घरताज्या घडामोडीLive Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. एका बीएमसी अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आहे. राज ठाकरे यांच्या आईंना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.  राज यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांच्यावर घरीच उपचार केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वर्सोवा ब्रिज ते वसई हद्दीत सुवी पॅलेस हॉटेल पर्यंत दीड ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सध्या ही वाहतूक अतिशय संथगतीने सुरू आहे. वाळीव आणि महामार्ग पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

- Advertisement -

NCB ची मुंबईच्या वांद्रे परिसरात तीन ठिकाणी छापेमारी

- Advertisement -

 

पक्षासाठी आणि सेनेसाठी कोणतेही घाव झेलू शकतो. माझ्या पाठीचा कणा ताट आहे. माझ्यावर कितीही आरोप केले तरी काहीही होणार नाही – संजय राऊत


मविआ सरकार ५ वर्ष टिकेल. एकत्र काम केल्यास सरकार २५ वर्ष टिकेल – संजय राऊत


नाशिकमध्ये विविध विकासकामांचे भूमिजन करण्यात आले. पक्ष विस्ताराची कामे सुरू आहेत. विकास कामे ही शिवसेनेची ओळख आहे. दादर नगर हवेलीत शिवसेना खातं उघडणार. महाराष्ट्राबाहेर शिवसेना पहिल्यांदाच खाते खोलणार आहे – संजय राऊत


पंतप्रधान मोदी आज ४ वाजता लस तयार करणाऱ्या कंपन्यांशी संवाद साधणार


ज्यांचा जावई ड्रग्ज प्रकरणात पकडला गेला त्या मंत्र्यांची हकलपट्टी करा. त्या मंत्र्यांमुळेच महाराष्ट्राची बदनामी होत आहे – आशिष शेलार


औरंगाबाद खंडपीठाची इमारत एक अप्रतिम न्यायमंदिर आहे. खंडपीठाच्या भूमिपुजनावेळी मी नव्हतो मात्र झेंडा लावायला मी आलो आहे. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात मात्र ही इमारत पाहण्यासाठी लोकांनी जरुर यावे. लोकशाहीचे स्तंभ दबावामुळे कोलमडत कामा नये  – मुख्यमंत्री


शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी NCB कोर्टात दाखल झाली आहे.


औरंगाबाद खंडपीठ इमारतीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्र्यासह केंद्रीय मंत्री किरण रिजिजू या कार्यक्रमाला उपस्थित होते.


 

देशात गेल्या २४ तासात १६,३२६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ६६६ रुग्णांचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. देशात सध्या १ लाख ७३ हजार ८२८ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. मुख्यमंत्री औरंगाबाद खंडपीठाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे. औरंगाबाद विमानतळावर पोहताच मुख्यमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली.


 

जम्मू काश्मीरच्या गुलमोहरमध्ये बर्फवृष्टी


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाग दौऱ्यावर असणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतींच्या उद्धाटनासाठी ते जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -