Covid-19 चाचणी होणार RT-PCR पेक्षा वेगवान, NIH च्या वैज्ञानिकांचे संशोधन

नव्या चाचणी पद्धतीमुळे कोरोना संसर्गाचे निदान आणखी जलद गतीने करता येईल असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे या नव्या चाचणीमुळे वेळ आणि पैसा वाचण्यासही मोठी मदत होणार आहे.

Covid-19 test faster than RT-PCR developed by NIH scientists
NIHच्या वैज्ञानिकांनी तयार केली RT-PCR पेक्षा वेगवान Covid-19चाचणी

कोरोना संसर्गागाचे निदान करण्यासाठी Antigen चाचणी आणि RT-PCR चाचणी केली जाते. त्यातही RT-PCR चाचणी सर्वोत्तम मानली जाते. मात्र अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी आणखी एका चाचणीची निर्मिती केली आहे. ही चाचणी RT-PCR चाचणी पेक्षा अधिक वेगवान असल्याचा दावा त्यांनी केला आहे. RT-qPCR असे या नव्या चाचणीचे नाव आहे.  पुढील काळात या नव्या चाचणी पद्धतीमुळे कोरोना संसर्गाचे निदान आणखी जलद गतीने करता येईल असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे या नव्या चाचणीमुळे वेळ आणि पैसा वाचण्यासही मोठी मदत होणार आहे. कोरोना चाचणीची ही नवी पद्धत अनुवंशिक RNA (Ribonucleic acid )  च्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे.

यूएस नॅशनल आय इन्स्टिट्यूट, NIH क्लिनिकल सेंटर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेन्टल अँड क्रॅनिओफेशियल रिसर्चच्या माध्यमातून कोरोना चाचणीची ही नवी पद्धत तयार करण्यात आली आहे. कोरोना चाचणी करण्यासाठी RT-qPCR पद्धतीचा वापर करुन काही व्हायरल RNA मिळवण्यात आले.

Chelex 100 resin यांनी तयार केलेल्या लॅब सप्लाय कंपनी बायो रॅडने बनवलेल्या एजंटचा वापर करण्यात आला. RNA डिटेक्शनसाठी वापरले जाऊ शकते का हे पाहण्यासाठी विविध व्हेरिएंटसह नासोपरिन्जियल आणि लाळेचे नमुने घेण्यात आले. कोरोना चाचणीच्या नव्या पद्धतीमुळे हे नमुने तपासण्यासाठी अधिक सोपे आणि सुरक्षित झाले. वैज्ञानिकांचा हा नवा प्रयोग iScience मध्ये प्रकाशित करण्यात आला होता.

पारंपारिक RNA एक्सट्रॅक्शन आणि RT-qPCR चाचणीचा वापर करुन व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियामधील नमुन्यांची NIHच्या सेंटरमध्ये चाचणी केली. Chelating resin buffer मधील नमुने गरम केले आणि RT-qPCR द्वारे व्हायरल RNA ची चाचणी करण्यात आली. नव्या कोरोना चाचणीच्या पद्धतीमुळे RNAच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ केल्याचे समोर आले.


हेही वाचा – कोरोनाचा Delta व्हेरिएंट जगभरात सर्वाधिक परिणामकारक ठरेल, WHO चा इशारा