कोरोनाचा कहर! जगात रूग्णांची संख्या ८० लाखांवर, साडे चार लाख लोकांचा मृत्यू!

कोरोनाचा सर्वाधिक कहर अमेरिकेत पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये जवळपास 22 लाख लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

worldwide coronavirus update 74 lakh cases and death toll rises to 4 lakhs 18 thousand

कोरोना व्हायरस जगभरात कहर केला आहे. संपूर्ण जग आता कोरोना पुढे हतबल झाले आहे. जगभरात २१३ देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जगात आत्तापर्यंत कोरोना बाधीतांचा आकडा ८० लाखांवर पोहचला आहे. तर आत्तापर्यंत साडे चार लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ४१ लाख ०४ हजार ३७३ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास ६० टक्के रुग्ण फक्त ८ देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या ४५ लाखांहून अधिक आहे.

सर्वाधिक कहर अमेरिकेत

कोरोनाचा सर्वाधिक कहर अमेरिकेत पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये जवळपास 22 लाख लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर एक लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आता दरदिवशी ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद करण्यात येत आहे. ब्राझीलनंतर रूस आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे.

या देशांमध्ये सर्वाधिक रूग्ण

ब्राझील, रूस, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित आहेत. चार देश (अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली) असे आहेत, जिथे ३० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडा १.१७ लाखांच्या पार पोहोचला आहे. तर भारताचा कोरोना बाधित टॉप-4 देशांच्या यादीत समावेश झाला आहे.

अमेरिका : एकूण रुग्ण २,१६२,१४४ एकूण मृत्यू ११७,८५३

ब्राझील : एकूण रुग्ण ८६७८८२ एकूण मृत्यू ४३३८९

रूस : एकूण रुग्ण ५२८९६४  एकूण मृत्यू ६९४८

भारत : एकूण रुग्ण ३,३३,००८  एकूण मृत्यू ९,५२०

यूके : एकूण रुग्ण २,९५,८८९  एकूण मृत्यू ४१,६८९

स्पेन : एकूण रुग्ण २,९१,००८ एकूण मृत्यू २७,१३६

इटली : एकूण रुग्ण २,३६,९८९  एकूण मृत्यू ३४,३४५

पेरू : एकूण रुग्ण २२,९७३६  एकूण मृत्यू ६,६८८

जर्मनी : एकूण रुग्ण १,८७,६७१ एकूण मृत्यू ८,८७०

इराण : एकूण रुग्ण १,८७,४२७ एकूण मृत्यू ८,८३७


हे ही वाचा – रशियाच्या विजयोत्सवात भारताच्या तिन्ही सैन्य दलांचा सहभाग!