घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईमध्ये कोरोनाचे ९४१ नवे रुग्ण

Corona Live Update: मुंबईमध्ये कोरोनाचे ९४१ नवे रुग्ण

Subscribe

मुंबईमध्ये कोरोनाचे ९४१ नवे रुग्ण

राज्यापाठोपाठ मुंबईत देखील कोरोनाच्या रुग्णांची आणि मृतांची संख्या आजही वाढतीच राहिली. आज दिवसभरात कोरोनाचे ९४१ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकट्या मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या आता ६० हजारांच्या वर जाऊन ६० हजार १४२वर पोहोचली आहे. याशिवाय मुंबईत आज ५५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याशिवाय आयसीएमआरने उल्लेख केल्यानंतर मार्चपासून विविध रुग्णालयांतल्या ज्या मृत्यूंचा समावेश नॉन कोविड म्हणून करण्यात आला होता, अशा एकूण ८६२ मृत्यूंचा देखील आजच्या आकडेवारीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईतल्या मृतांचा आकडा थेट ३ हजारांच्या वर गेला असून ३ हजार १६५ झाला आहे. त्यासोबतच मुंबईत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा देखील वाढला असून आज दिवसभरात ९४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे अशा रुग्णांचा आकडा देखील ६० हजार १४२ झाला आहे.

- Advertisement -

पुण्यात आतापर्यंत १० हजार १५६ रुग्णांनी केली कोरोनावर मात

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, पुणे विभागात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांनी १० हजारांचा टप्पा ओलांडला असून पुणे विभागात आतापर्यंत १० हजार १५६ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर पुणे विभागात सध्या १५ हजार ८९३ रुग्ण असून ५ हजार २१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

- Advertisement -

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यात अगदी ग्राम पातळीपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावले आहे. त्या सर्व पोलिसांचा ‘आपत्ती सेवा पदक’ देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. (सविस्तर वाचा)


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आक्षेपांनंतर राज्यातल्या कोरोना मृतांमध्ये आज १३२८ अतिरिक्त मृत्यूंची नोंद झाली आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर राज्यात मिशन बिगीन अगेन सुरू झाल्यापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पुन्हा नव्याने रुग्ण सापडल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत. आज दिवसभरात राज्यात २७०१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आणि कोरोना रुग्णांचा एकूण आकडा १ लाख १३ हजार ४४५ इतका झाला आहे. याशिवाय, ८१ कोरोना रुग्णांचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजचे ८१ आणि याआधीचे समाविष्ट करण्यात आलेले १३२८ अशा एकूण १४०९ मृत्यूंची आज नव्याने भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा ५ हजारांच्या वर गेला असून ५ हजार ५३७ इतका झाला आहे.


कोरोना रुग्णांत एकने वाढ

प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आदर्श पॅटर्न राबवत मागचे दोन महिने कोरोनाशून्य असलेल्या जायखेडा, जयपूर, सोमपूर या गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला असताना मंगळवारी (दि. १६) पुन्हा नवीन एक कोरोना रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या आता १२ झाली आहे. मात्र एका कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेले ११ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आता वाडीपिसोळ या छोट्या गावात १ कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. यामुळे शहराप्रमानेच ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरल्याचे आढळून आले आहे.


अंबरनाथमध्ये मंगळवारी कोरोनाचे ६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. रविवारीही अंबरनाथमध्ये ६२ रुग्ण आढळून आले होते. तर सोमवारी ६४ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे अंबरनाथमध्ये आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ८०६ वर पोहचली आहे. मंगळवारी, अंबरनाथमध्ये आढळून आलेल्या ६२ रुग्णांपैकी ४१ पश्चिम भागातील तर २१ पूर्व भागातील आहेत. दरम्यान, अंबरनाथमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३२१ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर ४६५ जणांवर उपचार सुरू आहेत.


मुंबईतील निर्मल नगर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक यांचा कोरोनाव्हायरसशी लढताना मृत्यू झाला आहे.


लडाखच्या गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या भारत आणि चीन सैनिकांमधील चकमकीत चीनच्या पाच सैनिकांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. तर त्यांचे ११ जवान जखमी झाले आहेत. ही माहिती हाँगकाँगच्या ग्लोबल टाईम्सच्या वरिष्ठ पत्रकार वँग वेनवेन यांनी ट्विट करत दिली. असे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, या बातमीला अद्याप चीन सरकार तसेच लष्कराकडून दुजोरा दिलेला नाही. भारत आणि चीनमधील लाईन ऑफ अॅक्चुअर कंट्रोल (एलएसी) येथे काल रात्रीपासून दोन्ही सैनिकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात तब्बल ४५ वर्षानंतर काल पहिल्यांदा भारत-चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतातील एक अधिकारी आणि दोन जवानांना वीर मरण आले. गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. (सविस्तर वाचा)


देशात गेल्या २४ तासांत १० हजार २१५ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ८० हजार १२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. देशातील रिकव्हरीचा रेट ५२.४७ टक्क्यांनी वाढला आहे.


नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार पार झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत १२९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ हजार ३०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ६३४ जणांवर उपचार सुरू आहेत. काल दिवसभरात नाशिकमध्ये ८३ नवे रुग्ण आढळले असून ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ६८वर पोहचला आहे.


देशात गेल्या २४ तासांत १० हजार ६६७ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले असून ३८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील आतापर्यंत एकूण ३ लाख ४३ हजार ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ लाख ५३ हजार १७८ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच १ लाख ८० हजार १३ रुग्ण रिकव्हर झाले आहे. तर ९ हजार ९०० रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. सविस्तर वाचा 


आज औरंगाबाद जिल्ह्यात ९३ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ९१८ झाली आहे. आज आढळलेल्यापैकी ५५ पुरुष आणि ३९ महिला रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत १५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १ हजार ५४९ जणांची कोरोनावर मात केली आहे.


आज आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.


जगभरातील कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत आहे. जगभरातील कोरोनाचा आकडा ८१ लाखांहून अधिक झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात ८१ लाख १२ हजार ६११ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ४ लाख ३९ हजार ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ४० लाख ७ हजार ३६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 


राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसर्‍यांदा एकाच दिवशी विक्रमी संख्येने रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सोमवारी राज्यभरात ५ हजार ७१ रुग्णांना रुग्णालयांमधून घरी सोडण्यात आले असून मुंबईतून सर्वाधिक ४२४२ एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. राज्यातील आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -