडण्यास संमती – केजरीवाल

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिल्लीत खासगी कार्यालये आणि बाजारपेठा उघडण्यास केजरीवाल सरकारने संमती दिली आहे. मात्र, जास्तीत जास्त कर्मचारी घरुन काम करतील असे पाहावे, असेही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले आहेत. (सविस्त वाचा)


पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्याला करोनाची लागण

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एक पोलीस अधिकारी करोनाबाधित आढळल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देहूरोड परिसरात राहणाऱ्या एका पोलिसाला करोनाची लागण झाली होती. दरम्यान, पोलीस आयुक्तालयातच करोनाचा शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पश्चिम बंगालमध्येही ३१ मेपर्यंत लॉकडाउन वाढवला

पश्चिम बंगालमध्येही ३१ मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे.


कर्नाटकात ३१ मेपर्यंत महाराष्ट्र, गुजरातसह चार राज्यांमधील नागरिकांना प्रवेश नाही

‘महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यातील नागरिकांना कर्नाटकात ३१ मेपर्यंत म्हणजेच लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपेपर्यंत प्रवेश मिळणार नाही’, असे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. येडियुरप्पा यांनी असंही सांगितलं की, ‘लॉकडाउनच्या नियमांची काटोकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवांची दुकानं बंद असतील, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. (सविस्तर वाचा)

लॉकडाऊनचा चौथा टप्पा आजपासून सुरु होत आहे. या चौथ्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना जास्तीचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात लॉकडाऊन कसा असेल? याबाबत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज माहिती देणार आहेत. आजच उद्धव ठाकरे यांची आमदार म्हणून निवड झालेली आहे. त्यामुळे आज ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


बीड जिल्ह्यात कोरोना व्हायरसने पहिला मृत्यू झाला आहे. तर औरंगाबादमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्यामुळे मराठवाड्यात चिंतेचे वातावरण आहे. औरंगाबाद येथील मृतांची संख्या आता ३२ वर पोहोचली आहे. बीडमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर होती. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव कौडा येथील रहिवासी बीडच्या आष्टी तालुक्यात आपल्या नातेवाईकांच्या घरी राहायला आली होती. तिथे तब्येत खराब झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु झाले. मात्र या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर उपचार सुरु असताना आज पहाटे या महिलेचे निधन झाले.


महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडन्ट डॉक्टर्स (MARD) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून त्यात आठ दिवसांच्या ड्युटीनंतर सहा दिवसांचा क्वारंटाईन पिरियडसाठी सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. शनिवारी महानगरपालिकेने पाच दिवसांची ड्युटी आणि दोन दिवसांचा क्वारंटाईन करण्यासाठी सुट्टी निश्चित केली होती. मात्र ही मागणी डॉक्टरांना मान्य नाही. तसेच डॉक्टरांना आरोग्य विमा सरंक्षण आणि २५ हजारांची वेतन वाढ हवी आहे.


मुंबई ते गोवा असा ट्रेनने प्रवास करणारे आणखी दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ट्रूनॅट टेस्टिंगदरम्यान त्यांना संसर्ग झाल्याचे समोर आले. आता एकूण नऊ प्रवाशी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुक्त झालेल्या गोव्यात आता ३१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.


कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. आता ३१ मे पर्यंत आणखी लॉकडाऊन असणार आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ९५ हजार ६९८ झाली असून यापैकी ५५ हजार ८७२ केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर ३६ हाजर ७९५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मात्र दुर्दैवाने भारतातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूंनी आता ३ हजारांचा आकडा पार केला असून ही संख्या आता ३,०२५ वर पोहोचली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -