संतापजनक! सेकंड हँड गाडीसाठी आई-वडिलांनी विकले आपल्या नवजात बाळाला

धक्कादायक! आईने आपल्या ३ महिन्यांच्या बाळाला ५० हजाराला विकले आणि...

एका दाम्पत्याने सेंकड हँड गाडी खरेदी करण्यासाठी आपल्या नवजात बाळाला विकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या बाळाला दीड लाख रुपयांना एका व्यावसायिकाला विकून आई-वडिलांनी सेकंड हँड गाडी खरेदी केली. याबाबतचा खुलासा बाळाच्या आजी-आजोबाने केला. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून बाळाच्या आई-वडिलांविरोधात तक्रार दाखल केली, ही घटना उत्तर प्रदेशाच्या कन्नौजमध्ये घडली आहे.

पोलिसांनी तक्रार दाखल केले असून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नौजच्या तिरवा कोतवाली क्षेत्रातील सतौरमध्ये तीन महिन्यांपूर्वी जन्म झाला होता. आजी-आजोबांनी आपल्या तक्रारीत सांगितले की, त्यांची मुलगी आणि जावाई गाडी खरेदी करण्यासाठी नवजात बाळाला गुरसहायगंजच्या एका व्यावसायिकाला दीड लाख रुपयांना विकले होते. इंस्पेक्टर कोतवाल शैलेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, बाळ अजूनही व्यापाऱ्याच्या ताब्यात आहे. पोलीस महिला आणि तिच्या नवऱ्याची चौकशी करत आहे.

दरम्यान एका सेकंड हँड गाडीसाठी आई-वडिलांनी नवजात बाळाला विकल्याच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील लोकं हैराण झाले आहेत. कोतवालीमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर ही घटना समोर आली. दाम्पत्याने बाळाला विकल्यानंतर कोणालाही आठ दिवसांपर्यंत कोणतीही चाहूल लावू दिली नाही.


हेही वाचा – पहिल्या बायकोसोबत नवऱ्याची वाढली जवळीक; संतप्त झालेल्या दुसऱ्या बायकोने उचलले टोकाचे पाऊल