घरCORONA UPDATECoronaVirus Crisis: राज्यात १८ नवीन करोना बाधित रुग्ण, एकूण रुग्ण संख्या १०७

CoronaVirus Crisis: राज्यात १८ नवीन करोना बाधित रुग्ण, एकूण रुग्ण संख्या १०७

Subscribe

राज्यात करोनाचे आतापर्यंत १०७ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून मंगळवारी १८ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ६, सांगली मधील इस्लामपूरचे ४, पुण्याचे ३, सातारा जिल्ह्यातील २ तर अहमदनगर, कल्याण – डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या नवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे ८ रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला आहे. तर, इतर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरु या देशात प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे निकट सहवासित आहेत असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, सोमवारी संध्याकाळी मुंबईतील कस्तुरबा हाॅस्पिटलमध्ये करोना बाधित असलेल्या एका ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. दुबई मध्येच स्थायिक असलेली ही व्यक्ती १५ मार्चला अहमदाबाद येथे पाठीच्या दुखण्यावरील उपचारासाठी आले होते. त्यानंतर ते मुंबईत आले. त्यानंतर २० मार्च पासून त्यांना ताप येणे सुरु झाले. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे उपचार घेत असतानाच त्यांना खोकला आणि श्वास घ्यायला त्रास व्हायला सुरु झाले. २३ मार्चला ते कस्तुरबा हाॅस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेत दाखल झाले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता. करोनामुळे राज्यात झालेला हा तिसरा मृत्यू आहे.

- Advertisement -

मुंबई                                       ४१
पुणे मनपा                                  १८
पिंपरी चिंचवड मनपा                      १२

नवी मुंबई, कल्याण डोंबिवली            ५
नागपूर, यवतमाळ,सांगली प्रत्येकी       ४
अहमदनगर, ठाणे प्रत्येकी                ३
सातारा                                    २
पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार,पुणे ग्रामीण प्रत्येकी – १

- Advertisement -

एकूण १०७ | मृत्यू ३

राज्यात मंगळवारी परदेशातून आलेले ३८७ प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात सध्या ११ हजार ९७ लोक घरगुती विलगीकरणात ( होम क्वारंटाईन) आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत २५३१ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २१४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १०७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार, अतिजोखमीच्या देशातून येणा-या प्रवाशांना संस्थात्मक पातळीवर क्वारंटाईन करण्यात येत असून सध्या ८८० प्रवासी क्वारंटाईनमध्ये आहेत.

आतापर्यंत ११९० जणांच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची पॉझिटीव्ह माहीती नववर्षाच्या पूर्वसंध्येला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. चौथा फिलिपिन्स नागरिकाचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही. तो करोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. करोना लढाईतील प्रतिबंधात्मक नियम पाळत कोणतीही गर्दी न करता गुढी पाडवा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे‌ आवाहन टोपे यांनी केले. सध्या हाॅस्पिटलमध्ये उपचार‌ घेत असलेल्या रुग्णांपैकी किमान १५ रुग्णांची प्रकृती चांगली आहे. ते बरे झाले आहेत. त्यांना आज किंवा उद्यापर्यंत डिस्चार्ज दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -