Coronavirus Update :देशात २४ तासांत ११ हजार २७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद ; २८५ जणांचा मृत्यू

corona

गेले दीड वर्षे राज्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे. जगभरासह भारतातही कोरोना महामारीला तोंड देत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संस्ख्येत सातत्याने चढ उतार पहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत भारतातील ११ हजार २७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २८५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याच कालावधीत ११,३७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

केंद्रिय आरोग्य मंत्रालयने दिलेल्या माहितीनुसार,या कोरोनाच्या सावटामुळे भारतात आतापर्यंत ४ लाख ६३ हजार ५३० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन कोटी ४४ लाख ३७ हजार ३०७ इतकी झाली आहे.देशातील एकूण उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख ३५ हजार ९१८ इतकी झाली आहे.

Koo App

#Unite2FightCorona
#LargestVaccineDrive
𝐂𝐎𝐕𝐈𝐃 𝐅𝐋𝐀𝐒𝐇https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1771571

Ministry of Health & Family Welfare, Govt of India (@mohfw_india) 14 Nov 2021

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत भारतात १११ कोटींपेक्षा जास्त लसीकरण करण्यात आले आहे. मागील २४ तासांत देशात ५७ लाख ४३ हजार ८४० जणांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत ११२ कोटी १ लाख ३ हजार २२५ इतके लसीकरण करण्यात आले आहे.

केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सलग ३७ दिवसांपासून देशातील दिवसभरातील रुग्णसंख्या ही २० हजारांखाली तर सलग १४० दिवसांपासून ५० हजारांखाली नोंदवण्यात आली आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही ०.४० टक्के इतकी आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ३८ लाख ३७ हजार ८५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोनाचा मृत्यूदर १.३० टक्के इतका झाल आहे,असे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीत जाहीर केले आहे.

 


हे ही वाचा – coronavirus: फ्रान्सपाठोपाठ अमेरिकेतही कोरोनाच्या पाचव्या लाटेची भीती, WHO चिंतेत